माझी भटकंती तिरुपती बालाजी ते कोईम्बतूर भाग क्र--५९

दक्षिण भारत सहल-चौथा दिवस तिरुपती
बालाजी ते कोईम्बतूर

🌱🛕🌱🛕🚩🌱🛕🌱🛕🌱
माझी भटकंती
क्रमशः भाग-५९
                         दक्षिण भारत सन २००१
               चौथा दिवस
🍁〰️🍁〰️🍁〰️🍁〰️🍁   
तिरुपती बालाजी ते कोईम्बतूर




 भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान . देशी विदेशी पर्यटक व भाविक श्रद्धेने भेट द्यायला येतात.. तिरुमला टेकडीवर मंदिर आहे.. मंदिर  बांधकाम शैली वेगळी  उंच गोपुरे,भव्य सभामंडप व गाभारा, भाविकांना सर्वत्र आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध...स्वच्छता व टापटीप वाखाणण्याजोगी.. सकाळच्या प्रसन्न वातावरणात देवदर्शन करण्यासाठी रांगेकडे निघालो.... भलीमोठी रांग लागली होती...कुपन घेण्यासाठी गेलोतर..दोन दिवसांचे अॅडव्हान्स बुकिंग आहे... दोन दिवसानंतर चे बुकिंग होईल.. मग सर्वांशी चर्चा केली.. दोन दिवस रहायला कोणाचीही तयारी नव्हती... त्यामुळे मनोभावे मुखदर्शन व कलशदर्शन घेतले... परिसरात छानपैकी फोटोग्राफी केली.. महाप्रसाद घेतला...प्रसादाचे लाडू खरेदी केले.सर्वांनी धार्मिक वस्तुंची खरेदी केली.. तलावाजवळ आलो.तिथजवळच डोक्यावरील केस कापण्याचे काम सुरू होते.भाविक श्रद्धेपोटी केस दान करतात. दानधर्मासाठी प्रसिध्द मंदिर....आमच्यातही काहीजणांना ते पाहून इच्छा झाली.दोघं जावून चौकशी करून आहे....पण सर्वांचं मन तयार होईना म्हणून बेत रद्द केला..तिथेच भोजनकक्षात जेवण केले.दृष्टीस पडलेल्या एसटीडी बुथवर जावून काहींनी घरी फोन करून सहलीची संक्षेपाने माहिती दिली. निंबाळकरांच्या  दुकानात जाऊन आण्णा किंवा दिलीप सांगा,म्हणजे ते इतरांच्या घरची माणसं दुकानात आल्यावर  आवर्जून निरोप देतील...मग पुढील प्रवासाची चर्चा सुरू झाली.
बॅंगलोर वरुन म्हैसूर उटी करण्यापेक्षा आपण दुसऱ्या मार्गाने डायरेक्ट उटीला जावून म्हैसूरला येवूया.असं माझं मत,अंतर जास्त आहे रात्रीचाही प्रवास करावा लागेल. यावर बराचवेळ खल झाला...मग सहमती झाली..इतर कोणत्याही ठिकाणी भटकायला न जाता उटीपर्यत प्रवास करायचा....या प्रमाणे रस्त्याने चौकशी करत करत ,नकाशातील रुटप्रमाणे  वेलोर,सेलम  करत मार्गाला लागलो...
        नेहमीप्रमाणे हसतखिदळत गप्पामारत प्रवास सुरू झाला.
  आम्ही आता दोन्ही राज्यांच्या सीमेवर होतो. तमिळनाडूत प्रवेश करते वेळी पोलीसांनी आमची गाडी आडवली.प्रवासात प्रथमतःगाडी थांबवली. ड्रायव्हरला कागदपत्रे मागितली ,.टुरिस्ट आहोत."फिरायला आलोय मामा असे "पुढची दोघं म्हणाली. ड्रायव्हर कागदपत्रे घेऊन खाली उतरून साहेबांकडे गेला.पंधरावीस मिनीटांनी तो आला.चेहऱ्यावरुन समजले की  तोडपाणी झाले असावे..
. पोलिसांनाच  वेल्लोरचा  मार्ग विचारुन पुढे निघालो..  प्रवासात कंटाळा येऊ नये म्हणून दोन तासांनी ड्रायव्हर बरोबर तलफवालेही चहा प्यायला जायचे.

  वेल्लोरला प्रसिद्ध किल्ला आहे.जिल्हयाचे प्रमुख ठिकाण.ऐतिहासिक व सांस्कृतिक शहर.अभयारण्य आहे.. पहायला न जाता  पर्यटन पुस्तकातील माहितीचा वेध घेत वेल्लोर वरुन आम्ही सेलमकडे निघालो...
          सेलम आल्यावर हळदीवर चर्चा सुरू..
सेलम जिल्ह्यातील हळदीचे बियाणे प्रसिद्ध आहे.भरपुर उत्पादन देणारे बियाणे...वितभर लांब हळद असते.आमच्या भागातले हळद बागायतदार इथून बियाणे आणतात.छानपैकी सूर्यास्ताचा देखावा दिसत होता... रात्रीच्या जेवणाची सोय करण्यावर चर्चा चालली...कालचाच बेत रिपीट केला.. रस्त्याने जाताना खरेदीसाठी थांबून गरजेचे साहित्य खरेदी केले. योग्य ठिकाण शोधायची कामगिरी पुढं बसणाऱ्यांना सांगितली. . थोड्या वेळाने दोन-तीन ठिकाणी गाडी थांबवली पण ती जागा  पसंत न पडल्याने पुढे निघालो.. तदनंतर पसंतपडलेल्या  योग्य ठिकाणी उतरून सर्वांनी मिळून  स्वयंपाक बनविला. मस्तपैकी गप्पाटप्पा करत जेवण केले.ड्रायव्हरलाही दोन तासांची विश्रांती मिळाली.. आवराआवर करून रात्रीचा प्रवास सुरू झाला.
लाॅंगड्राइव्ह नंतर
विठूने गाडी थांबवायला लावली.तो आलोच  म्हणून बाहेर पडला.हेडलाईटच्या  प्रकाशात त्याला पुढे पुल दिसला. इथच थांबूया.लयं वेळ झालाय.ड्रायव्हरला जरा  आराम करुद्या. इथं नदी आहे.उजाडल्यावर अंघोळ करून पुढे जावू. त्याची आज्ञावजा सूचना शिरसावंद्य मानून गाडी बाजूला लावून उजडायची वाट बघत साखरझोप कधी आली हे समजून आले नाही....
क्रमशः
क्रमशः भाग-५९
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड