माझी भटकंती चवदार तळे भाग क्र--७३








[5/12, 10:26 AM] ravindralatinge: 
                     🍂🍀🍂🍀🍂🍀🍂🍀🍂🍀
       माझी भटकंती
                             क्रमशः भाग -क्रमांक ७३

                 🌱  शिरवली व चवदार तळे महाड 🌱
 दिनांक-११ मे २०१७
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
       उन्हाळ्याच्या सुट्टीत श्री रियाज पटेल सरांच्या  कन्येच्या विवाहनिमित्ताने शिरवली ता.महाडला श्री शिवाजी फरांदे सरांच्या गाडीतून निघालो.मी,श्री शिवाजी फरांदे,श्री सुनील जाधव,श्री शिवाजी चव्हाण व श्री दिलीप कासुर्डे बापू  असे आम्ही शिक्षकमित्र पाचजण.
   सकाळी लवकर पांचगणी महाबळेश्वर करुन आंबेनळी घाट व पार घाटातून पोलादपूरला आलो.. पोलादपूरला मस्तपैकी हॉटेलमध्ये पुरी भाजीचा नाष्टा केला..गाडीत  पेट्रोल भरत असताना श्री.विकास शेडगे सरांना शिरवलीला कसे जायचे हे फोनवरून विचारीत असताना एक स्कुटरस्वार शेजारीच रांगेत होता.त्याने मध्येच मला सांगितले," इथून जवळच उजव्या बाजूच्या रस्त्याने सरळ जावा.महाडपेक्षा जवळचा मार्ग आहे.आणि सर ही तेच सांगत होते. नंतर तोच स्कुटरवाला आम्हाला त्याच लग्नात भेटला होता.
      मग आम्ही त्याच रस्त्याने पुढे डोंगररांगातील वाटेने निघालो.
उन्हाळ्यामुळे डोंगर पिवळे काळे दिसत होते...मध्येच हिरवं झाडं बघितली की बरं वाटत होतं... करवंदाच्या जाळ्या दिसत होत्या....पुढे अशीच हिरवाई दिसल्यावर सरांनी गाडी थांबवली..मग आम्ही जवळच्या झाडीत गेलो... छानपैकी करवंदाच्या जाळ्या होत्या.रानमेवा करवंद पाहून मन हरखून गेले..काळीभोर करवंद काट्याकुट्याची तमा न बाळगता हाताने तोडून खायला मजा वाटत होती.थोडीफार पटपट तोडली. ताजी रसदार करवंद खाऊन आम्ही पुढे निघालो..अर्ध्यापाउण तासाने महाड---हर्णे या  २७२ क्रमांकाच्या रस्त्याला येऊन मिळालो.शिरवली फाट्यावरुन गावात आलो...एकजणाला वस्तीचे नांव विचारले...त्याने याच रस्त्याने सरळ पुढे जावा... नदीच्या पलीकडे वस्ती आहे... त्याप्रमाणे आम्ही आलो...ऊन्हाची चांगलीच जाणीव होत होती....जवळच बंधारा होता.सगळेजण  नाष्टा करून जवळच असलेल्या    बंधाऱ्याकडे गेलो.अंदाजे तिनशे फुटावर बंधारा असेल.पाण्यात पाय सोडून दगडावर बसायला मजा वाटत होती.तेवढाच गारवा मिळत होता.अंघोळ करायची खूप इच्छा झाली.पण मनाला आवर घातला.फक्त नेत्रसुख घेत होतो.मस्तपैकी डोंगर पायथ्याच्या बंधाऱ्याचे दृश्य दिसत होते.. रखरखत्या उन्हात वाऱ्याची झुळूक आली की छान वाटायचं.
तिथं मस्तपैकी फोटोग्राफी केली.शिवाने माझा फोटो काढला...
तदनंतर लग्नाच्या कार्याक्रमाला उपस्थित राहून मस्तपैकी जेवण केले.निरोप घेऊन महाडकडे निघालो.महाडमध्ये आल्यावर एका पानपट्टीवर चवदार तळ्याकडे कसं जायचं याची चौकशी केली.तो म्हणाला,या रस्त्याने बाजारपेठ लागेल त्याच्यापुढे थोडं गेलं की तळे आहे.त्याप्रमाणे मग शिवाजीने गाडी बाजारपेठेत वळवली....
   आम्ही चवदार तळ्याजवळ आलो होतो... प्रवेशद्वारच चौकोनी कमान आहे. कमानीतून आम्हाला भारतरत्न क्रांतिसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा समोर दिसला...प्रथमत: तिथं जावून महामानवास  अभिवादन केले.तिथे " हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे." भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर"असे  विचार लिहिलेली संगमरवरी पाटी आहे.तळे पहाताना चवदार तळ्याचा  ऐतिहासिक प्रसंग डोळ्यांसमोर उभा ठाकला. मध्यभागी पुतळा व सभोवताली बांधीव तळे आहे. प्रवेशद्वाराजवळ डाव्या  बाजूला सभागृह आहे.त्यावेळी तिथं  पुस्तक प्रदर्शन भरलेलं होते.. पुस्तक प्रदर्शन पाहताना काही पुस्तके चाळली.त्यातून
रेणू दांडेकरांचे "खेळातून भाषाविकास" पुस्तक खरेदी केले.सभागृहाच्या समोर तीन फलक आहेत.एकावर भारताचे संविधान आहे.दुसऱ्या फलकावर " भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत महाड मधील ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी सहभाग घेतला आणि कारावास भोगला त्या सन्मानियांची यादी आहे." तिसऱ्या फलकावर "भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मार्पण केलेल्या हुतात्मांच्या आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ यादी आहे."
    योगायोगाने समतेचे प्रतिक चवदार तळे व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पहाण्याचा योग आल्याबद्दल मित्रवर्ग समाधानी  व खुश होता.तिथून मुंबई गोवा हायवेला आलो... पोलादपूर वरुन दोन्ही घाटातून महाबळेश्वर, पांचगणी करत वाईत आलो.
क्रमशः भाग-७३
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https:// raviprema.blogspot.com




प्रतिक्रिया

अतिशय छान प्रवास वर्णन सर,शिरवली महाड सुंदर परिसर आहे , शिरवली जवळ कुंभार्डे या ठिकाणी माझ्या नोकरीची सुरुवात झाली , 5 वर्षे त्या परिसरात आणि महाड परिसरात एकूण 10 वर्षे सेवा केली .तुमच्या वर्णनांने जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
   धन्यवाद.
श्री उद्धव निकम सर वाई


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड