काव्य पुष्प-२३६ बेंदूर सण

सर्वांना बेंदूर (बैलपोळा) सणाच्या हार्दिक शुभेच्छा!






           बेंदूर 


सण आनंदाचा क्षण कृतज्ञतेचा

आज हाय सण बेंदूर पशुधनाचा

कृषी संस्कृतीच्या स्वस्तिकाचा

मिरवणूकीत मान सर्जा राजाचा |


बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त 

 करण्याचा बेंदूर सणं

पूजा करून फेडती 

तुझ्या उपकाराचं देनं|


रंगबिरंगी शोभिवंत गोंडे

झुली शेंब्या बाशिंग चाळ 

शिंगांना चमकती बेगिड 

गळ्यात वाजे घुंगरमाळ|


सण आहे मराठमोळा 

साजरा करा बैलपोळा

मिरवत नेहूया राऊळा 

सर्जाराजाला ओवाळा|



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड