माझी भटकंती नागार्जुनसागर ते श्री शैलम भाग क्र.५६

दक्षिण भारत सहल-दुसरा दिवस व  रात्र
नागार्जुन सागर ते श्री शैलम




माझी भटकंती

🌀🍂🌀🍂🌀🍂🌀🍂🌀🍂
             माझी भटकंती
भाग क्रमांक--५६
             🌹दक्षिण भारत
सन २००१
🔆दुसरा दिवस व रात्र
नागार्जुन सागर ते श्रीशैलम
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
हैद्राबाद मधील प्रमुख ठिकाणे पाहून आम्ही
नागार्जुन सागर धरणाकडे प्रस्थान केले.हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे धरण कृष्णा नदीवर बांधलेले आहे.  गाडी पार्क करून आम्ही धरणभिंतीवर गेलो होतो..सायंकाळचे सुंदर दृश्य विस्तीर्ण जलाशयाचे  बघायला मिळाले. आपल्याच  कृष्णा नदीवरील हे धरण आहे . हे समजल्यावर सगळे आनंदून  गेलो..... आपल्या कडे खळाळत वाहणाऱ्या कृष्णेचे बॅंक वॉॉटर इकडे किती मोठे असेल हे धरण बघितले की लक्षात येते. अथांग जलाशय दिसतो.मस्तपैकी त्या लोकेशनवर फोटोग्राफी केली.... जंगलव्याप्त नदीकोंडा येथे धरण आहे..
  तेथून पुढे आम्ही श्रीशैलमकडे निघालो..... आता जंगलातील रस्ता होता.ठिकठिकाणी वाघांचे  चित्रफलक दिसत होते.त्यात सायंकाळची वेळ .नवखा प्रदेश , येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची वर्दळ अतिशय कमी अन् मनात भिती. त्यामुळे चुकीच्या मार्गाने तर जातनाहीना ही मनात धाकधूक.... रस्त्याने दिसणारे माईलेजस्टोनही प्रादेशिक किंवा इंग्रजीत होते... इंग्रजीत असलेकी खात्री पटायची..वळणावळणाच्या चढ उताराच्या, बऱ्यापैकी रस्त्याने मार्गक्रमण सुरू होते... गाडीतील भक्तीगीते ऐकत , परिसराविषयी गप्पागोष्टी करत होतो.
        साधारणपणे टायगर अभयारण्यातून आम्ही आठच्या सुमारास श्री शैलमला पोहोचलो... ड्रायव्हरने गाडी थांबवली. योग्य जागा मिळतेय का याचा शोध घ्यायला दोघतिघं खाली उतरले... चालत चालत पुढे दोघे गेले.. तिथं एक मंदिर वजा आश्रम होता.इतरही लोक तिथं जेवण बनवित होते.त्यांच्याशी बातचीत केली.ते तिथल्या परिसरातील होते.मग  पिंटूला गाडीकडे परत पाठवून गाडी इकडचं वस्तीला आणायला सांगितली....पाण्याची सोय कुठे दिसतेय का याची  शोधाशोध केली... तर जवळच पाण्याची टाकी दिसली.. उद्या सकाळी नाष्ट्यापर्यत काळजी मिटली....गाडी आल्यावर स्वयंपाकाचे साहित्य खाली घेतले. शाकाहारी जेवणाची तयारी सुरू केली...तानाजी बापूने स्टोव्हवर कुकरमध्ये भात लावला. दुसऱ्या स्टोव्हवर तवा ठेवून वाडकरांना मदतीला घेऊन मी भाकऱ्या करायला सुरुवात केली.बाकीचे कालवण करायला वांगी,बटाटे,कांदे यांची चिराचिरी सुरू झाली. एकजणाला लसूण सोलून खोबरं व आले खलबत्त्यात कुटून मसाला करायला लावला.आपोआपली काम करताना मात्र सगळ्यांचे माझ्या कडे खास लक्ष ! खरच गुरुजींना भाकरी जमतेय का नाय...नाहीतर भातावरच भागवाव लागेल.प्रथम दोन भाकरीचे पीठ एका  मोठ्या ताटात मळून दुसऱ्या ताटात थोडसं पीठ पसरुन मळलेल्या पीठाच्या हुंड्याची भाकरी थापायला सुरुवात केली.. थापून झाल्यावर  उजव्या हातावर उचलून घेऊन गरमतव्यात  टाकली.वरुन भाकरीला पसरुन पाणी लावलं व दुसरी थापायला लागलो. तव्यातील भाकरी उलटी करून  टाकली.थोड्यावेळाने तवा  बाजूला घेऊन स्टोव्हवर शेकवली.जवा पापुडा सुटून भाकरी टम्म फुगली तवा  सगळ्यांना हायसे वाटले.. मस्तच  , बेस्ट अशा उस्फूर्त प्रतिक्रिया सुरूगुरुजी आता काळजी नाय.. मस्तच भाकरी करताय...
कोंढावळे येथे १० वर्षे हातानेच करून खात होतो..
.आत्ता पटल का?,माझा सवाल. मस्तपैकी भात झाला. निंबाळकर व बापूने  वांगं,
बटाट्याचे कालवण फोडणीला दिले.. मी वाडकरांच्या साथीने पंधराएक भाकरी थापल्या. उमेश व विठ्ठलने कांदा ,लिंबू ,काकडी व टोमॅटो सलाड केले.कालवण व भाकरी तयार झाल्यावर द्रोन पत्रावळीत वाढून घेतले.तयार जेवणाची भांडी मधे ठेवून गोल पंगत धरुन जेवण सुरू झाले.. भात,
कालवण-भाकरीवर  खुमासदार चर्चा करत मस्तपैकी जेवलो. मेनू छानच झाला होता.भूकही लागली होती.सगळे अन्नपदार्थ फस्त केले.सगळ्यांचे पोटभर जेवण झाले. नसांगता इतरांनी  स्वच्छता करुन  साहित्य गाडीत ठेवले.गप्पा मारत मारत झोपी गेलो..शुभ रात्री.... भेटूया उद्या...

➖♾️➖♾️➖♾️➖♾️➖श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com

.

➖♾️➖♾️➖♾️➖♾️➖

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड