३|पुस्तक परिचय भाषणाचे प्रभावी तंत्र, वंदन नगरकर
💫🌿💫🌿🌿💫🌿💫
✒️३|पुस्तक परिचय📔
🔰भाषणाचे प्रभावी तंत्र
लेखक-श्री वंदन राम नगरकर
प्रकाशन-इंद्रायणी प्रकाशन,पुणे
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
'भाषणाचे प्रभावी तंत्र 'अर्थात प्रभावी भाषण ही एक कला असून ती आत्मसात करण्याचा सोपा मंत्र….
महाराष्ट्रात सुप्रसिद्ध व गाजलेला एकपात्री प्रयोग "रामनगरी" सादरकर्ते प्रसिद्ध कलाकार श्री राम नगरकर यांचे सुपुत्र आहेत. ज्यांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनात कधीही भाषण केलेले नसतानाही आज ते प्रभावी वक्ते म्हणून गणले जातात.
भाषणकला कशी आत्मसात करावी याचे रहस्य सांगताना ते प्रस्तुत करतात की थोडा अभ्यास,प्रयत्न आणि भाषणाचे तंत्र समजून घेतलेकी सामान्य माणूसही वक्रता होवू शकतो.या पुस्तकात निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या सह इतरही प्रतिक्रिया पुस्तकाची उपयोगिता वाढवितात.
"वक्तृत्व म्हणजे आयुष्यातले एक प्रचंड सामर्थ्य आहे,हे ज्याच्याजवळ असेल तो मानवाचा नेता होतो,असा आजपर्यंतचा जगाचा इतिहास आहे.तो इकडची दुनिया तिकडे करतो.तो काय वाटेल ते करु शकतो."या आचार्य अत्रे यांच्या विचारधना प्रमाणे भाबणतंत्राचे कौशल्य घटकांची मांडणी केली आहे.यात १२ विभाग असून क्रमशः प्रभावी भाषण-तंत्र व मंत्र,भाषण करताना भीती का वाटते?,तयारी मनाची व कपड्यांची.,योजनाबध्द संयोजन, वेळेचं भान ठेवा,
विषय मांडणी, विचार करून बोला नाहीतर,भाषणाचा व्यवहारात उपयोग,प्रभावी वक्ता,वक्त्यांचे मुख्य प्रकार, जबाबदारी प्रेक्षक म्हणून…., आचार्य अत्रे आणि भाषण -एक समीकरण असे भाग आहेत.प्रथम छोट्या छोट्या गोष्टींचा सराव केलात की आत्मविश्वास वाढतो मग भाषण करायला सुलभतेने जमते.भाषण करताना शीर्ष,मध्य आणि शेवट असे तीन भाग करून तयारी करावी.आपल्या बोलण्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी सुरुवातीला एखादी कविता,शेर अथवा विनोद सादर करुन वातावरण निर्माण करावे.मध्यात भाषणाच्या विषय मुद्देसुदपणे व सुसंगतपणे सहज सोप्या भाषेत प्रस्तुत करावा.शेवट सर्व मुद्दे संक्षिप्त सांगून सुप्रसिध्द व्यक्तिंचे कोटेशन, कविता अथवा चारोळ्या कथन करुन समारोप करावा.प्रभावी देहबोली, समयसूचकता,हावभावयुक्त आशय कथन ,स्पष्ट उच्चारण,आणि वाक्यातील योग्य शब्दांवरचा आघात.कारण जो शब्द जोर देऊन उच्चारतो तसा वाक्याचा अर्थ बदलतो.विषय ज्ञानाच्या आणि आत्मविश्वासावर आपण प्रभावीपणे भाषण करु शकतो.असं लेखक सुचवितात.भाषणाचे आणि व्यक्त्यांचे विविधांगी प्रकारांचे विवेचन लयदारपणे केले आहे.आपण इतरांचे विचार शांतपणे श्रवण केले पाहिजे.भरपूर वाचन करून विषय ज्ञानाची व्याप्ती वाढवली पाहिजे.व्यक्तिमत्त्व विकास या विषयातच करिअर केले आहे.याच्या अनेक कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत.दैनिक लोकमतमध्ये त्यांनी लेखमाला प्रस्तुत केली आहे.ते भरारी यशाची आणि रामनगरी हे एकपात्री प्रयोग सादर करतात.
भाषणाच्या प्रभावी अभिव्यक्तीसाठी या पुस्तक वाचन उपयुक्त होईल.
--------------------------------------------
पृष्ठे-७०
किंमत-७०₹
आवृत्ती-सातवी
शब्दांकन-✒️श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment