निसर्ग सौंदर्य कविता १०३
निसर्ग सौंदर्य
गगनी मेघांची दाटीवाटी
ढग माथ्याला आनंदाने भेटी
एकमेकांशी हितगुज करती
निश्चल जलधारा बरसती ||
अचानक वारे वाहती
भेट धूसर करती
लख्ख प्रकाश पडती
क्षणभर हर्ष वाटती ||
निळ्या धवल रंगती
मधी हिरवी छटा उठावती
धरणी माय झळाळती
जल मोत्यावाणी चमकती ||
मुक्त सोंदर्याचा आविष्कार
नेत्री सुख शांती लाभती
शुध्द ,स्वच्छ हवेचा परिसर
तनमनाला आल्हाद देती||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प १०३
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
छान लय मस्त
ReplyDelete