१८|पुस्तक परिचय, प्राचार्य मिलिंद जोशी
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
📚📚१९||पुस्तक परिचय
प्राचार्य
प्रा.मिलिंद जोशी
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
'प्राचार्य'ऋषितुल्य प्रतिभावंत अमोघ वाणीचे सरस्वती पुत्र,वैखरीचे वारकरी,मराठी सारस्वतांच्या दरबारातील थोर विचारवंत,तत्त्वचिंतक,प्रज्ञावंत,राष्ट्रपुरुष व संतमहात्म्यांचे भाष्यकार आणि थोर महापुरुषांची जीवनकार्ये व विचार घराघरांत पोहचविणारे बहुजन समाजातील प्रभावी व्याख्याते, ख्यातनाम लेखक आदरणीय प्राचार्य शिवाजीराव भोसले.अमोघ वाणी,संथ-लयबध्द शब्द फेक,नादमधुर भाव,नितळ ओघवत्या प्रवाहा सारख्या वक्तृत्वशैलीने सरांनी महाराष्ट्राला दिलेली वैचारिक शिदोरी आहे. रसिक श्रोते अमृतमय शब्द श्रवण करतात.वक्तृत्वाची ओढ लावणारा वक्ता 'प्राचार्य शिवाजीराव भोसले'.यांचा "प्राचार्य"हा चरित्र ग्रंथ लेखक मिलिंद जोशी यांनी सहजसुंदर शब्दांनी 'प्राचार्यांचा' बालपण,शिक्षणाचा पथ,फलटण येथील मुधोजी महाविद्यालयाचे प्राध्यापक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू या कालखंडातील शैक्षणिक कार्य आणि ओघवत्या वक्तृत्वाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या प्राचार्यांचा कलेढोण ते कॅलिफोर्निया पर्यंतच्या वाक्चातुर्याच्या प्रवासाचा उलगडा रसिक वाचकांना ''प्राचार्य" या ग्रंथात उपलब्ध करून दिला आहे.
समाजाचे प्रबोधन अन् लोकजागरण करणारे वक्तृत्वाचे मापदंड असणारे भाषाप्रभू 'प्राचार्य' शिवाजीराव भोसले यांच्या ग्रंथाला सुप्रसिद्ध व सुपरिचित संशोधक व शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांची प्रस्तावना लाभली आहे.प्रस्तावना लिहीण्याच्या संधीला ते परमभाग्य समजून स्वत:ला प्राचार्यांचे वर्गाबाहेरील शिष्य समजतात,यावरुनच प्राचार्यांचे विद्वान तपस्वी तत्त्ववेत्त्याचे दर्शनच प्रस्तावेतून घडते. त्यांनी आचार, विचार आणि उच्चारांशी संलग्न राहून व्याख्यानात केवळ भाषेचे प्रभुत्व न करता विचारसौंदर्याचा विकास केला आहे.बोलतात तेच लिहितात.त्यांनी सर्वांनी विवेकानंद आणि योगी श्री अरविंद या युगप्रवर्तक पुरुषांचे विचार अनेक नामांकित व्याख्यानमालेत व्याख्याने दिलेली आहेत.एका प्राथमिक शिक्षकाचा मुलगा स्वत:च्या सौम्य,मृदू,प्रेमळ आणि विनयशील सुस्वभावीपणाने अभ्यास पूर्वक संथ-लयबध्द शब्दात अस्खलितपणे अलौकिक वाणीच्या सामर्थ्याने श्रोत्यांच्या मनावर अनभिषिक्त विचारांचे साम्राज्य गाजविणारे ऋषितुल्य विचारवंत,तत्त्वज्ञ प्राचार्य आदरणीय शिवाजीराव भोसले यांचा लोक शिक्षणातून विचारांचे केलेल्या ध्येयासक्तीचा उलगडा होतो.
कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्नेहसंमेलनात प्रत्यक्ष प्राचार्यां समोर लेखकांना सरांच्या आवाजाची नक्कल करण्याची अभ्यागतपणे संधी मिळाली होती.तसेच त्यांच्या हस्ते पारितोषिक स्विकारण्याची संधीही मिळाली होती.तेंव्हा प्राचार्यांनी,'मिलिंद हे वक्ता आहेत आणि अभियंताही पण ते जर बोलत राहिले तर त्यांच्या बांधकामांचे काय?हा प्रश्न आहे.त्यामुळं त्यांनी बांधकाम करताकरता बोलावं किंवा बोलता बोलता बांधकाम करावं की ज्यामुळे समाजाचं बांधकाम होईल.'असे विचार व्यक्त करुन,लेखकाला शब्दांचे बांधकाम करण्याची प्रेरणा दिली.त्यांनी दैनिक सकाळ, लोकमत, सामना,केसरी,तरुण भारत आणि संचार या नामवंत वृत्तपत्रांतून तसेच मासिकातून विविध विषयांवर लेखन केलेआहे.त्यांची 'परिघातील विश्र्व,लेखसंग्रह,आठवणीतले शिवाजी सावंत,नायजेरियातील धोंडे पाटील' ,ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.लेखणीला वाढीची साथ लाभलेल्या मिलिंद जोशींनी महाराष्ट्रातील अनेक नामवंत व्याख्यानमालांमधून व्याख्याने गुंफली आहेत.
हा चरित्र ग्रंथ म्हणजे वाचकांना शब्दसाजांची, शब्दांच्या सामर्थ्याची ,चपखल आणि समर्पक शब्दांत मांडणी,आशयघन शब्दात वृत्तांकन, शब्दांकन कसे करावे.भावार्थांच्या शब्दांची ओजस्वी पखरण करुन साहित्य कसं फुलवावं. बहारदार पणा कसा असावा,रसिकांना वाचताना मंत्रमुग्ध कसं करावं याची वाचताना प्रचिती येते.कित्येक प्रकरणातील निवडक परिच्छेदातील वेचे,अवतरणे,प्रसंग आणि विचार पुन्हपुन्हा वाचून रसास्वाद घ्यावावाटतो.'प्राचार्य' ग्रंथांचे नवलेखकांनी पारायणे केली तर स्वता:ची व्यक्त होण्याची भाषा सुधारण्यासाठी हा ग्रंथ 'दीपस्तंभ' ठरेल.
या ग्रंथात चरित्र,व्याख्यानाच्या विचारपटाची तपश्र्चर्या आणि यशस्वितेचे पैलू,शष्ट्यब्दी निमित्त साहित्यिक स्नेह्यांची अभिष्टचिंतन पर शुभेच्छा पत्रे, लेखकांनी घेतलेली मुलाखत, जीवनदर्शन आणि चतुरंग प्रतिष्ठान,पुणे यांचे गौरवशाली 'मानपत्र' आदींचा समावेश आहे.अनेक साहित्यिक आणि प्रतिभावंत लेखकांनी दिलेल्या शुभेच्छा म्हणजे आदरणीय प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यातील वक्त्याचा लोकमान्य विचारवंताचा, तत्त्वचिंतकाचा,आणि सिध्दहस्त लेखकाचा गौरव होय."वक्तृत्व रसाळपणे| अमृताते पारुष म्हणे|,ओघ, विवेक आणि सिध्दांतानी रसरसलेले भाषण,थोर पुरुषांच्या वाड्मयाचा ,विचारांचा आणि कारल्याचा सखोलपणे अभ्यासून युगपुरूषांचे विचार अत्यंत परिणामकारक भाषेत व आत्मविश्वासाने आगळ्यावेगळ्या संथ,रसाळ शैलीत मांडणारा विद्वान तपस्वी';"वाणीवाटे उत्तम वक्तृत्व स्त्रवते", प्राचार्यांनी नुसती भाषणं न देता समाजपुरुषासाठी वाग्यज्ञ करून त्यात वक्तृत्वाची एकेक समिधा टाकलीआहे."मधुर आणि प्रभावी वाणी,जणू सूरलयीत गाती गाणी,थोर पुरुषांच्या सांगती कहाणी, जनज् जागृतीची उच्च विचारसरणी|" संस्कारी बोलणं,संस्कारी वागणं,संस्कारी लिहणं आणि संस्कारी सहवासनं.अशा शब्दांकनाने प्राचार्यांचे कौतुक केले आहे.प्राचार्य शिवाजीराव भोसले आयुष्यभर भक्तीयोगाचं जीवन जगले.त्यांच्या जीवनाची भक्ती,निष्ठा,ध्येय, सातत्य,अलिप्तता, तपश्र्चर्या, विचार स्वातंत्र,विनम्रता आहार व शरीरसाधना आणि वक्तशीरपणा आदी सूत्रं वक्तृत्वाची वाट चोखाळायला उपयोगी पडली.
प्राचार्य आपल्या व्याख्यानात मार्मिक कोट्या,नर्मविनोदाची प्रचुरता आणि विषयाचे विवेचन अभ्यासपूर्ण करत.त्यामुळं रसिक श्रोते मंत्रमुग्ध होतं.टाळ्यांच्या गजरात दाद देत.शब्दसाजात श्रोते चिंब न्हाऊन निघत.त्यांची भावसमाधी लागे.असा विचारांचा तेवणारा अखंड नंदादीप प्राचार्य शिवाजीराव भोसले होते.प्राचार्यांच्या भाषणाला चिंतनाची किनार,दैवीदेणगीचा आधार,अध्ययनाचे श्रवण आणि वाणीला नादाचे मुलायम अस्तर आहे.शुध्दतेचा व स्पष्टतेचा परीसस्पर्श आहे.केवळ शब्द नसून शब्दअनुभव बरोबर घेऊन निथळतो.म्हणून शब्द आशयघन आहे.तो घनतेचे पिसारे फुलवितो.शब्द हलका फुलका असलातरी त्याला अर्थाच्या अनेक परी असतात.त्या परीनी तो खुलतं जातो तेव्हा त्यांचे व्याख्यान बेमालूमपणे रंगत जाते.
अमृत महोत्सव वर्षात पदार्पण झाल्याने चतुरंग प्रतिष्ठान, पुणे यांनी अभिष्टचिंतन अतिशय समर्पक शब्दांत 'मानपत्र' देऊन सन्मानित केले आहे.'उपासनेला दृढ चालवावे' या उक्ती जगणाऱ्या आपल्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा गौरव करताना चतुरंग धन्यता अनुभवत आहे.स्तंभ अनेक लिहितात आपण दीपस्तंभ लिहिलेत.'दीपस्तंभ','मुक्तिगाथा महामानवाची','यक्षप्रश्न'हे ग्रंथराजही वाचकप्रिय झाले.लेखणी आणि वाणीचा हा अविरत,समर्पित धर्मास आपला श्वासच आहे.गेली चार तपे अमोघ वाणीची लेखनी करुन आपण असंख्य मनांवर सुसंस्कारांची लेणी कोरली आहेत.वाणीच्या वीजेने संवेदनाक्षम मराठी मन झंकारले नसेल असा प्रदेश शोधून सापडणार नाही.आपल्या अजोड वक्तृत्वाने, वक्तृत्वाचेच एक नवेच आकाशव्यापी रुप निर्माण केले.यात केवळ शब्दांची मोहनमाळ नाही,तर आहे व्यासंग, चिंतन आणि शालिनतेचे स्पंदन!अनेक उत्तुंग दीपस्तंभ आपल्या वाणीच्या माध्यमातून लक्षलक्ष मनांना उजळणारे ठरले! प्रेरणादायी झाले.
'प्राचार्य',हेपुस्तक वाचताना या मानपत्रातील शब्दगौरवाची प्रचिती येते.इतके रसाळ, गोडवे वर्णन समर्पक शैलीत पुस्तकाचे लेखन लेखक प्रा. मिलिंद जोशी यांच्या शब्दांकनात आहे.
@श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
Comments
Post a Comment