मित्रवर्य वाढदिवसाच्या शुभेच्छा




 आदरणिय श्री रविंद्र लटिंगे  सर
(मुख्याध्यापक जि.प.शाळा कोंढावळे)
 यांचे जन्मदिनानिमित्त
 काही गोष्टी शेअर कराव्यात असे आवर्जून वाटते.
तसे पाहता फार जवळचा सहवास,अती जवळचा संपर्क असे काहीही सरांचे बाबत नाही.
पण
एक मात्र खरे कि,
मी वाशिवली येथे हायस्कूलला असलेपासून सरांना पाहिलंय.
तेव्हा शाळेतील विद्यार्थ्यांचे पटांगणावर सर खेळ घ्यायचे.
काही अंशी का होईना सरांचे काम तेव्हा पाहिले असेल.
नंतरच्या काळात
२००१ ला माझा प्रवेश शिक्षणक्षेत्रात झाला.
तेव्हा श्री.लटिंगे सर नंतरच्या काळात पंचायत समितीमध्ये साधनव्यक्ती म्हणून सेवा पाहत होते.
तेव्हा बर्‍यापैकी त्यांचेशी संपर्क यायचा.तेव्हा सर बर्‍यापैकी मोटिवेट करायचे.कारण सेवेत संधीची आशा नव्हती.
मित्रा,अशा संबोधनाने हाक मारुन सर जीवनात आशा पेरायचे.
आजही मित्रा हाच शब्द सरांचे ओठावर असतो.
मागच्या काही काळात सरांची कोंढावळे शाळेत बदली झाली.
आणी शाळेचा चेहरामोहरा बदला हे सदर परिसरात गेलेवर आणी तेथील माणसे भेटल्यावर  समजते.
या वर्षी सदरील ग्रामस्थ यांचेमार्फत सरांचा उत्कृष्ट कार्याबद्दल यथोचीत  स्वागत-सत्कार होणार होता. पण कोरोनामुळे राहिला.
पण पुढे होईलच.
क्रीडास्पर्धेच्या माध्यमातून सरांशी गेली दोन वर्षे संपर्क आला.
सर्व सहकार्य,प्रेरणा सरांकडून मिळाली.
ज्या ज्या वेळी शाळेत जाणे झाले त्या त्या वेळी सरांचे काहीतरी काम चाललेलं असायचं अन् विद्यार्थी सरांना मदत किंवा सरांसोबत काम करताना पहावयास मिळायचे.

फेसबुकच्या माध्यमातून एक नक्की समजले कि,
सर चांगले लेखक आणी शिवाय उत्तम कवी सुद्धा आहे.
अप्रतिम लेखनशैली त्यालाच नाजूक शब्दांची कवीतेच्या माध्यमातून जोड असे विवीधरंगी बहुआयामी सरांचे व्यक्तीमत्व म्हणावे लागेल.

मागे पाराटवस्ती येथे शाळेत असताना अभेपुरीला श्री. अशोक आबा मांढरे यांचे जन्मदिनानिमित्त आमच्या शाळेस संगणक संच मिळणार होता.त्यानिमित्ताने जाणे झाले तेव्हा अतिशय सुंदर सुत्रसंचालन सरांचे पाहवयास मिळाले.
तेव्हा सर अभेपुरी शाळेत कार्यरत होते आणी शाळेचा गुणगौरव अभेपुरी बीटात नक्कीच होता.
मला वाटते सर ज्या शाळेत असतात त्या शाळेत आपल्या कार्याचा ठसा उमटवतातच.
     क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूला वाटायचे धोनीच्या कॅप्टनशीपमध्ये खेळायला भेटावे. त्याचपद्धतीने मला वाटते सर मुख्याध्यापक असताना उपशिक्षक म्हणून काम करण्यास मिळावे.
      स्वप्न पुरी होतील,न होतील पण ती पाहायची जरुर असतात.
    एक मात्र नक्की दुरुन का होईना काही बाबी शिकण्यास जरुर मिळाल्या.
     आ.श्री.लटिंगे सरांबाबत असे विचार व्यक्त करायचे होते.
ते निमित्त वाढदिवसानिमित्त मिळाले.काही बाबी राहिल्या असतील.शेवटी अपूर्णतेतही जीवन असते.
      अशा बहुआयामी,आदर्शवत,लेखक,
कवी,समाजप्रिय,विद्यार्थीप्रिय,
शब्दांवर प्रभुत्व असणारे,
तंत्रज्ञानाशी दोस्ती करणारे अशा खूप अर्थाने विशेषणात बसणारे
गुरुवर्य आ.श्री.लटिंगे सर यांना
आजच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
    सरांना उदंड,निरोगी आयुष्य लाभावं अशी श्री.चरणी प्रार्थना!
           
                
      ~ श्री.धर्मेंद्र दिक्षीत सर ~
वडवली वाई

🌹 *वाढदिवस शुभकामना* 🌹
  आज 12 सप्टेंबर...
   ओझर्डे गावचे  सुपुत्र  *सन्माननीय श्री  रवींद्रकुमार  लटिंगे सर (दादा)* 
💫  एक आदर्श व कुशल *प्रशासक*   
                          
💫 पुरोगामी विचारांचा व आचारांचा मूर्तिमंत *झरा*

 💫 विज्ञान व संगणक
 युगातील *अध्यात्म गुरु*

💫 विविध पर्यटनातील प्रवासवर्णने सफर करवणारे एक *लेखक*

💫 प्रासंगिक व वास्तवदर्शी  कविता  रचणारे *कवी*

💫 शाळेतील जीवनातील सहज शिक्षण देणारे *गुरु*

💫एक कुशल  नियोजनातील *अभियंता* 

💫 प्रेमाच्या व मायेच्या शब्दांनी  उपचार करणारे *डॉक्टर* 

💫शिक्षण क्षेत्रातील व समाजातील एक  वलयांकित व्यक्तिमत्त्व
  असलेल्या  *श्री लटिंगे दादांना* वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*..........या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सर्व स्वप्न साकार व्हावीत
आजचा वाढदिवस आपल्या अनमोल क्षणांची आठवण ठरावी .या आठवणीने आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच इच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
🌹🎂🌹🎂🌹🎂🌹
श्री सुनील जाधव सर चांदवडी वाई 


*💐💐वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!*💐💐
वाढदिवस हा नवे संकल्प करून सिद्धिस् नेण्याकडे वाटचाल करण्याचा एक महत्वपूर्ण दिवस ! 
   आयुष्यातले काही क्षण इतके सुंदर असतात  की ते साजरे करावेसे वाटतात. त्या सुंदर क्षणांपैकी आजचा हा सुदिन. 💐💐💐💐
🟣आमचे मार्गदर्शक परममित्र श्रीमान रविंद्रकुमार(दादा)लटिंगे सर
 यांचा🎯🟣
 जन्मदिन।*💐💐
   जीवनाच्या कठोर आणि प्रदीर्घ अनुभवातून तावून सुलाखून निघालेले व्यक्ती मत्व, लहानपणापासून अखंड चळवळी  स्वभाव, चळवळीसाठी कष्ट, ञास उपसण्याची तयारी ,प्रचंड जिद्द आणि असीम महत्वकांक्षा हे ही  स्वभाव वैशिष्ट्य .....
       🌹समाजातील प्रश्नांची जाण आणि  त्या सोडवण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे प्रामाणिक कष्ट. ... 🌹तत्परता हे  दादांचे आणखी एक गुणवैशिष्ट्य.. 
ग्रामीण भागात  शिक्षकी पेशातून अखंड सेवाव्रत करणारा अजातशञू प्रशिक्षक. . 🌹कधीही न हरता न थकता आजही अविरत कार्यरत आहे .
 🌹या सुदिनी  दादांना  आपल्या सर्व परिवाराकडून भरभरुन जीवन जगण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.*
🌹एक उत्कृष्ट मिञ,
 चांगला सहृदय गृहस्थ, 
ग्रामीण समाजाशी नाळ जोडलेले हरहुन्नरी व्यक्तिमत्व,
🌹उत्कृष्ट व आदर्श सूञसंचलनातून सर्व कार्यक्रमास अत्युच्च पातळीवर नेणारे अवलिया व्यक्तिमत्व..
🌹आपल्या सिद्धहस्त लेखनातून अवघ्या महाराष्ट्रात प्रवासवर्णनातून☘️भटकंतीकार☘️म्हणून नवीन ओळख निर्माण झालेले सर निसर्ग व पर्यटन आणि तंत्रज्ञानाची आवडही जोपासत आहेत.....
🌹 एक चांगला माणूस,
 हाडाचा कार्यकर्ता,
 संघटनात्मक काम
प्रपंच,
असे रोजचे रहाटगाडगे  संभाळूनही मित्र मंडळींसाठी आनंद देणारे सदाबहार व्यक्तिमत्त्व, व  आपल्या मिश्किल स्वभावाने प्रेरणात्मक व  गौरवात्मक सकलांच्या ह्रदयात स्थान निर्माण  करणा-या  बंधूला या, सदाबहार व्यक्तिमत्वास  या दिनाच्या  खूप खूप शुभेच्छा....
     🟣मा.लटिंगे  सर एक *हजरजबाबी,प्रामाणिकपणा, सचोटी, अखंड कार्य आणि काम करण्याची सचोटी ! जपणारं एक आदर्श  व्यक्तिमत्व !*
आपल्या जन्मदिनाचा बहर चिरंतन  बहरत रहावो ....
आपणांस सदैव दिर्घायु व निरोगी आयुष्याचा लाभ होवो !!
🌹आपल्या वाढदिवसाच्या आपणांस उदंड अशा स्नेहपूर्वक, हृदयस्थ शुभेच्छांचा सदोदित वर्षाव !
💐🌹💐🌹💐🌹
  *शुभेच्छुक श्री. शिवाजी निकम आणि मिञपरीवार

*"आदरणीय गुरुवर्य रविंद्र सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!"*
💐💐💐

*"माणूस उत्साहाने भारलेला असला की तो इतरांना प्रोत्साहित केल्याशिवाय राहत नाही. ग्रामीण जीवन असो, कथा-कवितांचा प्रांत असो, फोटोग्राफी असो अथवा भटकंती असो सरांचा सगळीकडे अफलातून वावर आहे हे त्यांच्या सतत केलेल्या लिखाणातून पाहायला मिळते..!"*
*"आपल्या ज्येष्ठांचा मान अन् लहानांचे कौतुक करण्याचे दुर्मिळ कौशल्य सरांच्यात सामावले आहे याचा या समूहाचा घटक म्हणून मला सार्थ अभिमान वाटतो..!"*
*"त्यांच्या लेखनप्रवासाला, कार्याला असेच बळ मिळत राहो हिच या मंगलदिनी आई भवानी चरणी मंतगल मनोकामना..!"*

✍️💐✍️💐✍️💐✍️💐✍️

*शुभेच्छुक:-*
*राजेंद्र बोबडे, सातारा.*

अभिष्टचिंतन
        जागतिक कोरोना संकटामुळे कधीनव्हे ते सारं जग स्तब्ध झाले . कित्येकांना हा कालावधी जखडल्यासारखा झाला , परंतु वाॅट्सअॅपच्या माध्यमातून अनेक शिक्षकांनी आपल्यातील सुप्त लेखनकौशल्याव्दारे अनेकांना अचंबित केले.या लेखनप्रपंचात एक दोन नव्हे तर शंभर दिवस अखंडपणे सह्याद्रीच्या कुशीतील ज्ञात अज्ञात ठिकाणांचे प्रवास वर्णन भटकंतीच्या माध्यमातून लेखन करीत निसर्गातील छोट्या छोट्या गोष्टीचे सहजपणे बारकावे टिपणा-या  भटकंतीवेड्या कोंढावळे शाळेच्या आदर्श मुख्याध्यापक श्रीमान रविंद्र लटिंगे यांचा आज वाढदिवस .......
     अशा लेखन व काव्य वेडया  तंत्रस्नेहीस या दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा....
      आपल्या शिक्षकीपेक्षात ध्येयवेडे काम करीत असताना एक कर्तव्यदक्ष अजातशञू व्यक्तिमत्व या बिरूदावल्या सोबत बाळगणा-या या मित्राने आपल्या प्रत्येक शाळेत केलेले कार्य म्हणजे आदर्शपाठच ...
तन मन व धनाने सेवाव्रत कार्य करताना आपल्या आदर्शवत कार्यामुळे समाज व आदर्श नागरीक घडवण्याचे पवित्र कार्य घडते यासाठी शिस्त , क्षमता आणि कर्तव्य या सदगुणांचा त्रिवेणी संगम अंगी बाळणा-या या आदर्श अध्यापकास या दिनाच्या मनस्वी शुभेच्छा...
      जीवेत शरद: शतं !!! 
      पश्येत शरद: शतं !!!
       भद्रेत शरद: शतं !!!            
जन्मादिवसस्य शुभाशय: !!!
   शुभेच्छुक-
श्री.शरद पोतदार , बावधन

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड