१५|गुंफण सुनीलकुमार धस पुस्तक परिचय





🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾📚📚१५ |पुस्तक परिचय 

               गुंफण 

सुनीलकुमार धस

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

     'छंदाशिवाय आयुष्य म्हणजे फक्त जगणं,कुणी साद घातली तरी , कधी वळून न बघणं' माणसाच्या जीवनातील चांगले छंद हे मनाला वळण लावतात.बौध्दीक व भावनिक भूक भागवितात.एकरुपता आणि तन्मयतेचा संदेश देतात.असे संदर्भ देणारे लेखक व संकलक सुनीलकुमार धस यांच्या विविध छंदांचा ,"अनमोल विचारांचा दुर्मिळ खजिना",'गुंफण' या पुस्तकात वाचायला मिळतो.यात 

सुविचार,शब्दांचेधन,विचारधन,कोटस्,अवतरणे, काव्यरचना, चारोळ्या व शेरोशायरी इत्यादी मनाला भावणाऱ्या विचारांची शिदोरी समाविष्ट केली आहे.ही अवतरणे म्हणजे वाचकांना संग्रहरुपात खजिनाच भेटतो.या पुस्तकाला प्रस्तावना डॉक्टर बाबुराव उपाध्ये यांची लाभली आहे.मनाची श्रीमंती आणि परिश्रमाची संस्कृती 'गुंफण' पुस्तकात आहे.त्यांची सुविचार व काव्य शिदोरी रसदार आहे.ते छंदाविषयी म्हणतात,'छंदाशिवाय आयुष्य म्हणजे फक्त जगणं,कुणी साद घातली तरी ,कधी वळून न बघणं.' माणसाला चांगले छंद मनाला वळण लावतातच.तसेच बौध्दीक व भावनिक भूक भागवतात.एकरुपता अन् तन्मयतेचा संस्कार देतात.छंदामुळेच त्यांनी उत्कृष्ट शब्दधन या पुस्तकात संग्रहित केले आहेत.त्यांचा व्यासंग या संग्रहावरुन दिसून येतो.साध्या सोप्या सरळ ओजस्वी भाषेत चांगले वैचारिक विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी एक चांगला प्रयत्न केला आहे.मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत सुविचार, चारोळी आणि काव्यरचना आहेत.निबंध व वकृत्वाच्या तयारीसाठी यातील वेचे उपयुक्त ठरतील.अर्थपूर्ण ओळींचा खजिना मिळतो.यातील काही ओळी चारोळी खुदकन हसायला लावणाऱ्या तर काही जीवनाचे सार कथन करणाऱ्या , काही इतिहासाचा दाखला देणाऱ्या तर काही भविष्याचा वेध घेणाऱ्या तत्त्वज्ञान व जागतिक घडामोडी कथन करणाऱ्या आहेत.थोर महापुरुषांचे विचार मौक्तिके या पुस्तकात संग्रहित केले आहे.

कौटुंबिक व सामाजिक बांधिलकी जपणारं हे कुटुंब विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमात नेहमी सक्रीय असणारे आहे.

माणूस स्वत:ला मिळणारा मान नाकारायला लागला आणि दुसऱ्यांचा अवमान करण्याचे टाळायला लागला की समजावं,तो माणूस खरंच मोठा आहे!


देवळात जाऊन माणसं, दुकानात गेल्यासारखी वागतात.चार आठ आणे टाकून,काही ना काही मागतात.

     चंद्रशेखर गोखले 

बहुगुणी हिऱ्याला चमकायला अंधुकसा संधीप्रकाश पुरेसा असतो.

आयुष्याच्या लढाईत पुष्कळ वेळा नको असलेल्या अनेक तहांवर माणसाला सही करावी लागते.

  'गुंफण' हे लेखकाचे पहिलेच पुस्तक आहे.ते

पेशाने माध्यमिक शिक्षक असणारे लेखक उत्तम सूत्रसंचालक व वक्ते आसून 'यशदा'पुणे या संस्थेत इंग्रजी विषयतज्ज्ञ म्हणून सहभागी असतात.त्यांना 'उपक्रमशील कलाध्यापक ' पुरस्कार कल्याण,'शाहीर अमर शेख' पुरस्कार इंदापूर आणि 'महाकवी वामनदादा कर्डक' पुरस्कार नाशिक येथील संस्थांनी सन्मानित केले आहे.या पुस्तकात धस परिवारातील अनेक सदस्यांनी अक्षरशिल्पांचे योगदान दिले आहे.या शब्दधनाचे संकलक श्री सुनीलकुमार धस श्रेष्ठ कथालेखक व.पु.काळे यांच्या 'वपुर्झा' पुस्तकापासून प्रेरणा घेऊन मांडणी केली आहे.प्रत्येक विचार व अवतरणे स्वतंत्र आहेत.संकलित सुविचार मौक्तिके विविध वृत्तपत्रे ,मासिके,साप्ताहिके , संदर्भ ग्रंथ,महाविद्यालयांचे विशेषांक आणि दुर्मिळ ग्रंथातून विचारांची शिदोरी संकलित केली आहे.विविध अवतरणे आणि विचार वाचायला हे पुस्तक उपयुक्त आहे.

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

पुस्तकाचे नांव-गुंफण 

प्रकार-ललित

लेखन व संकलन-सुनीलकुमार धस

प्रकाशन- शब्दगंध प्रकाशन, अहमदनगर

पृष्ठे-९४

किंमत-८०₹

शब्दांकन-श्री रवींद्र लटिंगे ओझर्डे वाई 


🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी