१४|पुस्तक परिचय, विज्ञानाच्या उज्ज्वल वाटा




🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾📚📚 १४|पुस्तक परिचय

विज्ञानाच्या उज्ज्वल वाटा 

डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम 

-----------------------------------------------

भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर अनेक पुस्तके लिहिली आहेत.अंतराळात पाठविलेल्या उपग्रहांच्या जडणघडणीत त्यांनीमौलिक भूमिका बजावली होती.'अग्नी'सारखी क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्पाचे ते प्रमुख होते.भारतातील सर्वौच्च सन्मान "भारतरत्न" पारितोषिक देवून गौरविण्यात आले आहे.त्यांची अनेक पुस्तके लोकप्रिय आहेत.त्यांनी वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी संशोधनपर उल्लेखनिय कार्य केले आहे.सहाध्यायी लेखक सृजन पाल सिंग हे 'चतुरस्त्र विद्यार्थी' म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद चे सुवर्ण पदक विजेते आहेत.ते ग्रामीण भागात फिरून विकासात्मक व्यवस्था करण्यासाठी विविध संस्थासोबत काम करतात.अनेक नियतकालिकांतून त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत.तसेच मराठीत अनुवादित करणारे  प्रणव सुखदेव मराठी दैनिकात पत्रकार असून अनुवाद प्रकल्पासाठी 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान'ची शिष्यवृत्ती मिळाली होती.

"विज्ञानाच्या उज्ज्वल वाटा"या पुस्तकात भविष्यकालीन विज्ञानाचा वेध घेऊन विद्यार्थ्यांना केलेलं बहुमोल मार्गदर्शन समाविष्ट आहेत.हे पुस्तक मला एप्रिल २०१७ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उचाळेवस्ती (टाकळी हाजी) ता.शिरुर जि.पुणे या प्रगत व उपक्रमशील शाळेत शाळासिध्दी या राज्याच्या उपक्रमाचे बाह्य मूल्यांकन करण्यासाठी गेलो होतो.तेव्हा स्वागतात सदर पुस्तक भेट मिळाले होते.

 विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील अनेक नित्य घटनांचे कुतूहल वाटत असते.त्यांच्या मनात या घटनांविषयी अनेक प्रश्न निर्माण होतात.आदरणीय डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम सर म्हणतात की,'प्रश्न विचारणं हे विद्यार्थ्यांचे सर्वांत महत्त्वाचे लक्षण आहे.

'त्यांच्या प्रश्र्नांची उकल केली पाहिजे.यास्तव या पुस्तकांतून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अतुलनीय कामगिरीने आपण काय साध्य केलं आहे.व त्याचे आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहेत,याची रंजक माहिती देण्यात आली आहे.

  भारताचे माजी राष्ट्रपती,ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि मुलांचे लाडके शिक्षक डॉक्टर ए.पी.जेअब्दुल कलाम आणि विख्यात तरूण लेखक सुरजन पाल सिंग यांच्या संशोधनातून हे पुस्तक साकारले आहे.या पुस्तकातून त्यांनी भविष्यकालीन विज्ञानाचा, त्यातील क्षेत्रांचा वेध घेऊन त्याविषयीचे वापर चित्र आजच्या विद्यार्थ्यांच्या पुढे उभं केलं आहे.तसेच भविष्यात विज्ञानात मोठ्या प्रमाणावर विकसित होणाऱ्या रोबोटिक्स, एरोनॉटिक्स (विमान विद्या), स्पेस सायन्स (अंतराळ विज्ञान) रोगचिकित्सा अर्थात पॅथॉलॉजी, मटेरियल सायन्स,अंतराळ विज्ञान न्यूरोसायन्स (मेंदू विज्ञान ),जीवाश्म विज्ञान अर्थात पॅलि- अॉन्टोलॉजी यांसारख्या"आऊट अॉफ बॉक्स" करिअर्सचा सहज सोप्या भाषेत पण सखोल परिचय करून दिला आहे. पुस्तकाची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून प्रत्येक प्रकरणात त्या त्या शास्त्राची सूक्ष्मपणे ओळख, त्याची व्याप्ती, तो विषय शिकवणाऱ्या शिक्षकांशी साधलेला संवाद,सोबत एका तज्ज्ञाची मुलाखत आणि पालकांसाठी काही टिप्सही देण्यात आलेले आहेत.भविष्यकालीन विज्ञानाचा वेध घेणारं... जिज्ञासूंचं  कुतूहल शमवणारं.. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी व भावी वाटचालीसाठी दिशादर्शन करणारे विज्ञानाच्या उज्ज्वल वाटा हे पुस्तक  विद्यार्थ्यांसाठी अनमोल मार्गदर्शक आहे.

      विज्ञान विषयाचे विचार तरुणांची स्वप्नं, इच्छा-आकांक्षा,ध्येय आणि आव्हानं या सगळ्यांचे एक विस्तारुप रुप आहे.मानवाचं भविष्य आणि विज्ञानाचा सहसंबंध यावर झालेल्या संवादातून या पुस्तकाला आकार मिळाला. प्रस्तावनेत विज्ञानातील तंत्रज्ञानाची किमया,महान शास्त्रज्ञ आणि त्यांची शोध घेण्याचा धर्मास,अथक मेहनत,प्रचंड संवेदना आणि जिज्ञासू वृत्तीने केलेल्या प्रयत्नातून यश मिळते.शोधाचा जनक कसा होतो याचे सहज सुंदर समर्पक शब्दांत मांडणी केली आहे.

नोबेल पुरस्कार प्राप्त अल्बर्ट आईन्स्टाईन, भारतीय संशोधक हसी.व्ही.रामन,मायकल फॅरेडे यांची संशोधनाची संघर्षमय गाथा वाचनीय आहे.बॅक टु द फ्युचर मध्ये नोबेल पारितोषिक विजेते प्रोफेसर अरण नाथन यांच्या 'रोबोटिक्स' प्रयोगशाळेतील सर नसताना हे रोबो एकमेकांशी कसे हितगुज करतात.संवाद साधून मनातील कल्पना व्यक्त करतात याचे छानच कुतूहल वाढविणारे वर्णन आहे.विज्ञान क्षेत्रातील करिअर निवडताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर पुस्तक आहे.

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

पुस्तकाचे नांव- विज्ञानाच्या उज्ज्वल वाटा 

लेखक- डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम 

व सृजन पाल सिंग

अनुवाद--प्रणव सुखदेव

प्रकाशन-रोहन प्रकाशन,पुणे

पृष्ठे--१९५

आवृत्ती-चौथी 

किंमत--२००₹

श्री रवींद्र लटिंगे ओझर्डे वाई

🍀🌿🌾🍃🍂🌳🍀🌿🌾🍃🍂🌳


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड