काव्य पुष्प - २३५ मेघांची वारी पंढरीची वारी









        गजर हरीचा गजर भक्तीचा 


मेघांची वारी,आषाढ सरी |

पंढरीची वारी, माझी वारी  |


नभ उतरले माथ्यावरी

पांघरली दुलई ढगांनी

धूसरली हिरवी छाया 

खेळ होई पाठशिवणी||


सरीवर सर चळक वाढी

झालं ओलं शिवार

फण रेघोट्या ओढी

कुळव नांगरी वावार ||


मेघांची आली वारी 

झालं रिंगण भुईवरी 

वात लहरी फेर धरी

थेंब होई विणेकरी||


दिंडी आली मेघांची

नाचती आषाढ सरी 

साधना भाव-भक्तीची

गजर करती जयहरी ||


आली दिंडी मेघांची

बरसली थेंब थेंब धारं

पीकं बहरली चैतन्याची

पंढरी माझं शेतशिवारं||


भावभावनांचा वारु नाचे  

मनगाभाऱ्याच्या रिंगणी

आषाढ सरींनी उसळल्या 

सुखलहरी हर्षाच्या अंगणी ||


भक्तीची वारी घडते पंढरपुरी

जय जय विठ्ठल जय हरी

पावले थबकली आता घरी

घरीच साजरी पंढरीची वारी||


श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

दिनांक  १८ जुलै २०२१




Comments

  1. सुंदर शब्दांकन👌

    ReplyDelete
  2. सुंदर रचना सर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड