४|पुस्तक परिचय क्षमताधिष्ठीत सप्तरंगी कला, रमेश जावीर
💫🌿💫🌿🌿💫🌿💫
✒️४|पुस्तक परिचय📔
🔰 क्षमताधिष्ठीत सप्तरंगी कला
लेखक-श्री रमेश जावीर
प्रकाशन-अनार्य पब्लिकेशन खरसुंडी (सांगली)
प्रकाशिका-सौ सुवर्णा रमेश जावीर
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
'केल्याने होत आहे रे आधि केलेची पाहिजे' या उक्तीप्रमाणे या ललित लेखांचे निर्मिक श्री रमेश जावीर सरांनी रयत शिक्षण संस्थेत माध्यमिक शिक्षक म्हणून विविध गावी ज्ञानकर्म करत असताना प्रत्यक्ष अनुभूती घेऊन ,करून ,पाहून तदनंतर लेखात व्यक्त झाले आहेत.त्यांच्यात शब्दात सांगायचे तर, सुचलं तसं केलं,जे अनुभवलं ते लिहिलं.नवनिर्मिती ठरवून न करता, सकारात्मक दृष्टीकोनातून त्यांनी या ललित कला यशस्वी केलेल्या आहेत.खरोखरच ललित कलांमध्ये काष्ठशिल्प कलेचे माहेरघरच स्वत:च्या रहात्या घराला सजवलेले आहे.त्यांचे चित्रकला ,काष्ठशिल्प आणि वस्तू संकलन जीवनाचा ध्यास आहे.
या ललित लेखमालेच्या पुस्तकाला पोसेवाडी ता.खानापूर जि.सांगली येथील संशोधन अधिकारी डॉक्टर वाय.के.शिंदे यांची लाभली आहे.ते म्हणतात,'श्री रमेश जावीर यांनी साकारलेली "सप्तरंगी कला" ची निर्मिती पाहून कोणालाही जीवनात आपण काहीतरी उपयुक्त कार्य करु शकतो.अशी प्रेरणा झाल्याशिवाय राहणार नाही.याची प्रचिती पुस्तक वाचताना येते.आत्मविश्वासाच्या बळावर परिस्थितीशी संघर्ष करुन मनाला गवसणी कशी घातली हे,'मला असं सांगायचं.'या लेखातून समजते.छंदवेड्या, अवलिया संग्राहक आणि धडपड्या शिक्षकाची जिद्द, चिकाटी ,तळमळ आणि कलेवरील निष्ठा विद्यार्थ्यांना दिशादर्शक आहेतनिसर्गाने जीवन यशस्वीतेसाठी एक तरी चांगली गोष्ट दिली आहे.तिचा शोध घेण्याची स्वयंप्रेरक शक्ती या पुस्तकातून मिळते.
रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव (उच्च शिक्षण)प्रि.व्ही.जी.कसबेकर यांचा अभिप्राय ही वाचनीय आहे. जीवन व्यवहारातील कौशल्ये सकारात्मक दृष्टीकोनातून पाहून, त्यांचा विद्यार्थ्यांनी सुप्त गुणांना वाव कसा द्यावा.याचे सप्तरंगी कला नावाचे पुस्तक लेखन केले आहे या पुस्तकामध्ये त्यांनी फोटोग्राफी ,पक्षीनिरीक्षण ,चित्रकला, नाणी संग्रह ,शिल्पकला भाषण ,लेखन, मुलाखत कशी घ्यावी,
भेटकार्ड कसे करावेत आणि सुंदर हस्ताक्षर यावरील लालित्यपूर्ण लेखन त्यांनी केलेले आहे आणि विद्यार्थ्यांना ते करून पहा असा मंत्र देतात.आपल्या आवडत्या छंदा पोटी श्री रवी जावीर सरांनी केलेली साधना खरोखरच स्तुत्य आणि अभिनंदनीय आहे हे पुस्तक विशेषता शाळांमधील कार्यानुभव या विषयाचे पूरक संदर्भ साहित्य ठरावे आणि कार्यानुभव विषयातील अध्ययन अध्यापन कौशल्य वृद्धिंगत होण्यासाठी निश्चितच या पुस्तकाचा उपयोग होईल असा अभिप्राय दिला आहे.
श्री दिनकर पाटील साहेब संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधक मंडळ, पुणे त्यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी असताना त्यांनी या पुस्तकास शुभेच्छा दिलेल्या आहेत. "आपल्या शिक्षकी पेशाशी इमान राखून श्री रमेश जावीर सरांनी तितक्याच जोमाने साहित्य लेखन केलेले आहे. उपक्रमशील शिक्षक कसा असावा हे तत्व जावीर सरांनी अंगीकारले आहे .
या पुस्तकात २१ लेख अनुक्रमणिकेत आहेत. १) रंग, रूप, वेष आणि आकार २)गरुड भरारला ३)ओम नमो गणपतये नमः ४)अॅन एलिफंट फायटिंग ऑन अ क्रॅब ५) चांदण्यांचा झुंबर६) फुलदाणी ७)फावल्या वेळेचा सदुपयोग ८)मी' होलिया' कार झालो.
९)पानाफुलांचा संकल्प १०) बगळ्यांची माळ उडे अजूनी अंबरात११) मी भाषण करतो१२) छंद पहावा जोपासून १३)टाकाऊतून टिकाऊ १४)मुलाखत कशी घ्यावी १५)वर्तमानपत्रातील कात्रण १६)स्क्रॅप बुक १७)फोटोग्राफी १८)त्रिमिती चित्रे १९)सप्रेम भेटकार्ड २०)मला असं सांगायचय २१)सुंदर हस्ताक्षर असे नाविन्यपूर्ण ललित लेख आहेत.
रंग, रुप ,रेषा आणि आकार या लेखामध्ये ते चित्रकलेचे महत्त्व संबोधित करतात.चित्रातील बारकावे बारकाईने इत्यंभूत शोधून बहारदार आणि आनंद देणारे चित्र कसं रेखाटावे याची माहिती देतात.बालपणी सरांना ब्रशने चित्रकारी करायची होती पण त्यांच्या हाती खडू आणि पेन आला.ते इंग्रजीचे अध्यापक झाले.पण चित्रकलेवरील त्यांची निष्ठा अजिबात ढळली नाही.चित्रनिर्मितीसाठी कसं निरीक्षण करावे याचे गंमतीशीर विधाने करत समारोप करतात.
गरुड भरारला या लेखात काष्ठ शिल्प कलेचे वर्णन करतात.
क्षमताधिष्ठित सप्तरंगी कला हे पुस्तक छंदांची जोपासना कशी करावी याचे दिशादर्शक आहे.
--------------------------------------------
पृष्ठे-१०८
किंमत-६०₹
आवृत्ती-प्रथम
शब्दांकन-✒️श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
💫〰️💫〰️💫〰️💫〰️
Comments
Post a Comment