प्रासंगिक शहीद वीर जवान सोमनाथ तांगडे


प्रथम स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ❗

शहीद वीर जवान तुझे सलाम !
रक्षिता तुम्ही देशा,प्राणांस घेऊन हाती |
तुमच्यास्तव दु:खितात अंतरे कोटी|

ओझर्डे गावचे सुपुत्र, कलाविष्कार व क्रांतिसिंह नाना पाटील मित्रमंडळाचे आधारस्तंभ वीर शहीद जवान सोमनाथ अरविंद तांगडे (जगताप)यांना मातृभूमीचे रक्षण करताना वीरगती प्राप्त झाली.देशसेवेसाठी ते शहीद झाले. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ❗
जय हिंद !!! ,वंदे मातरम् !!!
   सोमनाथ हा आमच्या के.न.पी. चौकातील क्रिकेट खेळावर अफाट प्रेम असणारा खेळाडू,अतिशय जिद्दी आणि ध्येयासक्तीने तो क्रिकेटपटू झाला होता.त्याच्या आक्रमक  फलंदाजीने अनेकदा संघाच्या निसटलेल्या पराभवाचे रुपांतर जिंकण्यात झालं होतं.अशी त्यांची फलंदाजीची खेळीचीशैली बिनतोड आणि बहारदार होती. त्या काळातील क्रिकेटस्पर्धांच्या स्मृती आज डोळ्यासमोर तराळत  राहतात.क्रांतिसिंह नाना पाटील मित्र मंडळाचा तो गणेशभक्त होता.देशाची सेवा करणेसाठी तो सैन्यदलात भरती झाला.आणि आमचा सोमा फौजी झाला.याचा आम्हाला अभिमान होता. कारण तो गणपती उत्सवातच गावी रजा काढून यायचा.गणपती उत्सवातील शुभारंभ ते विसर्जना पर्यतचे सगळे कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने संपन्न करायचा.आपल्या मितभाषी स्वभावाने मित्रपरिवारात ,लहान मोठ्यांशी मिळूनमिसळून वागायचा. असा हा शूर सैनिक सिक्कीम येथे दुर्गम प्रदेशात सेवा करत असताना शहिदवीर झाला.त्यामुळे ओझर्डे गावावर शोककळा पसरली.तांगडे जगताप कुटुंबीय,दोस्ती परिवार शोकाकुल झाला आहे..परमेश्वराने हे दु:ख सावरण्याची ताकद आम्हा सर्वांना देवो..
हीच प्रार्थना....
सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना!!







Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड