प्रासंगिक वि.स.खांडेकर


कोकण गोवा निसर्ग भ्रमंती , खाद्यसंस्कृती 

वेंगुर्ला तालुका पर्यटन 


 ऋषितुल्य गुरुवर्य साहित्यिक वि.स. खांडेकर यांचे शिरोड्याविषयी भावनेचा ओलावा त्यांच्याच शब्दांत……. 

  

  मराठी साहित्याला खऱ्या अर्थाने देशपातळीवर लोकप्रियता मिळवून देणारे ऋषितुल्य गुरुवर्य ज्येष्ठ साहित्यिक भाऊसाहेब तथा वि. स. खांडेकर यांच्या साहित्याचा विचार करावा लागेल भाऊसाहेबांच्या बहुचर्चित ययाती या कादंबरीला देश पातळीवरील सर्वोच्च साहित्याच्या क्षेत्रातील "ज्ञानपीठ" पारितोषिक मिळाले होते, या पुरस्काराने मराठी भाषा आणि संस्कृतीचा सन्मान केलेला होता. याच पुरस्काराने मराठी साहित्याकडे खऱ्या अर्थाने इतर भाषिकांची लक्ष वेधले गेले .

 वास्तववादी सामाजिक आशयाशी निगडित असणारी ययाती कादंबरी आहे.

  १९४१सालच्या समीक्षा मासिकाच्या दिवाळी अंकातील लेखात कर्मभूमी शिरोडा गावाविषयी व्यक्त केलेले मत..

  शिरोडागावाला त्यांनी माहेर संबोधले आहे. मला हवीहवीशी वाटणारी सारी माणसं मला भेटतील.पण आप्पा नाबरांची मुद्रा दिसणार नाही.भोळे भाबड्या वात्सल्याचं शिरोड्यात अवतरलेले प्रेमळ व्यक्तिमत्त्व होते.'गरीब विद्यार्थी फंडाला मदत करा !' अशी आप्पांच्या आवाजातील ललकारी भाऊसाहेबांच्या कानी आली होती,तेव्हा पेटीवरल्या छोट्या मेणबत्तीच्या प्रकाशाने उजळलेली आप्पांची  प्रसन्न मुद्रा अजूनही मला आठवते. असं भाऊसाहेब आपल्या भाषणात सांगत.

      भाऊसाहेबांना चित्रपटांचे कथानक इथंच रुजले.लघुनिबंधाचे घटनाप्रसंग इथेच सुचले याच पंचक्रोशी च्या परिसरातील दगड धोंड्यांनी समुद्राने टेकडी नी फुलांनी काट्यांनी फुलांनी माणसांनी प्रेम करणाऱ्या विरोध करणाऱ्या माणसांनी मला माझे साहित्य सजवायला फार मोठी मदत केली नुसते इकडे तिकडे बघितले तरी अनेक आठवणी जाग्या होतात.१२ एप्रिल १९२० रोजी मी त्याच वाटेने सावंतवाडीहून शिरोड्या पर्यंत चालत गेलो होतो तो दिवस मला आठवतो त्या दिवसाची आठवण सतत जागृत राहिला दुसरी गोष्ट घडली मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो ही तारीख १२ एप्रिल १९४१ होती.

   साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात पहिल्यांदा सांगितलंकी ,मी आमच्या वर्षापूर्वी वाटचाल करत होतो आणि वाटचाल करीत येथे पोहोचलो तिथे जे मला पुस्तक आढळले, त्या पुस्तकातली पुष्कळशी पानं काढून मी माझी अनेक पुस्तके लिहिली दुसरं काही केलं नाही ही गोष्ट अगदी खरी आहे. मोठ्या माणसां प्रमाणे आपण काहीतरी द्यावे एवढीच माझी इच्छा होती.  ज्याप्रमाणे लायब्ररीतील  पुस्तके स्वच्छ करता येतात त्याप्रमाणे माणसांची मनं आपल्याला स्वच्छ करता येतील का? येणार असतील ती कशाने करता येणार ,असे अनेक प्रश्न मनात यायचे. काय लिहायचे, कशासाठी लिहायचे ?कुणाकडे द्यायचे? हे सगळे प्रश्न माझे मलाच पडत आणि मीच उत्तर देण्याचा प्रयत्न करीत राही. पण जे लिहायचं त्यासाठी लागणारे साहित्य मला शिरोड्यातच गवसले. लेखनाची मला खऱ्या अर्थाने स्फूर्ती मिळाली एवढी गोष्ट म्हणजे एवढी गोष्ट मात्र खरी

 शिरोडयाचे  माझ्यावर अनंत उपकार आहेत साहित्यसम्राट न. चि. तथा तात्यासाहेब केळकरांनी मला एकदा तिथे असताना विचारले होते,' तुम्ही या खेडेगावात वाचनाची भूक भागवता तरी कशी ?' तुम्हाला इतक्या गोष्टी सुचतात ,कादंबऱ्या सुचतात, त्या सुचतात कशा ?'

 मी त्यांना सांगितले,' मी नेहमी एक पुस्तक वाचत असतो. रात्रंदिवस त्या पुस्तकाचेच चिंतन चाललेले असते.' ' त्या पुस्तकाचे नाव काय?',' शिरोडे 'मी म्हटले दुसरे पुस्तक नाही. हे शिरोड्याचे आणि माझं नात आहे. शिरोड्याने माझ्यावर अनंत उपकार केलेले आहेत.

  गावातील एका वृद्ध गृहस्थाने सद्भावनेने सांगितले होते की,' खांडेकर हा तरुण आहे त्यांना या जगाचा अनुभव नाही.पूर्वी इथं सात आठ वेळा शाळा काढायचा प्रयत्न केला पण ते असफल झाले.या गावात शाळा चालणे अशक्य आहे.या भानगडीत पडू नये.त्या रात्री मी अस्वस्थ होतो.आपण कुठेही गेलो तरी याच परिस्थितीला तोंड द्यावे लागणारच.

विरोध झाला तरी उभे रहायचेच. लढाई आपण हारतो की जिंकतो हा मुद्दा महत्त्वाचा नाही आपले निशाण सोडायचे नाही.जीवात जीव असेपर्यंत आपलं ध्येय आणि जिद्द सोडायची नाही. सुदैवाने माझ्या ईर्षेला सहकार्य देणारे गुरुवर्य अ.वि.बावडेकर, श्री बाबुराव दळवी श्री घनश्याम आजगांवकर आणि शिनारी मास्तर ही मंडळी मिळाली. आम्ही सर्वांनी नेटाने उभे राहिल्यावर शाळा नुसतीच उभी राहिली नाही तरी शाळा वाढली आणि या एका शाळेच्या तीन शाळा झाल्या.

एकेकाळी मनात चितारलेले चित्र असे होते की संसारनौका सुखाने फार लवकर तडीला लागेल.आपण मोकळे होऊ.साठी-पासष्टीत फार झाले तर देवाने अधिक आयुष्य दिले तर शेवटची पाच-दहा वर्षे पुन्हा आपल्या शिरोड्याला जाऊ.तिथं राहू.लहर आली तर शाळेत जाऊन एखादा तास शिकवू नाहीतर डोंगरीवर जाऊन बसू,समुद्रावर जाऊन बसू आणि ज्या काही कादंबऱ्या लिहायच्या राहिल्या आहेत त्या पुऱ्या करु.मनसंकल्प पूर्ण करु.शिरोडे कसे झाले आहे ते बघू.प्रेमदेणाऱ्या कर्मभूमीवर सदैव अलोट प्रेम वृध्दिंगत करणारे अलौकिक व्यक्तिमत्त्वाचे प्रतिभावंत चतुरस्त्र साहित्यिक वि.स.खांडेकर तथा भाऊसाहेब खांडेकरांना शतशः प्रणाम आणि अभिवादन…..!


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड