काव्यपुष्प- ९० स्ट्राॅबेरी




         स्ट्राॅबेरी 
रसरसीत लालचुटुक स्ट्राॅबेरी
गिरीस्थानची प्रसिद्ध बेरी 
हिरव्या पानांत शोभतेय भारी 
पर्यटकांची आवडती बेरी ||

अवीट गोडी स्वादाची
पल्प,क्रश सरबताची 
चिक्की जाम चॉकलेटची 
नानाविध पदार्थांची ||

आधुनिक तंत्र जोडीला 
अपार कष्टाची साधना
थंडगार हवेची किमया
लाल मातीची रसना ||

आकर्षक सजावटीने  
बहारदारपणे  मांडलेली 
आंबटगोड स्वादाने
ओतप्रोत भरलेली  


हौसनं जाऊया  फिरायला
रेंगाळणारी चव चाखायला ||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ९०
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी
https://raviprema.blogspot.com





Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड