काव्य पुष्प २१५ भावपूर्ण श्रद्धांजली शहीद वीर


           





भावपूर्ण आदरांजली !

शहीद वीर सोमनाथ तांगडे


तुझ्या शौर्याला साश्रुनयनांनी निरोप


तिरंगा लपेटून तु जन्मभुमीत आला 

पराक्रमाने तिरंग्यास अभिमान वाटला

तांगडे (जगताप) परिवाराचा लाडला

सवंगडी मित्रांचा तु सखा दिलवाला||


मातृभूमीच्या सुपूताला मानवंदना करायला 

शौर्याचा गौरवशाली पराक्रम पहायला 

 समदा भावविवश स्नेहीपरिवार लोटला

अखेरचा साश्रुनयनांनी निरोप द्यायला||


ओझर्ड्याची माती आज पावन झाली

 देशाच्या रक्षणासाठी कामी आली 

शर्थिने झुंज देऊनही प्राणज्योत मालवली

तुझ्या पराक्रमाची शौर्य गाथा झाली||


शहीद वीर झालेल्या मातेच्या बाळा

मित्र,गावकरी नातेवाईक झाले गोळा 

तुझ्या शौर्याभिमानाचा सोहळा बघायला 

आदरांजली अर्पूणी तुझे गोडवे गायला ||


आई वडिल बंधूंवर आभाळ कोसळलं

पत्नीच्या आक्रोशाने मन हेलावलं 

मुलींचे निरागस चेहरं आरक्त झालं

तुझं जाणं बहिणींच्या जिव्हारी लागलं||


तरुणांना दिली तू देशभक्तीची प्रेरणा 

सदैव चिरंतन स्मृती राहतील जनमना

कृष्णामाई नदीचे तट,अन् डोंगर कडे

तुझ्या शौर्याचे गुणगान गातील पोवाडे ||





Comments

  1. खूप सुंदर भावस्पर्शी शहीद तांगडें ना आदरांजली

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड