नयनरम्य निसर्गातील गाव कविता ८५








नयनरम्य निसर्गातील गाव

धवल आकाशी मेघ दाटले
डोंगररांगेला धुक्याने वेढले 
नभ माथ्याला भेटायला आले
निसर्गाचं न्यार  रूप बहरले ||

टेकडीवरच्या मखमली गवतानं
हिरवेगार दिसती गालिचे 
पावलं हळुवार पडती अलगद
सिंचन होतेय जलधारांचे ||

गर्द फिक्कट हिरव्या छटा 
धूसर दिसतायत घरांच्या वाटा
पायथ्याला घरांची दाटीवाटी
लाल पांढऱ्या रंगाची ठळक दाटी ||

चहुबाजूच्या  छटा हिरव्यागार 
पाऊसधारांचे दृश्य बहारदार
झाडांच्या तोरणांनी वाडी सजली 
नव्या साजात चमकू लागली ||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ८५ 

यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड