प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काव्य पुष्प २१४
प्रज्ञासूर्य, उच्चविद्याविभूषित, महामानव,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!
देशाच्या संविधानाचे शिल्पकार
दिनदलितांचे कैवारी झाले
बाबासाहेबांच्या जन्म आम्हाला
न्याय आणि हक्क देऊन गेले||
अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर
उच्चविद्याविभूषित किताब मिळविले
दिनदलित गोरगरीब वंचितांच्या
न्याय्य हक्कासाठी सदैव झगडले ||
स्वातंत्र्य,समता बंधुतेचा पुरस्कार करुन
बांधवांचा आत्मसन्मान जागविले
शिका संघटित व्हा संघर्ष करा संदेशाने
गोरगरीब जनतेचे कल्याण केले||
पुस्तकांच्या मैत्रीने राजगृहाला
वाचनालय ग्रंथालय बनविले
विद्वत्तेच्या तेजाने परखडपणे
आपले विचार व्यक्त केले ||
मानवतावादी माणूसकीची पूजा करून
ताठ मानेने जगायला शिकविले
अस्पृश्यता निवारणाचे कार्योध्दारक
दिनदलित गोरगरीबांचे रक्षण केले||
स्वातंत्र्य,समता,बंधुतेची शिकवण देणारे
प्रज्ञासूर्य, महामानव आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर….आपल्या बहुमोल कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे!
Comments
Post a Comment