Posts

Showing posts from June, 2020

निसर्ग सौंदर्य सोनेश्वर कविता १४

Image
           निसर्ग सौंदर्य खळाळती कृष्णामाई   सोनेश्वरी खळाळती कृष्णामाई गाव -शिवाराची जीवनदायी खडकाळ मार्गावरी धारा धावती फेसाळत्या जलधारा धवल दिसती || जलधारा पूजते कातळाचे पाद्य  प्रवाहित धारांचे नादमयी वाद्य ऐकूनी कानांना गाणं भासे प्रवाह वाजवती ढोल ताशे|| झाडं वेली गवतांकूर ऐलतीरी पैलतीरी  कंंजाळुची झाडं शोभेे   गर्द हिरवीगार भारी आठवणीच्या स्थळाला पाऊल माझे वळले कृष्णामाईचे पात्र पहायला मन माझे अधिर झाले||    श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई छायाचित्र श्री सोनेश्वर तीर्थक्षेत्र ओझर्डे येथील कृष्णामाई

माझी भटकंती बनेश्वर भाग क्र..७७

Image
   🌱🍀🍃🌱🍀🍃🌱🍀🍃  माझी भटकंती            क्रमशः भाग --७७          🛕  बनेश्वर   🛕 🦋🌸🦋🌸🦋🌸🦋🌸🦋🌸 प्रवास दिनांक १७ फेब्रुवारी २०२० ➖〰️➖〰️➖〰️➖〰️➖〰️              फॅमिली टूर भीमाशंकर व महादेव वन भटकंती साठी मित्रांसमवेत जाण्याचं प्लनिंग सुरू होते...त्यातच चिरंजीव मित्राच्या लग्नानिमित्त चारपाच दिवसांची रजा काढून आलेला होता...त्याच्याशी अगोदरच चर्चा केली होती.सकाळी लवकरच  पप्पूच्या गाडीने फिरायला बाहेर पडलो.. नसरापूर फाट्यावरुन बनेश्वर कडे निघालो. शंकराचे देवस्थान व जवळच भोर उपविभागाचे वनपर्यटन केंद्र दोन्ही पाहून पुढे जावूया. असं नियोजन होतं. पप्पूने मंदिरापुढे गाडी पार्क केली. पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडत होता. वनश्रीने नटलेले अप्रतिम ठिकाण आहे.त्याला वन पर्यटनाची भटकंतीची जोड मिळाल्याने सर्वत्र हिरवेगार दिसते.प्रवेशद्वारातून मंदिरात गेल्यावर आपल्याला चारजलकुंडे दिसतात...समान पातळीवर असणारे पाणी आणि त्यात मुक्तपणे संचार करणारी कासवे बघा...

निसर्ग सौंदर्य नेकलेस पॉईंट कविता १३

Image
       नेकलेस पॉईंट  निसर्गाच्या सौंदर्याची श्रीमंती  सरीतेचे आभूषण किमती अनमोल नेकलेस शोभे कंठी  हिरवी पिवळी रंगीत वेलबुट्टी नदीचे सौंदर्य पहायला  हिरव्या शालूचे ऐश्वर्य संगतीला सिनेमाचे चित्रण स्थळ बघायला बहारदार  नेकलेस पाॅंईटला  निसर्गरम्य देखावा पाहूया                      मनमुरादपणे  नेत्री साठवूया जीवनदायिनीचा जलअलंकार चराचरावर करी परोपकार ❗ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

माझी भटकंती पालाना मांढरदेव भाग क्र--७६

Image
🥀☘️🌳🥀☘️🌳🥀☘️🌳            माझी भटकंती         🔅क्रमशः भाग-७६     🍁पालाना मांढरदेव🍁                  नोव्हेंबर  २००९  💫💫💫💫💫💫💫💫    रायरेश्वरापासून सुरू झालेल्या डोंगररांगेच्या मांढरदेव टेकडीच्या कड्याखाली असणारी दुर्गम वाडी पालाना.पर्यायी शिक्षण साधनव्यक्ती असताना मांढरदेव केंद्राचे केंद्रसमन्वयक श्री सदाशिव रुईघरे सरांसोबत या ठिकाणी जाण्याचा योग आला.. वाई वरुन आम्ही दोघे मांढरदेव घाटाने मांढरदेवला आलो.लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेली श्री काळूबाई माता.मांढरदेवी मातेचे मंदिर मांढरदेव गावात डोंगरमाथ्याच्या टेकडीवर आहे. प्राचीन काळातील मंदिर आहे.आम्ही दोघेही मातेच्या दर्शनासाठी प्रवेशद्वाराजवळ आलो.भव्य व आकर्षक प्रवेशद्वार आहे.तेथून मंदिरापर्यंत पायऱ्या चढत जावे लागते.पायऱ्यांच्या एका बाजूला विविध प्रकारच्या वस्तूंची दुकाने बघत बघत आम्ही मंदिराजवळ आलो.रुईघरे सर त्याच भागातील अनपटवाडीचे रहिवासी असल्यामुळे त्यांनी  या देवस्थान...

वृक्ष संवर्धन कोंढावळे परिसर कविता बिठ्ठीचे झाड १२

Image
    ☘️बिठ्ठीचे झाड ☘️     🔅पिवळी कण्हेरी🔅       परिसरात फिरताना नजरेत भरलं  पहाया उत्सुकतेने हातात धरलं          पिवळंधम्मक फुल नाचू लागलं कळ्या फुलांनी सजू लागलं दोन वर्षांपूर्वीचं रोपटं झुडूप झालय        खुललेल्या कळीचं फुल झालय  टोकदार पर्णात गेंददार सूमन          नव मित्राचे शानदार आगमन      मित्रा तू बहरत रहा                 कळीचा फुलोरा करत रहा   फुलांची फळे होऊद्या        खेळाला बिठ्ठी मिळूद्या... श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

माझी भटकंती माथेरान भाग क्र-७५

Image
🥀☘️🌳🥀☘️🌳🥀☘️🌳            माझी भटकंती         🔅क्रमशः भाग-७५           🍁माथेरान🍁 दिनांक २१  जानेवारी २०१६  💫💫💫💫💫💫💫💫    पहाटे पहाटे  वानरांच्या पत्र्यावरील उड्यामुळे जाग आली.. आवराआवर करून सकाळच्या वेळेतच माथेरान भटकंतीला निघालो.. "माथेरान " सह्याद्रीच्या डोंगररांगेपेक्षा वेगळी डोंगररांग रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण.प्रेक्षणिय  पर्यटन स्थळ समुद्रसपाटीपासून २६००फूट उंचावरील गिरीस्थान.डोंगरमाथ्यावरील पठारी भाग विपुल वृक्षांनी सजलेला आहे.सगळीकडे घनदाट झाडी हिरवागार गालिचा, आल्हाददायक व आरोग्यदायी  वातावरण आणि अतुलनीय निसर्ग सौंदर्यामुळे हौशी पर्यटक माथेरानला आवर्जून येतात.. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी येथे कोणतीही वहाने आढळत नाहीत. शहरातील सगळा  प्रवास चालत , घोड्यावरुन नाहीतर माणसांनी ओढण्याचा रिक्षाने प्रवास करावा लागतो.केवळ मिनी ट्रेनच शहरात येते.दस्तुरी नाक्याजवळ आपोआपली सर्व वहाने पार्क करून पायवाटेने किंवा रेल्वेरुळावरुन चालत दोन...

निसर्ग सौंदर्य जांभळी डोंगर कविता रानफुले ११

Image
              रानफुले हिरवागार तुरा गुलाबी कडं | डामडौल न्यारा मजेदार रुपडं | फूले रुबाबदार ताठ बाणा | खुलती फुले तव बघताना |  सौंदर्य  फुलांचे दिसे छान | रानातली नजाकत रुपवान | गवत फुलांचा फुलोरा |  सुंदर दिसतेय धरा...... श्री रविद्र लटिंगे ओझर्डे वाई छायाचित्र जांभळी नदी शिवार

माझी भटकंती माथेरान भाग क्र-७४

Image
                  🌳🍀🌳🍀🌳🍀🌳🍀🌳🍀              माझी भटकंती क्रमशः भाग-७४                        प्रवास दिनांक २० जानेवारी २०१६            माथेरान               🔆🍀🔆🌳🍀🔆🍀🌳🍀🌳 माथेरान मुंबई जवळील नामांकित हिलस्टेशन आणि तेथील फुलराणी ट्रेनने प्रवास करत माथेरानला जाणं म्हणजे मस्तच पर्वणी असते. डोंगररांगाचे नैसर्गिक नजराणे बघत बघत फोटोग्राफी करत मजेत भटकंती करायची.   नेरुळला  नातेवाईकांच्या लग्नासाठी गेलो होतो.लग्न वेळ दुपारची होती.लग्नानंतर वाईला यावे का मुंबईला जावे याची सौभाग्यवतीशी चर्चा करत होतो. जवळच्या एखाद्या ठिकाणी जाऊया असं माझं होतं.. ओळखीच्या नातेवाईकांशी जवळच्या ठिकाणांची चर्चा करता करता माथेरानचा विषय निघाला... कसं जायचं याची माहिती घेतली. लग्नाच्या कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही दोघे  रिक्षा करून नेरुळ रेल्वे स्टेशनला...

निसर्ग सौंदर्य कोंढावळे गाव १०

Image
         कोंढावळे डोंगराच्या पायथ्याशी             कोंढावळे गाव सालपाई माते नवसाला पाव  डोंगर उतारावर शेती भाती शेतकरी काबाडकष्ट करती आंबाफणसाची दाटीवाटी सुईर पळस बांधी शोभती गवत पिवळे ,कुसळावरी रानोमाळी अन् बांधावरी.... श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई छायाचित्र कोंढावळे परिसर

माझी भटकंती चवदार तळे भाग क्र--७३

Image
[5/12, 10:26 AM] ravindralatinge:                       🍂🍀🍂🍀🍂🍀🍂🍀🍂🍀        माझी भटकंती                              क्रमशः भाग -क्रमांक ७३                  🌱  शिरवली व चवदार तळे महाड 🌱  दिनांक-११ मे २०१७ 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️        उन्हाळ्याच्या सुट्टीत श्री रियाज पटेल सरांच्या  कन्येच्या विवाहनिमित्ताने शिरवली ता.महाडला श्री शिवाजी फरांदे सरांच्या गाडीतून निघालो.मी,श्री शिवाजी फरांदे,श्री सुनील जाधव,श्री शिवाजी चव्हाण व श्री दिलीप कासुर्डे बापू  असे आम्ही शिक्षकमित्र पाचजण.    सकाळी लवकर पांचगणी महाबळेश्वर करुन आंबेनळी घाट व पार घाटातून पोलादपूरला आलो.. पोलादपूरला मस्तपैकी हॉटेलमध्ये पुरी भाजीचा नाष्टा केला..गाडीत  पेट्रोल भरत असताना श्री.विकास शेडगे सरांना शिरवलीला कसे जायचे हे फोनवरून विचा...

आठवणीतील अतिवृष्टी काव्य ९

Image
आठवणीतील  अतिवृष्टी                     आभाळ फाटू लागलं               नभी ओथंबून आलं    वारा गर्जू लागला          धूवांधार वर्षाव झाला पाणी वाढू लागलं        पाणी विस्तारु लागलं नदीमाय दुथडीने वाहू लागली..  सगळ्यांची त्रेधातिरपिट उडाली पुलाला घासून पाणी वेगात निघालं  बघणाऱ्याच्या काळजात धस्स झालं  शिवारातल्या मातीचा रंग  पाण्याला  लागला.... खळाळत लोंढा धरणाकडं  पळाला....      धरणात  पाणी रुंदावू लागलं....   भविष्याचा संचय करु लागलं.....     तृणपाती डोंगरी दाटी करु लागली....  जित्रांबाचा चारा फोफावू लागला ... श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

माझी भटकंती रामोजी फिल्मसिटी भाग --७२

Image
शालेय उपक्रम माझी भटकंती पुस्तक परिचय माझी ज्ञानमंदिरे Lifestyle प्रश्नपेढी सामान्य ज्ञान                              माझी भटकंती 🎞️〰️🎞️〰️🎞️〰️🎞️〰️         माझी भटकंती                         क्रमशः भाग-७२ 📽️  रामोजी फिल्मसिटी   दिनांक १० नोव्हेंबर २०१९  🎡फेस्टिवल कॉर्निव्हल🎭       तदनंतर आम्ही यात्रेत असणाऱ्या विविध खेळण्यांच्या दुनियेत  आलो.अम्युझमेंट पार्क सारखी विविध खेळणी.  मजाच मजा हवाई पाळणे, मेरी-गो -राउंड,विविध पशुपक्ष्यांच्या आकारातील सभोवती फिरणारी खेळणी व पाळणे, जंपिंग जपांग इत्यादी खेळणी पहात  आवडीच्या खेळण्यात बसून स्वानंद घेत होतो.स्टॉलवरील विविध  खाद्यपदार्थांची चव चाखत आणि मनसोक्त फेस्टिव्हल मधील मराठी, हिंदी आणि इंग्रजी सिनेमातील गाण्यांवर होणारा दिलखेचक सदाबहार नृत्य बघत मौजमजा करत होतो. मनोरंजनाच्या विविधांगी आविष्काराचा आम्ह...

निसर्ग सौंदर्य जंगलातील नदी ८

Image
                   नदी जंगलातील खळाळती सरिता |               अनेक ओहळांची एकता | दुधाळता जलप्रवाह |                  वाऱ्याचा आरोह |  वाद्याचा नादतरंग  |                बघताना  झालो  दंग | रान पाखरांचा किलबिलाट |                काय हा नदीचा थाट | मनीचा मोर नाचू लागला |         निर्भेळ आनंद मिळू लागला... श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे, वाई छायाचित्र लोकेशन जांभळी जंगल 

माझी भटकंती रामोजी फिल्मसिटी भाग--७१

Image
शालेय उपक्रम माझी भटकंती पुस्तक परिचय माझी ज्ञानमंदिरे Lifestyle प्रश्नपेढी सामान्य ज्ञान माझी भटकंती क्रमशः भाग-७१ रामोजी फिल्मसिटी दिनांक १० नोव्हेंबर २०१९ 🎞️⛲🎞️⛲🎞️⛲🎞️⛲ 🛣️ आऊटडोअर शुटिंग🛣️ सव्वा एक वाजता बसने आऊटडोअर शुटिंग पाईंटकडे निघालो... बसमधून दोन्हीकडे बघत बघत आणि गाडीतला निवेदन जे सांगतो ते ऐकत इकडं तिकडं पहायचे.अनेक गाजलेल्या सिनेमाच्या  शुटिंगची स्थळ, खेडेगाव,शहर,हायवे, डोंगररस्ते,दवाखाने,जेल,शाळा,चौक, गल्ली आणखी कितीतरी स्थळे पहात पहात रामायण ,महाभारतातील दरबार, परदेशातील शहर व रस्ते,बघत बघत एक लोकेशन पाहून झाले की पुढील लोकेशनवर गाडीने जायचे असा नित्यक्रम होता..   रेल्वे स्टेशन (मथूरा जंक्शन), विमानतळ व विमान लोकेशन बघितले.मस्तपैकी विमानात बसल्याचे सुख अनुभवले.फोटोग्राफी केली... संपूर्ण भारतातील नामांकित वास्तू व मंदिरे यांची हुबेहूब प्रतिकृती तिथं बघायला मिळाली..अशी विविध चित्रणस्थळे नवलकथेतील जादूई दिसतात. सायंकाळच्या सुमारास बाहुबली सिनेमाचे शूटिंग झालेले ठिकाण बघितले.. अप्रतिम प्रेक्षणिक शुटिंग स्थळ दिसत होते.भव्यदिव्य...

निसर्ग सौंदर्य शेंबडी सूर्यास्त ७

Image
                           🔅🔅🔅🔅🔅🔆       सूर्यास्त      चैतन्य देवून अस्ताला जातोय                       नव्या स्वप्नांना घेऊन येतोय| सोनेरी किरणे चोहीकडे                      वाऱ्याची झुळूक सगळीकडे|| आसमंतातील तांबूस छटा                            बिंबीत झाली जलावरी| भंडारा  उधळला आकाशी                             नजारा  दिसतोय भारी||   या दृश्याने तणावाचे काहूर पुसले                        आनंदाचे  गाणे  उमजले|           हवा जल अन् प्रकाश                   ...

आठवणीतील वारी ,लोणंद नगरी पंढरीची वारी

Image
आठवणीतील वारी जुलै २०१६     कैवल्याचा पुतळा  संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा ________________________________________________________  लोणंद येथील बाजारतळावरील माऊलींच्या दिंडी सोहळ्याचे काय वर्णन मी पामराने करावे... वैष्णवांचा मेळा आणि भक्तांची मांदियाळीने अवघी लोणंदनगरी माऊलीमय होऊन  भक्तीरसात ओलीचिंब होऊन  न्हाऊन निघते. आळंदी ते पंढरपूर पायवारी असते.समस्त वारकरी भागवत संप्रदायाचे  आराध्य दैवत पांडुरंगाला,आपल्या विठूरायाला  भेटायला   पायदिंडीने भेटायला  जातात..बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल       सगळं वातावरण  माऊलींच्या नामघोषाने  ,टाळमृदुंगाच्या गजरात आणि  भजनकिर्तनाने प्रसन्न होते..वर्षभर बरकत होऊन सौख्य समृध्दीचा लाभ व्हावा म्हणून माऊलींच्या चरणकमलांचे दर्शन घेण्यासाठी सर्व आबालवृद्ध भाविक लोणंदनगरीकडे अहोरात्र येत असतात..माऊली, माऊली ,ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम , विठोबा रखुमाई.... अशा मंत्रमुग्ध नामघोषाने, दर्शनाची भलीमोठी रांग आणि  दिंड्या पता...