पिवळाई कविता ९९




पिवळाई 
हिरव्यागार गवत फुलात 
सोनकी ,बरका बहरली 
पिवळ्या धमक फुलोऱ्याने
अचूक नजर वेधली  ||

हळद कुंकू लेवूनी सजली
साज शृंगारात अवनी नटली
सुंदरतेची बहार आली 
सोनदुलई झळकू लागली ||

पितांबरी शालू भरजरी 
रुप साजिरे लयभारी 
नाजूक कोमल रानफुले
भंडाऱ्याची तळी उधळे||

फुलपाखरं मुक्त विहरती
फुलांसमे पिंगा घालती 
 हसती खेळती नाचती
मस्ती करती वाऱ्यासंगती||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ९९
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड