लेखन वर्धापनदिनानिमित्त
🍀🌿🍂🍃🌿🌾🍃🍂🍀🌾🌿🍃
आज १४ एप्रिल२०२१ क्रांतिसूर्य, प्रज्ञासूर्य,उच्चविद्याविभूषित,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती त्यानिमित्ताने पावनस्मृतीस विनम्र अभिवादन!
आजच्या दिनाचे दुसरे एक अवचित्य….
कोवीड१९ संसर्गजन्य आजारांपासून गेली वर्षभर आपण आभासी पध्दतीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधून हितगुज करतोय.मैत्रीतल्या मोजक्याच दोस्तांशी कर्मधर्मसंबंधातून भेटी घडलेल्या असतील.
या वर्षभरात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग 'वर्क फ्रॉम होम 'करत छंदाचा व्यासंग करायला फारच उपयोग पडला.आत्तापर्यतची निसर्ग भटकंती,पर्यटन आणि प्रवास यावरील साठवणीतल्या आठवणी मनात रुंजी घालत होत्या.त्या 'माझी भटकंती'या शिर्षकाने सोशल मिडीयावर प्रदर्शित केल्या.तसेच प्रवास वर्णनाचे लेखन करताना सहज प्रयत्न करुया म्हणून निसर्गात भटकंती केलेल्या ठिकाणांची स्मृती रहावी म्हणून वेचक वेधक टिपलेल्या छायाचित्रावरुन कविता करण्याचा प्रयत्न केला.एकोळी करत करत चार-पाच कडवी करण्याचा प्रयत्न केला.स्वत:आनंदानुभव घेऊन इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न केला.ते लेख आणी कविता सोशल मिडीया (फेसबुक,
व्हाटसअप समुह आणि ब्लॉग )वर प्रदर्शित केले.त्या लेखन अभिव्यक्तीला आज एक वर्ष पूर्ण होतंय.
या काळात अनेक शिक्षकमित्रांनी वेळोवेळी दिलेल्या प्रतिक्रियेने लिहिण्याचे बळ,उर्मी निर्माण झाली.विशेषत:उपक्रमशील शिक्षक पुस्तकाचे लेखक श्री सुनील शेडगे अप्पा, केंद्रप्रमुख श्री दीपक चिकणे साहेब,आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री गणेश तांबे सरांनी वेळोवेळी प्रेरक मार्गदर्शन केले.त्यामुळे लेखनातील बारकावे टिपण्याची सजगता मिळाली.
श्री माझे डीएड वर्गमित्र दीपक भुजबळ बापू,श्री शिवाजी निकम आणि श्री उध्दव निकम,श्री शरद पोतदार,श्री शशिकांत कदम,
श्री राजेन्द्र क्षीरसागर,श्री सुनील जाधव,केशव कोदे,श्री संतोष शिंदे,श्री अमित कारंडे,श्री श्रीगणेश शेंडे,श्री संतोष ढेबे,श्री राजेन्द्र बोबडे सर,श्री राजेन्द्र वाकडे सर,श्री महादेव भोकरे सर,श्री राजेन्द्र गुरव सर,श्री नितीन जाधव सर, दत्ता राजगुरू सर,श्री सचिन गोसावी सर,श्री धर्मेंद्र दिक्षीत,गुरुवर्य साहित्यिक श्री रमेश जावीर सर या बंधुतुल्य मित्रांची दररोज लेखन करुन समुहावर शेअर करण्याची इच्छा आणि सदिच्छा! यांच्यामुळे अनेकदा व्यक्त होण्याची संधी लाभली.
अनेक शिक्षक मित्र,फेसबुक मित्र,शिक्षक हितगुज समूह,उपक्रमशील शिक्षक समुह,
क्रांतिस्मृती डी.एड.कॉलेज समुहातील सर्व अध्यापक मित्र,अभामसापचे सातारा जिल्ह्यातील सर्व सदस्य (वाचक,लेखक,कवी )
आणि छांदिष्ट समुहातील सर्वांच्या वेळोवेळी मौलिक सूचना,सल्लाआणि प्रतिक्रियेने वर्षभर लेखनप्रपंच घडला.ज्यांच्या सोबत भटकंती करण्याचा आनंद घेतला त्या'अॅमिक्याबिलीटी' परिवारातील सदस्य,कलाविष्कार क्रिकेट क्लब ओझर्डेचे सर्व मित्र परिवार,आणि माझे कुटुंबीय आणि सोशल मिडीयावरील सर्व रसिक वाचक मित्रांना मनःपूर्वक धन्यवाद!
थोड्याच दिवसात "हिरवी पाती" कविता संग्रह आणि "पाऊले चालती" हे प्रवास वर्णन ही दोन अक्षरशिल्पे प्रकाशित करतोय……
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
7083193411
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
🍀🌿🍂🍃🌿🌾🍃🍂🍀🌾🌿🍃🍂
मित्रहो धन्यवाद
ReplyDelete