माझी भटकंती हैदराबाद प्रवास भाग क्र--५२
दक्षिण भारत सहल--पहिला दिवस हैदराबाद प्रवास
ओझर्डे-वाठार-फलटण-पंढरपुर-सोलापूर-नळदुर्ग-उमरगा मार्गे--हैद्राबाद
पहिला दिवस
🌱🍂🌱🍂🌱🍂🌱🍂🌱
माझी भटकंती
क्रमशः भाग- ५२
♾️➖♾️➖♾️➖♾️➖♾️
दक्षिण भारत
सन २००१
पहिला दिवस
ओझर्डे--ते पंढरपूर प्रवास
ओझर्डे गावातील आम्ही मित्र मंडळी नेहमी सकाळी आणि सायंकाळी आमचे मित्र प्रमोद निंबाळकर यांच्या दुकानाशेजारी गप्पागोष्टी करायला जमत असू. मी शिक्षक अधिवेशनला गोवा, जयपूर अजमेर, नागपूर व कोकणात गेलोलो होतो.. गावातील हौशी पर्यटकही तिरुपती बालाजीला फिरायला जात असत.. देवदर्शन व धार्मिक तीर्थक्षेत्र भेटी होत. बोलता बोलता विषय फिरायला जाण्याचा निघाला..मग चर्चेला उत आला... दिल्ली करुया, गोवा व कोकण करुया, नाहीतर बालाजी म्हैसूर उटी इत्यादी ठिकाणांवर चर्चा करून सर्वानुमते दक्षिण भारत करुया...दिवाळी झाल्यावर निघूया... चार-पाच दिवसांपासून फिक्स करायला सुरुवात केली की नावात बदल होयचा... पैश्याची जुळवाजुळव करायला लागायची..मग कमी खर्चाची कशी काढता येईल याच्यावर गप्पा...शेवटी शेवटी बेत रद्द व्हायचा....पुन्हा जमलोकी नव्याने चर्चा सुरू...
काहीवेळा योगायोगाने " योग" जुळून येतो..अन् तसेच झाले.. ट्रीप कमी खर्चाची कशी काढता येईल याच्यावर चर्चा घडविली.. सगळं आपण बनवायचं, बाहेर जेवायला व लॉजिंगला खर्च करायचा नाही.वायफट खर्चास आळा घालायचा..जेवण साहित्य व फराळाचे पदार्थ बरोबर घ्यायचे...या तयारीवर आमचे दक्षिण भारत फिरायला जायच निश्चित झाले..प्रिन्स टेलर्स,वाई यांची नवीखट टेम्पोट्रॅक्स प्रति किमी दराने ठरविली.दिवाळीचे सणासुदीचे दिवस झाल्यावर दोन दिवसांनी निघायचे निश्चित केले.ही ट्रीप कायम आमच्या स्मरणात आहे.कारण अल्प खर्च, नाष्टा व जेवण बनवून खाणे व गरजेपुरते लॉजिंग...
ट्रीप मध्ये नाष्टा व जेवणाचे सर्व मटेरियल व बनविण्यासाठी भांडी ,कुकर व स्टोव्ह इत्यादी साहित्य घेतले होते.भाजीपाला, तिखटमीठ व कांदेही..... तहानलाडू भुकलाडू म्हणून चिवडा,लाडू,चकली,कानावले, मसाला वड्या,चिरुटे, भाजक्या शेंगा,शिजक्या शेंगा व अनारसे हे खायचे पदार्थ खास घरी बनविलेले घेतले होते. दोन सतरंज्या,प्रत्येकाच्या बॅगा व पिशव्या.एवढ साहित्य कॅरिअरवर बांधून सकाळचं जेवण उरकून आम्ही नऊजण व श्री बेलोशे ड्रायव्हर अकराच्या दरम्यान निघालो.... जोशी विहीरला आल्यावर समजले की वाठार रस्ता बंद आहे कारण घाटात अपघात झालाय.मग हायवेने वेळ्यातून सोळशीमार्गे वाठारला निघालो...टेपवरील गाणी ऐकत आम्ही निघालो... सहलीला समवयस्क व तरुण मंडळी होती.मी,श्री शिवाजी फरांदे ,श्री तानाजी कदम ,श्री विठ्ठल कदम, श्री प्रमोद निंबाळकर, श्री प्रविण वाडकर,श्री उमेश जाधव,श्री सुहास लोखंडे (पिंटू) , मुकेश गुरव असे अक्षय संख्येत (९) आणि बेलोशे गाडी चालक असे दहाजण होतो.दक्षिण भारतातील हैदराबाद,श्रीशैलम, तिरुपती बालाजी, म्हैसूर,उटी , श्रवणबेलगोला पर्यंत आणि रिटर्न चित्रदुर्ग मार्गाने ,धारवाड व बेळगाव कोल्हापूर ओझर्डे अशी नियोजित होती..सहलीत एकमेकांची चेष्टामस्करी करायला पिंट्या, वाडकर आणि बापू तयार . गावागाडा,शेती, क्रिकेट व राजकारण यांविषयी गप्पागोष्टी करत हसत खिदळत , चेष्टा मस्करी करत प्रवास सुरू....गाडीत दररोज गरजेनुसार इंधन भरणेचे काम एकाकडे, सर्वासाठी आवश्यक खरेदी एकाकडे आणि चहापाणी एकाकडे असं नियोजन केलेले होते.
वाठार वरून फलटण करत ड्रायव्हरला पंढरपूर आल्यावर थांबव असं अगोदर सूचना देऊन सांगितले.ड्रायव्हर शेजारी दोन ड्रायव्हर त्यामुळे मागील मंडळी निवांत होती...मागं चौघेजण गप्पागोष्टी करत.... मधल्या सीटवरील डुलक्या काढत...असा आमचा प्रवास रमतगमत सुरु होता.
क्रमशः भाग--५२
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com

मस्तच नियोजन. स्वयंपाक करायचं
ReplyDeleteलो बजेट सहल
ReplyDelete