मेणवली घाट कविता ९७
मेणवली घाट
कृष्णेच्या काठावर घाट चंद्रकोरी
मस्त दिसते उतरंड पायरी
चौकोनी मंच वाड्याच्या समोरी
घाट दिसे पारावरुन लयभारी ||
सिनेसृष्टीचे चित्रण स्थळ
गावाचं धार्मिक स्थळ
मेणेश्वर देतो आत्मबळ
निसर्गरम्य पर्यटनस्थळ||
कृष्णामाईचं सौंदर्य घाटाने खुलवले
झाडीचे बिंब जलात दिसले
प्रवाहित जल दर्पण झाले
नयनरम्य दृश्य घाटाचे सजले||
घंटेचा निनाद आसमंती घुमे
घाट बघण्यात सगळेच रमे
पोरांचं डुंबण अन् सूर मारणं
मजेत चेकाळत होतं पोहणं||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ९७
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment