निसर्गरम्य परिसर कविता ८४
निसर्गरम्य परिसर
स्वराज्याचा साक्षीदार रायरेश्वर
प्रतिज्ञा प्रसंगाचे स्मरण होते,
इतिहासाच्या पाऊलखुणा
पायथ्याचे गाव अभिमानाने जपते ||
डोंगर गावाला सेतूनं जोडलाय
जवळी बंधारा बिलगलाय
एका रेघेत खांबांचीओळ
जलबांधाला फळ्यांची खोळ ||
धवल कळसाचे दर्शन होते
झाडीनं गाव नजरेआड होते
जलबांधाने शिवारशेती फुलते
गावागाड्याला समृद्ध करते ||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ८४
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी
htpps://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment