गंमत जंमत कविता ८३




गंमत जंमत 
पायवाटेने वनात जाई 
आकाशी दिसले पक्षी 
उंचच उंच  डेरेदार राई 
फांद्यांची जाळीदार नक्षी ||

वाटेतल्या फांदीनं नजर वेधली  
मन बावरलं अल्लड झाले 
फांदीचा मग झुमकूळा केला 
मजे मजेचे झोके घेतले ||

लयबद्ध तरंग अनुभवले 
आयुष्याचे झोके कळले
क्षणभर मन बालक झाले 
पारंब्याच्या झोके आठवले||

आवडत्या ठिकाणी जाणं 
मन मानेल तसं भटकणं 
रमत गमत परिसर बघणं 
निसर्गाचा आनंद घेणं||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ८३
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.htpps://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड