निसर्ग सोबती कविता ९३
निसर्ग सोबती
घनदाट झाडीत भटकताना
पाखरांची किलबिलाट कानी येते
एकाएकी वाटेनं चालताना
पक्ष्यांची जोडी नजर वेधते
हिरव्या पोपटी छटेची बहार
पानांपानांची नक्षी छानदार
पाखरं बागडती खेळती
फिरुन येवून चारा टिपती
निसर्गाचे संवर्धन सोबती
आकाशात झेप घेती
आनंदाची गुजगोष्टी करती
मुक्तपणे खग विहारती
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ९३
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment