कोकण गोवा भ्रमंती देवगड हापूस व चौपाटी




कोकण गोवा निसर्ग भ्रमंती,खाद्यसंस्कृती देवगड  हापूस व बीच
 दिनांक ९  मार्च २०२१
क्रमशः भाग क्रमांक-१६
देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकाठचा तालुका .जगभरात देवगड हापूस आंब्याचे उत्पादन घेणारा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे.खडकाळ कातळावर जगविलेल्या आंब्याच्या बागा,विशिष्ट प्रकारची मृदा आणि हवामानामुळे हापूस आंब्याची चव अस्सल रसाळ आणि मधूर गोडव्याची आहे.त्यामुळेच देवगडचा हापूस आंबा जगप्रसिध्द आहे.हापूस बघितलाकी त्याचा कधी मनमुरादपणे आस्वाद घेतोय असं होतं.कारण सुगंध,दाट केशरी रंग आणि पातळ साल हीच त्यांची खासियत आहे.आंब्यावर विविधांगी प्रयोग करुन दर्जा आणि उत्पन्न वाढविण्यासाठी बागायतदार झटत असतात.
      काल पोंडा ते देवगडपर्यंतच्या सागरी मार्गाने सकाळी दहा ते रात्री दहा पर्यत विविध बीच बघत प्रवास झाला होता.त्याचा शिणवटा गाढ विश्रांतीने पळून लावला.सकाळी नित्य कर्मे उरकून हापूस आंब्याच्या गावात फिरायला आणि तसेच परतीच्या प्रवासाला लागलो.
       देवगडच्या किनाऱ्याला तिन्हीबाजूंनी डोंगर टेकडीने वेढलेले आहे.त्यामुळे उंच लाटा उसळत नाहीत.समुद्रात घुसलेल्या टेकडीवरील निमूळत्या भागात यशवंतगड आहे.गड बालेकिल्ला आणि सागराच्या जवळील भाग अशा दुहेरी आहे.
बुरूज,तटबंदी,खंदक आणि तोफा या ऐतिहासिक वस्तू पहावयास आहेत.किल्ल्याच्या भागात दीपगृह आहे.किनाऱ्यावरील उंचटेकडीवर पवनचक्क्या उभारल्या आहेत.विंडमिल जवळ असणारा हा एकमेव सागरकिनारा आहे.हा किनारा नैसर्गिक बंदर आहे
त्यामुळेच मोठाल्या बोटी किनाऱ्या जवळ येतात.येथील समुद्रात सुरमई,रावस,पापलेट, कोळंबी,तिसऱ्या आणि बांगडा या सागरी माश्यांची मासेमारी करणाऱ्या अनेक बोटी बंदरात दिसतात.येथून जवळच मीठमुंबरी बीच,तारामुंबरी बीच ,मस्यालय,वॅक्स मुझिअम बघण्यासारखी ठिकाणे आहेत.
       देवगड दोन दिवसांची निसर्गरम्य परिसरात सागरकिनाऱ्याचे जलदुर्गाचे सौंदर्य बघायला आणि हापूस आंब्याच्या आमरस आणि मस्याहारी पदार्थांची चव चाखायला एक उत्तम अविस्मरणीय प्रेक्षणिय ठिकाण आहे. दक्षिणेकडील रेडी गावापासून सुरू झालेली सिंधुदुर्गच्या समुद्रकिना-याची सफर सांगली मार्गाने देवगडपर्यत पुर्ण झाली.अत्यंत रमणीय मनमोहक हौशी पर्यटकांच्या गलबल्यापासून दुर्लक्षित असा हा भाग सहलीसाठी अत्यंत सुरक्षित,कमी खर्चाचा आणि साहसाचा अनुभव देणारा असा आहे.
क्रमशः भाग-१६
फोटो साभार गुगल
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://ravipreama.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड