काव्य पुष्प-२३१ गरगर फिरतो भोवरा
गरगर फिरतो भवरा
शाळेच्या मधल्या वेळी
भवरा फिरवायचा चंग
शाळकरी दोस्तांची खेळी
गतीचा वेग बघण्यात दंग
कर दोरीनं फिरवला भवरा
अलगद घेतला तळहातावर
एकटक बघती गतीचा भवरा
फिरतोय तो गरागरा आरीवर
पैज लावती भवऱ्याच्या गतीची
खात्री लय वेळ फिरण्याची
उमेद इर्षा पैज जिंकण्याची
उकळी फुटतेय हासण्याची
हौस आवडीच्या खेळाची
सर नाही मैदानी खेळाची
आठवण येते बालपणीची
मातीतल्या जुन्या खेळाची
दि. ८ जुलै २०२१
छानच
ReplyDeleteधन्यवाद दोस्त
ReplyDeleteछान
ReplyDeleteधन्यवाद मिञहो
ReplyDelete