निसर्ग सौंदर्य कविता १००





निसर्ग सौंदर्य

आकाशी ढगांचे 
पुंजके फिरती 
वाऱ्याच्या झुळुकीने
तनमन शहारती ||

आकाशी मेघ दाटले 
पुंजके माथ्यावर आले
ढग वाऱ्यांचा खेळ चाले 
क्षणोक्षणी दृश्य बदले ||

कातळातल्या खिडकीचा तोरा  
एलिफंट पॉईंट्सचा नजारा
दुरुन बघण्याचा हर्ष खरा 
घोंघावत नादाने वाहे वारा ||

गर्द हिरव्या डोंगररांगा
घनदाट जंगलझाडी सभोवरी 
अंथरले गवताचे गालिचे 
रमणीय दृश्य दिसे कड्यावरी||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प १००
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
फोटो साभार श्री बाळकृष्ण पंडित वाई

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड