पावसाचं आक्रंदन कविता १०४



पावसाचं आक्रंदन 

रात्रंदिन पाऊस कोसळला
रानशिवारात बेभान पडला
ओढे दुथडी भरून वाहिले
आवेगाने पाणी रस्त्यावर उतरले||

सडकेवरुन वाहू लागले 
वाढल्याने मार्ग बदलू लागले
वाहतुकीला विराम आले
दोन्ही कडे थांबावे लागले ||

पूरस्थिती निर्माण झाली
पाण्याच्या वेगाने झाडं वाकली
रस्त्यावर लालभडक पाणी आले 
पावसानं धरतीवर आक्रंदन केले||

गाडी चालक 
तुमच्या धारिष्ट्याला सलाम 
तुमच्या अंदाजाला प्रणाम
तुमच्या सारथ्याला सलाम 
तुमच्या माणुसकीला सलाम ||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प १०४
फोटो गेल्यावर्षीचा आहे.


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड