सांजचा सागर कविता ७७



सांजचा सागर 
 सोनेरी बिंब दिनकराचे
ढगात पसरले रंग हळदीचे
धवल रेषांच्या आकाशाचे 
जादूई दृश्य दिसे सांजचे ||

नयनरम्य नजारा समिंदराचा 
प्रवाहित जलतरंग लहरींचा 
 रुबाब देखणा दर्याचा 
 भान हरपून बघण्याचा ||

बघताना मन मयूर होते 
आनंदाने फुलून नाचते
अंबर सागराचे अतूट नाते
रमणीय दृश्यांना येते भरते||

आजचं दृश्य उद्याची  
सुखद आठवण होते 
निसर्गाचे वैविध्य दर्शन 
आनंदाचं उधाण आणते ||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ७७
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी htpps://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड