फुलोत्सव काव्यरचना १०६
🌸 प्रीत फुलांची फुलोत्सव 🌸
बागेतल्या फुलांनी
घराची शोभा वाढते
विविध रंग अन् सुगंधाने
माहोल उत्साही बनते ❗
नवगुलाबी रंग
प्रितीचा उमंग
डुले वाऱ्यासंग
मन पाहण्यात दंग❗
गुलाबी रंगाची नजाकत भारी
नजरेत भरली फुले सारी
प्रितीचा बहार स्पर्श हवा
मनोमिलनाचा ध्यास नवा ❗
अतूट नातं निसर्ग अन् धरतीचं
स्वागत होतय सणवारांचं
फुलांचं रुप विविध रंगाचं
कोमल, नाजूक टपोरेपणाचं ❗
निसर्गाचा सोहळा फुलांनी सजतो
ऊन सावलीने रुप खुलवितो
फुलांचे सौंदर्य मन रिजवतो
तनमनाला आनंदाने चिंब भिजवितो ❗
फुलांच्या उत्सवात.....
कधी रजई पिवळी
कधी पैठणी निळी
कधी शालू हिरवा
कधी फेटा भगवा ❗
फुलांच्या उत्सवात.....
कधीकधी शाल पांढरी
मोरपंखी रंगात नटली नवरी
कधी फुलोरा तांबडा,गुलाबी
त्याचा पुष्पगुच्छ झळके नभी ❗
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प १०६
फोटो साभार श्री रत्नाकर थोपटे
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https:// raviprema.blogspot.com
मस्तच कविता
ReplyDelete