योगासने कविता ९६
योगदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🏵️ योगासने 🏵️
थंडीचे दिवस सकाळची शाळा
मैदानावर उभारलाय योगाचा फळा
योगासनाचा लागलाय लळा
आरोग्यदायी सवयींचा फुलवू मळा ||
योगासने करुया
कमानदार शरीर बनवूया
प्राणायाम करुया
मनःशांती मिळवूया||
वज्रासनात बसूया
मनचक्षूने बघूया
उन्हं अंगावर घेऊया
नवचेतना मिळवूया||
शाळेची रंगीबेरंगी खोली
वारली कला चितारली
राऊळीचा कलश अंबरी
हिरव्या पिवळ्या डोंगररांगी||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ९६
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment