शिक्षक कविता ८१





५सप्टेंबर शिक्षकदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा❗🌹🍁💐  
       शिक्षक 
राष्ट्राचा विकासक 
शाळेचा अध्यापक 
विद्यार्थ्यांचा शिक्षक
पालकांचा मार्गदर्शक

 संसर्गजन्य आजाराने 
आमची शाळा बंद झाली
विद्यार्थी शिक्षक नात्यात
 नसती आफत आली 

फळ्याला खडूचा खंड पडला
मुलांचा किलबिलाट धूसर झाला 
स्वच्छता,परिपाठ बंद झाला 
घंटेचा निनाद स्तब्ध झाला 

बाई मी, सर मी म्हणाल्याचा 
कानी होतोय भास 
मग फोनवरून संपर्क 
साधला जातोय खास 

स्वातंत्र्यदिनाला मुलांची
    आठवण झाली 
शारीरिक अंतर ठेवून 
     घरभेट घडली 

सर शाळा कधी भरणार 
हा एकच लडिवाळ सवाल 
तुम्हीच तुमचे स्वयं अभ्यासक 
घरीच करा अभ्यास अन् धमाल

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
 काव्य पुष्प ८१

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड