निसर्गातील रानमेवा कविता ७९
निसर्गातील रानमेवा
फुलांतील पुष्परस शोषून
साठवणूक मकरंदाची
मधाचं पोळं फांदीवर बांधलं
वसती कामकरी माश्यांची
गुंजारव करत
भ्रमंती करतात
कणकण मध
मव्हात साठवतात
आपण आयत्यावर
पायत करतो
मधाच्या पोळ्याव
डल्ला मारतो
महू चघळून खाण्यात
खरीखुरी लय मजा
मधाच बोटं चाटून
खायला वाटते मजा
पोळं मधानं ओथंबलेलं
रानच्यामेव्यानं भरलेलं
मध मधाळ चवीचं
अस्सल निर्भेळ स्वादाचं
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ७९
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment