निसर्ग नेकलेस रोड कविता ८८



🛣️नेकलेस रोड🛣️

गोलाकार वळणाची वाट
मस्तच शोभतोय थाट 
सुंदर नजारा घाटाचा 
निसर्गाच्या आभूषणाचा ||

सह्यगिरीच्या रांगांचे 
निसर्ग सौंदर्य मनोहारी 
डोंगरकडे खुणावती 
रानवाटा नजरेत भरी||

हिरव्यागार जंगलझाडीला
तृणपात्यांची संगत लाभते 
वाऱ्याच्या मंद झुळूकीने 
बासरीची गुंज कानी येते ||

दळणवळणाची वाट
पायथा माथा सांधते 
निसर्गाच्या सहवासाची 
मनी भूरळ घालते||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ८८

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड