बागेचा नजारा कविता ७८
बागेचा नजारा
मनमोहक दृश्यांची
रेलचेल उपवनात
तहानभूक हरपून
फिरतो उद्यानात ||
थुईथुई नाचणारं कारंजे
मनाला भुरळ घालते
जलाचे तुषार नाचरे
बागेचे सौंदर्य सजवते ||
झुडूपांची रेखीव नक्षी
गोलाईतली नजरेत भरते
नाजूक सुंदर फुलझाडांची
बहारदार रंगावली शोभते ||
चोहीकडे हिरव्यागार पर्णराजी
मखमली गवताची रजई
रमणीय स्थळी निवांत क्षणी
सुखद गारवा मनाला दुलई||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ७८
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment