१९|श्वासागणिक प्रदूषण, पुस्तक परिचय
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, ओझर्डे-वाई पुस्तक क्रमांक-२० पुस्तकाचे नांव--श्वासागणिक प्रदूषण लेखकाचे नांव-- एन.मणिवासकम्
अनुवाद--क.कृ.क्षीरसागर प्रकाशक-नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया प्रकाशन वर्ष व आवृत्ती-द्वितीयावृत्ती एकूण पृष्ठ संख्या-१०८ वाङमय प्रकार ( कथा, कादंबरी, ललित ई. )--ललित मूल्य् -४५₹
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
२०|पुस्तक परिचय
श्वासागणिक प्रदूषण
एन.मणिवासकम्
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
नैसर्गिक स्त्रोत चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने
आपण पर्यावरणाच्या गर्तेत सापडले आहोत. विकासाबरोबर प्रदूषण येणार हे जरी आपल्याला मान्य असले तरी त्याचे प्रमाण सध्याच्या स्तरापर्यंत जायला नको आहे ! प्रदूषण सुसह्य मर्यादेपर्यंत नियंत्रित राहिले पाहिजे. त्याचा पृथ्वीला धोका होऊ नये इतके ते वाढू देता कामा नये.विकसित देशातील
नागरिकांमध्ये प्रदूषणामुळे होणाऱ्या दुष्परीणामांबद्दल वाढती जागरूकता निर्माण होते.मात्र आपल्या सारख्या सर्व विकसनशील देशांना त्याबद्दल असलेली जाणीव अगदी नगण्य आहे. तो आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आला आहे असं मानून आपण त्याला महत्त्व देतो, नाहीतर तिकडे कानाडोळा करतो. आपल्या देशबांधवांच्या मनात प्रदूषणासंबंधी आणि प्रदूषणाच्या दुष्परिणामासंबंधी जागृती उत्पन्न व्हावी या हेतूने'श्वासागणिक प्रदूषण' या पुस्तकाचे लेखन झालेले आहे.प्रदूषणाच्या सामान्य स्वरूपाची माहितीने प्रारंभ केला आहे.
सामान्य माणसाला उपयुक्त ठरेल.तसेच विद्यार्थ्यांना संदर्भ साहित्य प्रकल्प म्हणून तर शिक्षकांना पर्यावरणासंबंधी हस्तपुस्तक म्हणून याशिवाय संस्थांना माहितीचा उगमस्थान म्हणून उपयोगी पडेल.प्रदूषण आणि पर्यावरण या विषयावर अतांत्रिक स्वरूपाचे पुस्तक लिहिणं म्हणजे एक अत्यंत अवघड गोष्ट फार पाडण्यासाठी लेखकाला अनेक देशी परदेशी पुस्तकांच आणि साहित्याचे वाचन करावे लागले.
तसेच डॉक्टर सी.आर. कृष्णमुर्ती यांनी लिहिलेल्या विविध दैनिकातील सदरात आणि मासिकांमध्ये प्रकाशित झालेल्या विविध लेखांच्या वाचनामुळे हे कार्य संपन्न झाले.या पुस्तकात माणसाच्या दैनंदिन वेळेत आणि परिसरात प्रदूषणाचे भेडसावणाऱ्या अकरा लेखांची लेखमाला समाविष्ट केलेली आहे.प्रत्येक प्रकरणापूर्वी विषयाच्या संदर्भात समर्पक चित्र रेखाटली आहेत.ती चित्रं सुबीर रॉय यांनी रेखाटली आहेत.तर आवश्यक तिथं रंगीत छायाचित्रे काढलेली आहेत.शेवटी लेखांची संदर्भ सुची दिलेली आहे.
आपले पर्यावरण,श्वासागणिक प्रदूषित हवा,आम्लवर्षा, कीड नाशके,सर्वव्यापी जलप्रदूषण,तेल तवंग,वने घनकचरा, किरणोत्सार,ध्वनिप्रदूषण आणि वसुंधरा वाचवा आदी लेखांची माहिती विवेचन संदर्भासह स्पष्ट केले आहे.
'पृथ्वीची स्थिती एखाद्या रुग्णासारखी झाली आहे,'तातडीच्या उपचारांची गरज आहे.प्रलय घोंगावतोय तो थांबवायचा असेल तर उपाय योजले पाहिजेत अन्यथा काही काळाने जगणंच अशक्य होईल,असे विचार के.व्ही.
नारायण यांनी मांडले आहेत.प्रदूषणाच्या नेमक्या कारणांचे स्पष्टीकरण केले आहे.प्रदूषणाने हवा, पाणी आणि मातीला विषारी बनविलं आहे.आपल्या ग्रहाची जपणूक करण्यासाठी काही शतकांपूर्वी अॅरिस्टाॅटल आणि डार्विन यासारख्या द्रष्ट्यांनी केलेल्या आवाहनाला आपण कानाडोळा केला आहे.असं संशोधक फ्लाक्त यांचं म्हणणं आहे.
आत्तापर्यत अनेक कारखान्यांतून विषारी वायू गळतीमुळे परिसरातील अनेकांना झळ बसून काहींना प्रयाण गमवावे लागले.'भोपाळ वायू गळतीत'सुमारे ४०००जणांना पर्यायाला मुकावं लागलं तर अनेकजण अंध-अपंग झाले.वाहने, उद्योगधंदे आणि कारखाने यांच्या मुळे हवेतील आॅक्सिजनची पातळी खलावली जाते.त्यामुळे श्वसनसंस्थेचे आजार वाढतात.उदाहरणे,दाखले आणि आकडेवारीसह 'श्वासागणिक प्रदूषित हवा'या लेखाचे विस्तृतीकरण केले आहे.सदर लेख वाचतानाच समस्येचं चिंतन करायला उद्युक्त करतो.पाण्याऐवजी आम्लांचा पाऊस पडतो हे आपल्या कधी ऐकण्यात,बघण्यात नसते.जगात ज्या भागात कारखान्यांची दाटी आहे.स्वयंचलित वाहनांची वर्दळ आहे.अशा भागात काहीवेळा आम्लवर्षाव कसा झाला आहे.याची कारणमिमांसा केली आहे.कारण आम्ल वर्षावामुळे मानवी जीवनावर आघात होऊन शकतो. मानवाच्या कल्याणासाठी अघटीतपणे अडचणी संकटे कशी येतायत.ती निराकरण करण्यासाठी मानवाने प्रमाणिक पणे काय करावे? याची प्रत्येक लेखात वास्तव माहिती सविस्तरपणे मांडलेली आहे.पर्यावरण रक्षण करण्याचे काम केवळ पर्यावरणवादी संघटना आणि कार्यकर्त्यांचे नसून ते आमजनतेचे आहे.
शुध्द अॉक्सिजन मोफत पुरविण्याचे तहहयात काम जंगलं करत असतात.पण माणूस स्वता:च्या फायद्यासाठी झाडांची वारेमाप कत्तल करतो.परंतू त्याबदली नवीन झाडं लावत नाही.संवर्धित करीत नाही.खरं तरं संवर्धन करणं अतिशय गरजेचं आहे.याची कारणं,परिणाम आणि उपाय आपणाला या पुस्तकातून समजतील.वैश्विक गरजेच्या विचारांचे चिंतन मनन करायला "श्वासागणिक प्रदूषण" हे पुस्तक सांगते. या लेखातील मजकूर सहजसुंदर समजणाऱ्या शब्दात अनुवादकाने गुंफला आहे.विचार करायला लावणारे लेख आहेत.लोकांच्या उपयोगी पडणारे 'विज्ञान आणि पर्यावरण' दैनिक समस्येवर आधारित लेखातून प्रगट केले आहे.
#श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
Comments
Post a Comment