काव्य पुष्प २१३ गुढीपाडवा



नववर्षाच्या आणि चैत्र गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

         गुढीपाडवा
नववर्षाच्या सण हा आला 
प्रारंभ करु गुढीउभारायला 
सुरक्षेची काळजी घेऊन 
आरोग्याची गुढी उभारुया|

चाफ्याची फुले,पालवी लिंबाची 
कलश तांब्याचा, पैठणी रेशमाची  
नव्या वेळूला गाठी साखरेची 
सात्त्विक लहरीने पूजनाची|

पुरणपोळीचा नैवेद्य अर्पूया
उंबरठ्यालगत गुढी उभारुया
रांगोळीने अंगण सजवूया
नववर्षाचे स्वागत करुया  |

नवविचारांनी स्वप्ने पाहूया
नवसंकल्पाची आस धरुया
सुखसमृद्धीची गुढी उभारुया 
पाडव्याचा आनंद वाढवूया|

नात्यांची वीण घट्ट करुया
मैत्रीचा परीघ विस्तारुया
कडूगोड प्रसाद खाऊया
नववर्षाचे स्वागत करुया|

ही गुढी एकतेची समतेची 
आनंदमोदहर्ष समृध्दीची 
आश्वासक विश्वासाची
मांगल्याच्या भावनेची|

आगमन वसंतॠतूचे

नवी पालवी फुटण्याचे

प्रसन्नतेच्या चैतन्याचे 

नवसर्जनाच्या उन्मेषाचे |


श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई







Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड