२|पुस्तक परिचय भारतीय संस्कृती, साने गुरुजी



💫🌿💫🌿🌿💫🌿💫

✒️२|पुस्तक परिचय📔

🔰भारतीय संस्कृती

लेखक-साने गुरुजी

प्रकाशन-कॉंन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

  मातृप्रेमाचे महामंगल स्त्रोत्र ज्यांच्या लेखनीतून रचले."श्यामची आई "अमृतवेल  घरोघरी वाचली जाते.अशा संस्कारक्षम कृतीशील अनुभवांचे विचारपीठ आणि संवेदनशील मनाचे साने गुरुजी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले  "भारतीय संस्कृती" हे विचारपुष्प आहे.भारतीय संस्कृतीची दृष्टी दाखविण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे.साने गुरुजींनी विविध ठिकाणी दिलेल्या व्याख्यान  व प्रवचनातील विचार आणि थोरामोठ्यांचे ऐकलेले विचार  श्रोत्यांच्या आग्रहास्तव या पुस्तकात मांडले आहेत. परमपूज्य आचार्य विनोबाजी भावे यांचे मौल्यवान विचार विस्तृतपणे मांडले आहेत. आचरणशील संस्कारांचा  समावेश यात आहे.

संस्कृतीच्या गाभाऱ्यात प्रवेश करुन तिच्या अंतरंगाचे दर्शन आपल्याला २३प्रकरणात घडते.तत्वज्ञान आणि आचरणशील पैलू व गुणांची ओळख आपल्याला श्र्लोक आणि त्यांच्या अर्थाची ओळख घडते.आपले आचरण कसे असावे.याचाउहापोह या पुस्तकात साने गुरुजींनी केलेला आहे.

       अद्वैताचे अधिष्ठान आणि साक्षात्कार, बुध्दीचा महिमा, प्रयोगशील ऋषी,वर्ण,कर्म, भक्ती,ज्ञान,संयम,कर्म फलत्याग, चार पुरुषार्थ व आश्रम ,स्त्री,मानवाचे सृष्टी प्रेम,बलोपासना, पूजा,प्रतिके मृत्यू आणि श्रीकृष्ण या विषयावर विवेचन केले आहे.

   महान वचने ओठांवर,पोटात काही नाही! परंतु धर्म जीवनात आल्या शिवाय जीवन सुंदर होत नाही.भाकरीचा तुकडा नुसता ओठांवर ठेवून भागत नाही;तो पोटात जावा लागतो, तेंव्हाच शरीर सतेज व समर्थ होते.थोर वचने जेंव्हा कृतीत उतरतील तेव्हाच समाज सुखी व आरोग्यसंपन्न होईल.हा विचार साने गुरुजींनी "अद्वैताचे अधिष्ठान" या प्रकरणात सहज सोप्या भाषेत श्लोकांचे नेमके अर्थ उलगडून दाखवले आहेत.

"There is nothing great or small in the eyes of God." देवाच्या दृष्टीने समाजसेवेचे कोणतेही कर्म उच्च किंवा तुच्छ नाही.ती ती सेवाकर्मे करणारे मंगल व पवित्रच होत.

 भारतीय संस्कृती कर्ममय आहे.सेवाकर्माला प्राधान्य देणारी आहे.आज सर्वांना पोसणाऱ्या  शेतकऱ्यांचा जीवनवृक्षावर जाणाऱ्यांनाच मान मिळतो.तो खरा कलावान आहे कारण उजाड दिसणाऱ्या जमिनीला विविधांगी पीके फळे फुलांनी सजवतो आणि हसवितो .त्याची आज काय स्थिती आहे याचेही सडतोडपणे लेखन केले आहे.प्रत्येकाची सेवासाधने पवित्र आहेत.लेखणी असो वा तलवार,तराजू असो वा नांगर,चूल असो वा झाडू,आरी असो वा वस्तरा,लेखणी असो वा हातोडा ही सारी सेवासुविधा देणारी साधने अमूल्य आहेत.

अनेक पैलूंचे महत्त्व उदाहरणे देऊन पटवून दिलेले आहे. संस्कृतीत एकेका संस्कारासाठी ,सद्गुणांसाठी,एकेका ध्येयासाठी आपल्या सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणास दिसतात.हा इतिहास संत आणि वीरांचा आहे.त्याग आणि पावित्र्य सर्वात महत्त्वाचे सद्गुण आहेत.भारतीय संस्कृतीच्या उपासकांचे  वैचारिक अनुभव सुसंगतपणे,

मार्मिकपणे प्रस्तुत केले आहेत.हे पुस्तक वाचनातून  आपल्याला संस्कृतीची नवी दृष्टी कळते.नेमकेपणा समजतो.

   "या रे, या  रे,अवघे जन '' अशी हाक महान उपासक मारीत आहेत.ही हाक ज्याच्या हृदयाला पोचेल तो धन्य होय.सद्गुणांचे आविष्कार सजगतेने परखडपणे मांडले आहेत.एक विचारांना चालना मिळणारे पुस्तक आहे.

---------------------------------------------

भारतीय संस्कृती

साने गुरुजी

कॉंन्टिंनेन्टल प्रकाशन,पुणे

पृष्ठे-२५०

किंमत-रु ७५

पंधरावी पुनरावृत्ती

शब्दांकन-✒️श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

Comments

  1. धन्यवाद श्रीमान जाधव सर

    ReplyDelete
  2. मातृहृदयी साने गुरुजींना विनम्र अभिवादन🙏🙏आपण दिलेली शाब्दिक मानवंदना अप्रतिम.
    सुंदर, समृद्ध ,आशयपूर्ण लेखन बंधू👌👌🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड