मायेची बाग कविता ९८
मायेची बाग
मायेची पाखर,कष्टाची भाकर
घामातनं शिंपले बागेचे मखर
हिरव्यागार छटेची झाडं डवरली
लालभडक रंगाची फळे बहरली ||
गेंददार , टपोरी फळे लगडली
चवदार रसना संचित झाली
मातेचे संस्कार दरवळू लागले
मातीचे रंग बीजात उतरले ||
कष्टाचे सिंचन ,मातीचा सुगंध
मातेच्या मायेचा दरवळे गंध
वरखत अन् जीवामृताचा स्नेहबंध.
प्रयोगशील शेतीचा मम छंद ||
पिताजींचे कर्तृत्व
आईचे मातृत्व
तुमचं सामाजिक दातृत्व
त्यातून उभारले नेतृत्व ||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ९८
Comments
Post a Comment