१३|| पुस्तक परिचय गुलमोहर,व.पु.काळे



🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
              १३|पुस्तक परिचय
       गुलमोहर
व.पु.काळे
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
          सामान्य माणसाच्या मनाला भिडणारी भावस्पर्शी कथा, कादंबरी व विचारवैभवांचे लेखन करणारे जेष्ठ प्रतिभावंत लेखक वसंत पुरुषोत्तम काळे,तथा रसिक वाचकांचे लोकप्रिय 'वपु काळे'. त्यांच्या विचारधनाचे वेचे हल्लीच्या सोशल मिडीयाचा काळातही मनाचा ठाव घेऊन विचार करायला लावतात.अनेकजण स्टेटस अथवा फेसबुकवर शेअर करतात.पेशाने वास्तुविशारद असणाऱ्या वपुंनी अनेक शब्दांचे राजवाडे आणि महाल उभारुन आपल्या भावस्पर्शी कथांनी रसिक वाचकांच्या मनावर गारूड केले आहे. व्यक्तींच्या आचार विचारांच्या पद्धतीला वपु'पॅटर्न'म्हणायचे.अनेक कथांमध्ये त्यांनी 'पॅटर्न्स'
मांडले आहेत.आपल्या बरोबरच आपल्या अवतीभवती दिसतात म्हणूनच ते पॅटर्न वाचताना वाचक दाद देतात.
कथांमधून हसवता-हसवता एक शल्य भिडत राहतं आणि मनाला चटका लावून जातं. ही अशीच जीवनाची तऱ्हा सहज सोप्या शब्दातून त्यांनी अनेक कथांमधून मांडलेली आहे. व. पु.काळे उत्कृष्ट लेखक,
कथाकथनकार,व्हायोलिन व हार्मोनियम वादक,उत्तम फोटोग्राफर आणि उत्तम रसिक.त्यांच्या सुंदर कथा मनावर व विचारावर आधारीत आहेत.हे मनाचे कंगोरे उत्तम  निरीक्षणामुळे त्यांच्या कथा वाचताना आपणाला पुढे काय घडेल? याची उत्कंठा लागत असते.वपु काळेंनी साहित्यातील अनेक क्षेत्रे काबीज केली आहेत.
कथा कादंबरीतून रसिकांना आनंद वाटला.ही वाट एकटीची,ठिकरी,वपूर्झा, गुलमोहर,पार्टनर आणि वपुसांगे वडिलांची कीर्ती इ.अक्षरशिल्पांचे विपुल लेखन दिसून येते.
अमेरिका येथील मराठी साहित्य संमेलनाचे 'अध्यक्षपद' त्यांना बहाल करून साहित्यिक म्हणून सन्मान केला होता.तसेच महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचि पु.भा.भावे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते.
अनेकजण 'रंग मनाचे' दाखवणाऱ्या वपुंना आपला पार्टनर मानतात.आणि हा पार्टनर आणि त्यांचे लेखन रसिकांच्या मनात अगदी खोलवर विराजमान झाले आहे. हा असाच दोस्ती निभावणारा रसिक वाचकांचा लेखक कथेच्या पॅटर्न मधून भेटत राहिले.असा एक पॅटर्न दाखविणारा 'गुलमोहर' कथासंग्रह आहे.यातील भावनिक व्यक्तिंच्या कथा वाचताना काळजाला भिडतात.गुलमोहर कथेतील दिवाकर पंतांच्या प्लाॅटमधील गुलमोहर  झाडावरचे निस्सीम प्रेम अचानक घडलेल्या घटनेनं आरक्त कसं होतं.त्यांचे लेखन खूपच उत्कंठावर्धक आहे.गांधारी कथेतील नादरुप स्वरुपातील संसाराच्या सृष्टीचे वर्णन आणि अंध सतार वादकाचा पत्नीविषयीचा विचार चिंतन करायला लावतो.
तर शिकलेल्या विश्वनाथला नोकरी मिळत नाही म्हणून पोटासाठी पहिल्यांदाच बागेत चोरी करायला जातो.
एका लहान मुलीच्या हातातील बांगड्या हिसकावताना,ओरडू नये हाताने तोंड दाबल्याने ती मृतवत होते.त्याची पेपरमधील बातमी वाचल्यावर झालेला पश्र्चाताप आणि उलघाल वाचताना क्षणात डोळ्यात अश्रू येतात.तर पुढे वाईला आल्यावर त्याचं लग्न होतं.पत्नीला काळजात खोल रुतलेल्या घटनेची व्यथा सांगत असताना,ती हळवी होऊन रडायला लागते.कारण बागेतील ती मुलगी हीची बहीण असते.पुन्हा विश्वनाथ एकटा जीव होतो.असं एकटा कथेचं वर्णन भावस्पर्शी शैलीत केले आहे.पतीपत्नीच्या नात्यातील चेहरे आणि मुखवटे यातील प्रेम भरती कथेत व्यक्त केले आहे.
 'कलाकमल' खेळण्यांच्या कंपनीमालकास आपला एक डोळा दान करणारा कंपनीतील एक कामगार आबा देवकुळे.मालकाची दृष्टी गेली अथवा निधन झाले तर कंपनी बंद पडेल त्यामुळे कामगारांना रोजगार दुरापास्त होईल,मी दिलेल्या डोळ्यामुळे त्याच्या दृष्टीत कामगारांची कणव दिसेल.केवढा दूरदर्शी विचार आबा देवकुळेच्या व्यक्तिचित्रातून रेखाटला आहे.दहावा ग्रह या कथेत मुलीच्या स्थळाविषयी चौकशीला सामोरे गेल्यावर भूतकाळातील बहिणीच्या लग्नासाठी मारलेल्या खेळांची आठवणी तराळल्या.लग्न आणि घड्याळ विक्रीचा व्यवहार यातील उहापोह करतानाचा प्रसंग मार्मिकपणे शब्दबध्द केला आहे.सर,अढळपद,
मुक्तछंदा,पुरुष,शिळा अहिल्या,शोध आणि भरारी या कथाही रसपूर्ण, भावपूर्ण असून वाचताना कुतुहलाने उत्कंटा वाढते.नातेसंबधातील वीण गुलमोहर कथा संग्रहातील कथेचा रसास्वाद घेताना वपुंची विचारशील शैली,इत्यंभूत वर्णन आणि चपखल शब्दांनी रसिकांना मंत्रमुग्ध करते.
🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾🍂🍃
पुस्तकाचे नांव- गुलमोहर 
कथासंग्रह
लेखक-व.पु.काळे
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
पृष्ठे--१२८
आवृत्ती-
किंमत--१३०₹
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
🍀🌿🌾🍃🍂🌳

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड