माझी भटकंती लेख मालिका ५० मान्यवरांच्या प्रतिक्रिया

माझी भटकंती लेखमालिका  ५० वी मान्यवरांच्या प्रतिक्रिया.
[6/3, 9:34 AM] tambe sir:

            माझी भटकंती लेख मालिका

    याबद्दल मान्यवरांच्या प्रतिक्रिया

     सहल,निसर्गदर्शन,गप्पागोष्टी खूप छान वर्णन
50 भाग पूर्ण....सुट्टीत सुद्धा आपल्या लेखनामुळे निसर्गदर्शन घडले .
आपली लेखणी अशीच बहरत राहो...🖋️
श्री गणेश तांबे सर फलटण

[6/3, 10:02 AM] sunil shedge:
छान शब्दांकन!
अर्धशतकी वाटचालीबद्दल मनःपूर्वक
अभिनंदन!
*'रन मशिन' सुरूच राहो!*
श्री सुनील शेडगे पत्रकार शिक्षक मित्र, सातारा

💫💫💫💫💫💫
   यथार्थ वर्णन....
    लटिंगे सर..आज आपल्या भटकंतीचे अर्धशतक पूर्णत्वास गेले.आपल्या अखंड लेखनास कुर्निसात ;आणि पुढील लेखनास शुभेच्छा...
   कोरोना काळात आपल्या भटकंतीने महाराष्ट्र दर्शन घडविले.प्रवास वर्णन करण्याची क्षमता आपल्या लेखणीत ठासून भरली आहे..
    'माझी भटकंती' पुस्तक रूपाने प्रकाशीत झाली तर,आम्हा वाचकांसाठी एक पर्वणी असेल...
    भटकंतीच्या शतक पूर्तीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा...
श्री अमोल माने वाई सातारा
👏👏👏👏👏👏👏👏
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻


[6/3, 4:47 PM] Sharad Potdar: *
 भटकंती लेखन मालेच्या माध्यमातून तब्बल पन्नास दिवस लेखन करणारे श्रीमान रविंद्रजी लटिंगे सरांमधील लेखकाला सलाम....*

वाऱ्याच्या झुळकीने मन सुखावते ... झाडाच्या सावलने मन विसावते ...आणि सूर्याच्या कोवळ्या किरणांनी मनाला प्रसन्नता वाटते...निसर्गात सहज घडणा-या या घटना असल्यातरी निसर्गाच्या कुशीत गेल्यावरच त्याचा आनंद लुटता येतो.
        जागतिक कोरोना संकटामुळे कधीनव्हे ते सारं जग स्तब्ध झाले . कित्येकांना हा कालावधी जखडल्यासारखा झाला , परंतु वाॅट्सअॅप वरील भटकंतीच्या माध्यमातून अनेक शिक्षकांनी आपल्यातील सुप्त लेखनकौशल्याव्दारे अनेकांना अचंबित केले.या लेखनप्रपंचात एक दोन नव्हे तर तब्बल पन्नास दिवस अखंडपणे सह्याद्रीच्या कुशीतील ज्ञात अज्ञात ठिकाणांचे प्रवास वर्णन भटकंतीच्या माध्यमातून लेखन करीत निसर्गातील छोट्या छोट्या गोष्टीचे सहजपणे बारकावे टिपले ते भटकंतीवेड्या श्रीमान रविंद्र लटिंगे सरांनी....
      आपल्या शिक्षकीपेक्षात ध्येयवेडे काम करीत असताना बदलीच्या माध्यमातून वीसएक वर्षापूर्वी  केलेली भटकंतीला या लेखनव्दारे या कस्तुरीमृगाने सकल आसमंत दरवळणून टाकला.
    सह्याद्रीच्या पर्वतरांगा पायाखाली तुटवताना प्रत्येक पावलांचा लिखीत हिशोब मांडण्याची उबजत कला हा लाॅकडाऊन नसतातर कदाचित आमचेपर्यंत पोहचलीही नसती. माडगणीचे प्रवासवर्णन , मांढरदेवी मार्गेकेलेला भोरचा प्रवास, घेराकेंजळ- ओहळीचे वर्णन, रिंगरोडची भटकंची, रांजणघळी,  समुद्रवर्णन अशा कित्येक गोष्टीचे शब्दांकन करताना नवनवीन शब्दसंपत्ती वापर करावा तो फक्त आणि फक्त याच स्नेहीजणाने...
     भटकंती वर्णन तसा कित्येकदा अवाचनीय विषय परंतु शब्दफुलांच्या लेखन मालेत कित्येकांनी ती आपलीशी केली व उस्फुर्त प्रतिक्रियामुळे आपल्यातील लेखन कला अतिउच्चतम दर्जाची आहे हे सांगण्यासाठी कुणा परिक्षकाची गरज न पडावी...
       आपले प्रवासवर्णन असेच स्वरातील श्वास, फुलातील गंध, गंधातील रंगाप्रमाणे रंगत जावो हीच सदिच्छा ....
    श्री .शरद पोतदार,  बावधन


[6/3, 4:50 PM] sunil shedge:
*पोतदार सर!*

लटिंगे सरांच्या लेखनप्रपंचाचा समर्पक शब्दांत वेध.

श्री सुनील शेडगे पत्रकार शिक्षक मित्र , सातारा
👌👌👌👌👌
[6/3, 4:51 PM] rajendra vakde:

   माझी भटकंती,
या प्रवास वर्णन मालिकेचे 50 भाग पूर्ण झाले बद्दल खूप खूप अभिनंदन..... सर असेच लिहीत राहा,तुमच्या लेखणीत साधेपणा आहे ,सच्चेपणा आहे त्यामुळे तुमचे लेखन मनाला भावते...💐💐💐👍👍👌👌...राजेंद्र वाकडे तारळे.


[6/3, 12:07 PM] Smita jadhav:

 मा.लटिंगे सर...
सारे शब्द तसे सारखेच पण त्याला अनुभवाची झालर जोडली की एक अप्रतिम आविष्कार निर्माण होतो...याचीच प्रचिती आपल्या *माझी भटकंती...* या लेखमालेतून झाली...आज बघता बघता त्याचे 50 भाग पूर्ण झाले...

या लॉक डाऊन मध्ये ही घरबसल्या भटकंती झाली ती फक्त तुमच्या जिवंत लेखनशैली मुळेच...शब्दांची संपत्ती, त्याची योग्य गुंफण,आणि तो प्रसंग वाचकाच्या नजरेसमोर जिवंत करण्याचं सामर्थ्य हे आपल्या लेखनाचं वैशिष्ट्य... आपले सारे व्याप बाजूला सारून जेव्हा मनुष्य आपल्या अंतरंगात डोकावून पाहतो  तेव्हा स्वत:ची जी "ओळख" होते, ती वास्तव स्वत:ची "ओळख"...

वाक्यरचना कशी करायची हे व्याकरण शिकवते, का करायची हे विचार सांगतो. मला नेहमीच विचारांचा मोह पडतो. माणूस विचारांनी वाढतो, व्याकरणाने नाही....हे व.पु.चं वाक्य अगदी यथार्थपणे आठवतं...

असं विचारांनी समृद्ध होण्याची संधी ही आपल्या लेखमालेच्या निमित्ताने मिळाली...

आपल्या पुढील वाटचालीसाठी आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा...
  💐💐
स्मिता जाधव मॅडम वाई

[6/3, 12:39 PM] Raja Kshirsagar:
   🌲🐿️🌴☘️🌞🐉🐿️🎍.

       *माझी भटकंती
*आजच्या गतिमान कालखंडात एखाद्या गोष्टीवर लेखन करुन त्याचे अनुभव हुबेहुबपणे मांडणी करून lockdown खरा उपयोग , माझी भटकंती या सदरात मा. श्री लटिंगे सरांनी १ते५० भागात अगदी सहज प्रवास वर्णन पर्यटन याची माहिती जणू प्रत्येक्षात भेट देऊन पहिल्या सारखी वाटली*
   *सर आपल्या लेखणीतून अशीच लेखन माला फुलत राहो*

श्री राजेन्द्र क्षीरसागर कवठे वाई

🎄🎍🌲☘️🌴🐿️💐
[6/3, 12:48 PM] Potdar bhaskar:
   🌹भटकंती भाग---50 🌹
माझा सखा श्रीमान रविंन्द्रजी लटिंगे सरांनी लाॕकडाऊनच्या काळामध्ये एक सुंदर असा उपक्रम राबविला ...
👆आजपर्यंत त्यांनी केलेले पर्यटन याचे सुंदर असे वर्णन जसेच्या तसे ...जे पाहिले ते लेखनीतून उतरविले
👆आपणही ब-याच ठिकाणी फिरतो पण त्याचे फोटो संग्रही करून ठेवणे व प्रवासवर्णन करून ठेवणे हे कठिन काम असते ..जे माझ्या मिञाने लिलया पार केले ..
👌मिञा माझाही तुझ्याबरोबर भटकंतीचा खूप वेळा योग आला अगदी गुजरात ..राजस्थान असो की ...माडगणी डोंगर असो ...तुझ्याबरोबर फिरण्याचा आनंद एक वेगळाच असतो ...👆इथून पुढेही तुझ्याबरोबर फिरण्याचा आनंद मला लाभो हीच अपेक्षा !!!!!
👆आत्तापर्यंतच्या सर्वच भागामध्ये पर्यटनाचे केलेले वर्णन हे सर्वांना दिशादर्शक असेच होते ..
👆लोकांना पर्यटनाला कुठे जायचं आहे ..हे माहीत आहे परंतु तिथं जाऊन नेमकं काय पहायच ...हे माहीत नसतं...जे आपल्या लेखातून सगळ्यांना माहीत झालं
👆मिञा तू स्वतः हुशारच आहेस  परंतु तुझी ही हुशारी तू स्वतःपूरती मर्यादित न ठेवता दुसऱ्यांना पण वाटतोस हा तुझा मोठेपणा आहे .,आणि शेवटपर्यंत तुझ्याजवळ असलेले ज्ञान वाटत रहा हीच अपेक्षा 👏👏
👆आज भटकंतीचा 50 वा भाग मिञा तू पूर्ण केलास ........म्हणून तुला या माझ्याकडून शब्दरूपी सदिच्छा !!!!!
🌹इथून पुढेही असच लिहीत जा आम्ही वाचत जाऊ. पुन्हा एकदा तुला या भटकंतीच्या लेखनाबद्दल मनापासून खूप खूप शुभेच्छा !!!!

🌹तुझा सखा....भास्कर पोतदार वाई
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


[6/3, 12:56 PM] Vikram Nayakwadi:
 Latinge Sir Nice series of  Writing  traveling blog. We enjoyed your ethos n will be eager to Read more from You.📖📚📒
shri Vikram Nayakwadi,wai

[6/3, 1:16 PM] Sunil jadhav sir:

 🙏 *मार्गदर्शक मित्रवर्य आदरणीय लटिंगे सर.......* 🙏
   जगाच्या एका देशातून   प्रवास करत करोना  आपल्या भारत देशात येऊन पोहोचला. केंद्र व राज्य शासनाने  लाँकडाउन करण्यास सुरुवात केली.  या लाँक  डाऊन मध्ये आपल्या शाळाही लाँक झाल्या. *माझी भटकंती* या सदराखाली  अनुभव पूर्ण अनेक विविध लेख लिहिण्यास व लेखनमाला सुरु करण्यास आपणास एक सुवर्णसंधीच मिळाली.  मी तर या सदराला *'घरबसल्या भटकंती'*  असेच समजतो. कारण या लाँक डाऊन च्या काळात  वीकेंडला अथवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लोकांच्या भटकंती करण्याचा सहली आयोजन करण्याचा हक्कच या काेरोनाने काढून घेतला. आणि सुरु झाले सदर *'माझी भटकंती'* . आपल्या भटकंतीचा प्रत्येक भाग हा खुप लांबचा प्रवास करणारा अथवा देशाबाहेर घेऊन जाणारा नव्हता. आपल्याच आजूबाजूचा परिसर, गड- किल्ले पर्यटन स्थळे,  मित्रांसमवेत काढलेल्या सहली, कुटुंबासोबत केलेले निसर्ग पर्यटन हे आपण आपल्या लेखणीतून व रवींद्र raviprema.blogspot.com ब्लॉगच्या माध्यमातून घर बसल्या सर्वांच्या माहितीसाठी उपलब्ध करून दिले. या लेखांतून आपण विविध ठिकाणे लोकांसमोर मूर्तिमंत रूपाने जिवंत केलीत. त्याच बरोबर या ठिकाणी प्रत्येकाने कसे गेले पाहिजे ? काय पाहिले पाहिजे? निसर्गाच्या अविष्कार पाहताना जीवनात आनंद कसा निर्माण केला पाहिजे? याची इत्थंभूत माहिती व मार्गदर्शन आपल्या या लेखांच्या विविध भागांतून  केलेला एक यशस्वी प्रयत्न वाखाणण्यासारखा आहे. माझी भटकंती यातील काही भागात मी सरांबरोबर चा जोडीदार व साक्षीदारही आहे. आपल्या प्रत्येक भागात आपण व्यक्त केलेले लेखन, प्रत्यक्ष अनुभवांनी शब्दांची केलेली गुंफण खरोखर वाचनीय अशी आहे.  आपल्या प्रत्येक लेखात 'जे आहे ते आहे, नाही ते नाही' म्हणजेच 'जसंच्या तसं' आपण मांडलेले आहे. बघता बघता माझ्या भटकंतीचे आपण पन्नास भाग पूर्ण केले. त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन!💐
  या सर्व लेखांची एक जंत्री व्हावी व नवीन नावाच्या शीर्षकाखाली एक पुस्तक प्रकाशित व्हावे एवढीच मनोमन इच्छा आहे.आपल्या विचारांनी समृद्ध होण्याची संधी ही  आम्हा सर्वांना लेखमालेच्या निमित्ताने मिळाली...
आपल्या या पुढील  लेखनास व वाटचालीसाठी माझ्याकडून आपणांस

मनःपूर्वक शुभेच्छा!...? सुनील जाधव (चांदवडी )ता.वाई
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
 


[6/3, 1:29 PM] Lalita Gayakwad:
सर आपणास प्रथम धन्यवाद 🙏कारण केंद्राच्या या सहलीला मी नव्हते याची मला खन्त होती, आपल्या अवर्णनीय  लेखनशैलीने ती उणीव आज भरून काढली, केंद्रात सर्व सह्काऱ्यारांबरोबर काढलेले ते सुंदर दिवस आठवले, तालुक्याबाहेर गेल्यानंतर आलेला एकटेपणा, उदासीनता आपल्या लेखनशैलीने थोडीफार कमी होते, असो तुमच्या या कार्याला शुभेच्छा .
                   सौ ललिता गायकवाड वाई
💐💐💐💐💐🙏🙏🙏
[6/3, 2:04 PM] Shashikant kadam:
   🌹भटकंती विशेष 🌹
*मा.श्री . रविंद्रकुमार लटींगे* सर नमस्कार !  आपल्या *भटकंतीचे* अर्धशतक पूर्ण झाले. भटकंतीचे अर्धशतक पूर्ण करणे आणि ते इतरांना भावेल असे लेखणीतून उतरवणे हे सोपे नव्हे .ते आपण लिलया केले !खरंच मनपूर्वक *अभिनंदन आणि धन्यवाद* सर !                     " *निसर्ग आपला मित्र आहे त्याचे संवर्धन करा"* हाच संदेश नकळत आम्हाला दिलात. निसर्ग तंतोतंत रेखाटता येत नाही, टिपता येत नाही, वर्णनही करणे  अशक्यच...प्रत्यक्ष तो अनुभवावा लागतो, परंतु आपल्या प्रगल्भ लेखनशैली आणि निरीक्षण क्षमतेने आम्हालाही घरबसल्या अनुभवता आला.सर्वांत अवघड गोष्ट नियोजन, पण भटकंतीच काय कोणत्याही कार्यक्रमाच्या नियोजनात आपण कार्यनिपुण आहात. आपला एक सहकारी म्हणून अनुभव आहेच  आहेच.गडकोट,किल्ले , पर्यटनस्थळे यांची यथायोग्य  माहिती या लॉकडाऊन काळात आम्हाला मिळाली.  घरबसल्या हे अनुभवता आलं आणि ताण- तणावही दूर झाला.        सवंगड्यासोबत भटकंती    म्हणजे  जीवनातील फार मोठी पर्वणीच! पण   *आई -वडील आणि कुटुंबासोबत पर्यटन म्हणजे कर्तव्यपरायणता* !अशा खूप गोष्टी आपणाकडून शिकण्यासारख्या आहेत . आपल्या भटकंतीचा ठेवा पुस्तक रूपाने चिरंतर रहावा आणि असीच अनुभूती आपल्या भटकंतीतून मिळावी हीच सदिच्छा!!  ...केल्याने देशाटन                     🌹📒🖊️🌹                           ..शशिकांत कदम बावधन। दिनांक :-3 जून 2020


खरंच आहे लटिंगे सरांचे प्रवास वर्णन म्हणजे लॉक डाउन च्या काळात मित्रांसाठी पर्वणी होती, ज्यांना भटकण्याची हौस आहे आणि सह्याद्रीच्या दऱ्या डोंगर ज्यांना नेहमी खुणावतात  त्यांच्यासाठी मार्गदर्शक आहेच परंतु मित्रांसाठी हक्काचे वाटाड्या आहेत.सर लेखनप्रपंच सुरेख जमला पुढील लेखन कार्यासाठी शुभेच्छा.
श्री उद्धव निकम वाई फेसबुक वरुन साभार.



Comments

  1. छानच अभिप्राय आहेत.

    ReplyDelete
  2. मस्तच भटकंतीचे कौतुक

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड