माझी भटकंती नळदुर्ग भाग क्र. ६६
शालेय उपक्रम
माझी भटकंती
पुस्तक परिचय
माझी ज्ञानमंदिरे
Lifestyle प्रश्नपेढी सामान्य ज्ञान
🌱🍂🌱🍂🌱🍂🌱🍂🌱
माझी भटकंती
क्रमशः भाग- ६६
⛰️नळदुर्ग किल्ला⛰️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
८ नोव्हेंबर २०१९ रोजी मित्रपरिवार समवेत दिवाळीच्या सुट्टीत हैद्राबाद ट्रीपला सोलापूर मार्गे निघालो होतो.
यावर्षी अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस पडला होता... एबीपी माझावर नळदुर्ग किल्ल्याची डाक्यमेंटरी बघायला मिळाली होती...त्यातील "नर मादी"या दोन धबधब्याची माहिती बघताना वेगळीच वाटत होती.त्यामुळेजातानाच वाटेवरील भुईकोट किल्ला बघायचं नियोजन होते.
नळदुर्ग किल्ला हायवेवरुनच आपल्या दृष्टीस पडतो.. दुपारच्या वेळी आम्ही या भुईकोट किल्ल्यावर निघालो.यापुर्वी देवगिरीचा भुईकोट किल्ला बघितला होता .बांधिव भिंत आणि खंदक प्रथम दर्शनीच दिसतात. एन्ट्री पास घेऊन आम्ही ..'हुलमुख 'दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश केला.. प्रवेश करतानाच दिंडीत अवाढव्य आकाराची भांडी दृष्टीस पडली. मराठवाड्यातील महत्त्वाचा किल्ला असून मध्ययुगीन काळातील स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे..नळराजाने हा किल्ला बांधला म्हणून याला नळदुर्ग किल्ला म्हणतात अशीही आख्यायिका आहे.दगडीचिऱ्यांची उत्तम तटबंदी ३किमी लांब आहे.नदीचा प्रवाह अडवून खंदक तयार केलेला आहे.तटबंदीवरुन आपण सगळीकडे फिरु शकतो..नळदुर्ग किल्ला हा त्याची रचना, संरक्षण व्यवस्था, टेहळणीचा उपळ्या बुरूज, त्यावरील लांब तोफ, दरवाजाचा वक्राकार मार्ग वगैरेंमुळे चांगलाच लक्षात रहातो. उपळी,परंडा,संग्राम व नवबुरुज या किल्ल्यावर आहेत. तोफांचे अवशेष पहायला मिळतात...उपळीबुरुज सर्वात उंच आहे.तो एखाद्या टॉवर सारखा दिसतो.किल्ल्यातील सर्वात उंचीचे ते ठिकाण आहे.तीव्र चढण आहे.७७पायऱ्या आहेत.सर्व पायऱ्या एका दमात चढताना दम लागतोच.लांबवरच्या भागातील हालचाली समजण्यासाठी टेहळणीसाठी तो बुरुज असावा.त्याला टेहळणी बुरूज ही म्हणतात...आम्ही सगळे किल्ला पहात पहात टेहळणी बुरूजावर गेलो.एका ठिकाणी थांबून मस्तपैकी विविध पोजमध्ये फोटोग्राफी केली... बऱ्यापैकी वर सपाट जागा असून दूरवर नजर जाते.दोन तोफा आहेत.तिथुन खाली पाच-सहा पायऱ्या उतरून अंधार खिडकीत जाता येते.तिथूनही किल्ल्याचा सर्व भाग दिसतो.टेहळणी बुरुज इतर बुरुजा पेक्षा वेगळा आहे....टीव्हीत बघितल्याचे ठिकाण प्रत्यक्ष पहायला मिळाले मनस्वी आनंद झाला.
बोरी नदीवर बंधारा बांधून पाणी( जल)महालात पाणी खेळवले आहे....तिथेही खिडक्यांसारखी तटबंदी आहे.
पाणी महाल म्हणजे स्थापत्य व अभियांत्रिकी कलेचा अप्रतिम नमुना आहे.जलमहाल असणारा बंधारा हे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. सर्वात जास्त पर्यटकांची तिथे गर्दी होती..फोटोग्राफी आणि सेल्फी काढायला सगळे गुंग.मस्तच ठिकाण पाहून सगळे खुश..फोटोच फोटो काढले... हा बंधारा उंच आहे. चार मजली बंधारा आहे. बंधार्याच्या पोटातील या मजल्यामध्ये जाण्यासाठी पायर्यांचा मार्गही आहे. बंधार्याच्या पोटामध्ये अर्ध्या उंचीवर हा जलमहाल बांधलेला असून याच्या खिडक्या नक्षीदार कमानीने सजवलेल्या आहेत. जलमहालाकडे बघितले की प्रसन्न वाटले. . वाढीव पाण्याच्या उपयोग बाहेर जायला "नर-मादी "धबधबा म्हणून केला आहे.खुपच अप्रतिम दृश्य पाणीमहल आणि या धबधब्याचे दिसते.वेगळाच आविष्कार बंधाऱ्यापासून बनविलेल्या पाणी महलाचे व धबधब्याचा दिसतो.
किल्ला महाराष्ट्र शासनाचे राज्य संरक्षित स्मारक आहे..हल्ली किल्ला पहायला जाताना दुतर्फा विविध फुलांची झाडे लावून सावलीची सोय केलेली आहे. मनोवेधक कारंजी आहेत.स्वच्छता ठेवलेली आहे. पर्यटन विकासाला चालना मिळण्यासाठी किल्ला सुशोभित केलेला दिसला.किल्ल्यावर मशीद,मुन्सिफकोर्ट,हत्तीतलाव व इतर ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात...
एक छान पैकी भुईकोट किल्ला पाहून आम्ही हैदराबादकडे प्रस्थान केले.
क्रमशः भाग-६६
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com

छानच वर्णन केले आहे.
ReplyDeleteधन्यवाद व आभार
ReplyDelete