१६|नापास मुलांचे प्रगतिपुस्तक, अरुण शेवते
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
१६|| पुस्तक परिचय
नापास मुलांचे प्रगतिपुस्तक
संपादन-अरुण शेवते
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
आजचं स्पर्धेचे युग आहे.कित्येक ठिकाणी माणसं रांगेत उभी आहेत.अशा वेळी रांगेतल्या माणसांकडे आत्मविश्वासाचे बळ त्यांच्या मनगटात पाहिजे.वेळच्या वेळी बालपण ते कुमारवयातील झालेल्या चूका समजून घेणं हे पालकांचं काम आहे.योग्य वेळीच मुलांना समजून घेऊन मार्गदर्शन केले पाहिजे.एक मुलगी संपादक अरुण शेवते यांना सांगत होती.'ती नापास झाली तेव्हा वर्षभर तिच्या वडिलांनी तिच्याशी अबोला धरलास होत,तो ती पास झाल्यावरच सोडला.'नापास होणं म्हणजे वाईट आणि क्लेश निर्माण होते.मन सैरभर होते.त्यात आपल्याच मुलीशी अबोला धरतो अतिवाईट, शिक्षणापेक्षा आपली मुलं महत्त्वाची आहेत.आपण पालकच त्यांच्यावर अपेक्षांचा ओझं लादत असतो.त्याचा कल समजून न घेता प्रेशर देत असतो.ज्याला आपण जग दाखवलं,त्याच्या जगात किंचितसा अंधार निर्माण झाला तर त्याला समजून घेणं आवश्यक आहे.नापास होणं हा तत्कालिन अपघात असतो.पण हा अपघात म्हणजे पूर्ण आयुष्य नव्हे!ऊन-सावल्यांचा खेळातील लहानसा ठिपका होय.थोडं सावरलं तरी तो क्षणात धूसर होऊन निघून जातो.
कितीतरी थोर माणसांच्या आयुष्यात असे नापासाचे निराशेचे ठिपके आले होते.पण त्यांनी नव्या जाणिवांनी नव्यावाटेने आत्मविश्वासाने जाऊन ते ठिपके पुसून टाकले आहेत.म्हणूनच त्यांचे नाव इतिहासात लिहिले आहे.त्यांच्या आयुष्याचे प्रगतिपुस्तक आज समाजापुढे आदर्श आहे.शिक्षणातून ज्ञान,
ज्ञानातून व्यवहार ज्ञान समजते.जगण्याचे भान कळते.
शिकत असतानाच आपलं व्यक्तिमत्त्व घडत असतं.
आपल्यात अमाप उत्साहाची ऊर्जा असते.ती ऊर्जा अनेक दिशांचे दरवाजे उघडून शकते.मनात असं का? तसं का?असे नाना प्रश्न कुतूहलाने उमटत जातात. या प्रश्नातूनच आपल्याला उत्तरे मिळत राहतात.
'नापास मुलांचे प्रगतिपुस्तक',या पुस्तकात साहित्यिक अरुण शेवते यांनी २५ सिनेमा, साहित्य, संगीत आणि सामाजिक थोर माणसांच्या जीवनातील नापासीचे धूसर ठिपकेआपल्या सहज सुंदर आशयघन आणि समर्पक शब्दांत मांडले आहे.साहित्यशारदेचे प्रसिद्ध साहित्यिक अरुण शेवते यांची ग्रंथसंपदा विपुल आहे.चौफेर लेखन केले आहे.त्यांच्या 'कावळ्यांच्या कविता'या कविता संग्रहास व 'तळघर'या साहित्य शिल्पास महाराष्ट्र शासनाने राज्य पुरस्काराने सन्मानित केले आहे.तर 'राजघाट' या पुस्तकास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 'राजकवी यशवंत पुरस्कार'
मिळाला आहे.'कृष्णाकाठचा माणूस'या ग्रंथास महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेने 'सह्याद्री'पारितोषिकाने त्यांचा गौरव केला आहे.
शेक्सपिअरने म्हटल्याप्रमाणे 'तारुण्याच्या गुर्मीत तुम्ही वेळेची उधळमाधळ करता,नंतर तोच काळ तुम्हाला कुरतडून खातो.'तर ग्रॅहम ग्रीनने म्हटल्याप्रमाणे ,'प्रत्येकाच्या बालपणात एक क्षण असा येतो की एक खिडकी अचानक उघडते आणि सारा भविष्यकाळ आत येतो.यातील मान्यवरांचे लेख हे जीवनचरित्र ,पुस्तके आणि मासिकात पूर्व प्रकाशित झालेले आहेत.ते संपादित करुन वाचकांना उपलब्ध करून दिले आहेत.
सिनेजगतातील सुप्रसिद्ध अभिनेते आवाजके दुनिया के मसिहा डॅशि़ंंग हिरो अमिताभ बच्चन यांच्या पिताजींचा 'चिरंजीव अमिताभ' लेख, सविता दामले यांनी शब्दा़ंकित केलेला किशोरी आमोणकर यांच्यावरील'आईचे संस्कार', तर प्रसिध्द चित्रपट निर्माते व दिग्दर्शक व्ही.शांताराम यांचा,''
आज मी पास झालो होतो", डॉक्टर श्रीराम लागू यांचा 'एक खिडकी अचानक उघडते',हे लेख वाचताना आपण भारावून जातो.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील'न उलगडलेले कोडे'हा नीला शर्मा यांचा लेख बाबासाहेबांची ऐतिहासिक सफर घडवितो.प्रतिभा गुंडी यांनी अनुवादित केलेला 'क्षितिजा पलिकडे'हा सामाजिक, वांशिक भेदभाव जुलूमाविषयी लढा दिलेले नेते क्रांतीकारक नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांच्या वरील लेख खडतर संघर्ष व आत्मविश्वासाचे बळ देतो.वसंत भालेकर लिखित सगळ्यांना मार्मिकपणे विनोदाने हसायला लावणाऱ्या अभिनयाचे दादांवरील ''असा मी…."लेख सिनेमाच्या क्षेत्रातील चढती कमान दर्शवितो.रेखा देशपांडे यांनी शब्दबद्ध केलेला 'एक नवा मार्ग सापडला',हा जगजीत सिंह यांच्या सांगितीक गझल गायन मैफिलीचे अंतरंग दर्शवितो.तर 'ठेच लागल्यानंतर' हा साहित्यिक मधु मंगेश कर्णिकांचा,'आपण जमिनीवर मात्र येतो' हे डॉक्टर अनिल अवचट 'अपयशही शिकवणं खूप काही'हा अच्युत पालव ,'काळं सावट'हा मारुती चितमपल्ली आदींचे लेख संघर्षपद भावस्पर्शी वाटतात. याशिवाय 'नापास झालेल्या मुलांची कथा' गुणाकारांने आयुष्य बदलले',बॉलिवूड अभिनेता' शाहरुख खान नापास होतो तेंव्हा';अच्युत गोडबोले यांचा 'रंटजेन आणि एक्सरे' तर प्रदीप कुलकर्णी यांचा 'प्रज्ञावंत न्यूटन' लेख संशोधन कार्यातील गरुडझेपेचा प्रवास घडवितात.वेळ उधळू नका,आणि मी रस्ता ओलांडला, आम्हाला कुरटे समजू नका,नवलनगरीची समाज्ञी,न्यज रीडर ते पद्मश्री ,माझी नृत्यशाळा आणि देव आनंदचा पहिलं पाऊल हे साहित्यकार, नृत्यांगना आणि अभिनेते यांची यशोगाथा वाचायला मिळते.
निराशेचे क्षण अवतीभोवती हिंडत असतात.अंधारात पावले अडखळतात.त्यातून बाहेर पडण्यासाठी ''नापास मुलांचे प्रगति- पुस्तक"वाचा.तुम्हाला नवी दिशा मिळेल; जगण्यासाठी बळ लाभेल.मोठ्या माणसांना परीक्षेत अपयश आले;पण जीवनाच्या परीक्षेत यशस्वी झाली आहेत.
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
पुस्तकाचे नांव-नापास मुलांचे प्रगतिपुस्तक
संपादन-अरुण शेवते
प्रकाशन- ऋतूरंग प्रकाशन,गोरेगांव, मुंबई
पृष्ठे-२४०
द्वितीयावृत्ती
किंमत-२२५
श्री रवींद्र लटिंगे ओझर्डे वाई
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
सर्व गुणवत्ता स्तरातील सर्वांना प्रेरक
ReplyDeleteधन्यवाद दोस्त
ReplyDelete