रविंद्रकुमार गणपत लटिंगे प्राथमिक शिक्षक
ओझर्डे ता.वाई जि.सातारा
शालेय उपक्रम
माझी भटकंती
पुस्तक परिचय
माझी ज्ञानमंदिरे
प्रश्नपेढी
सामान्य ज्ञान
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
माझी भटकंती रायरेश्वर सहल भाग क्र.चार
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
-
माझी भटकंती भाग-चार
माझी भटकंती भाग-चार
माझी भटकंती भाग-चार
⛰️🌴माझी भटकंती⛰️🌴
✒️क्रमश:भाग चार
⛰️२५ वर्षांपूर्वीची वाशिवली केंद्रसमुहाची रायरेश्वर पदभ्रमंती.......
सन १९९५-९६ चा काळ
〰️➖〰️➖〰️➖〰️➖
⛰️⛰️आपल्या परिसरातील किल्ले तेथील ऐतिहासिक प्रसंग , रायरेश्वर मंदिर, तेथील लोकांचे राहणीमान,जंगलवाटा, आजूबाजूचा परिसर , गडावरील विविध ठिकाणं यांच्या प्रत्यक्ष प्रत्यक्ष भेटीतून इतिहासातील घटना व प्रसंगाचे अवलोकन करता यावे .त्या काळातील गडकोटांचे महत्त्व समजावे या उदात्त हेतूने तत्कालीन केंद्रप्रमुख श्री गुलाबराव गायकवाड व रवींद्र लटिंगे यांच्या कल्पनेतून वाशिवली केंद्रसमुहातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांची छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वरगडावर आयोजित केली होती....
सह्याद्रीच्या डोंगररांगांचे कुतूहलच भारी.काळापहाड,अवघड चढण तीव्र उतार व गर्द झाडीत लपलेली पायवाट..सारं काही मनाचा थकवा घालवून शारीरिक क्षमता ओळखायला लावणारा रांगड्या मातीचा वतनवारसा..त्यावेळी गडावर जाण्यासाठी खावली घेराकेंजळ, जांभळी व जांभळी पुलाच्या ठिकाणाहून पायथ्या पासून शिड्यांपर्यत डोंगर चढून जावे लागे.हल्ली ग्रामसडक योजनेमुळे खावली मंदिरा पासून घेराकेंजळ,पाकिरेवस्ती ते सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या ओहळी गावापर्यंत पर्यंत रस्ता झाल्याने..घाटातून वर माथ्यावर आल्यावर गाडीवाटेने पायऱ्या पर्यत सहज जाता येते...लोखंडी शिड्या चढल्याकी आपण रायरेश्वर गडावर जातो.
त्यावेळी आजच्या इतक्या सुखसोयी नव्हत्या...शिड्यांचढून माथ्यावर आलो. सगळीकडेदिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगांची ओळख प्रत्येक शाळेतील शिक्षक मुलांना करून देत होते.
तो पहा कमळगड,त्याच्यापुढे तो नवरानवरीचा डोंगर, रायरेश्वराच्या समोरील केंजळगड,वाशिवली डोंगर रांग,भोर खोरे,धोम धरण ,पाकिरेवस्ती,कोंढावळे मुरा, भोरच्या बाजूच्या डोंगररांगा . पायवाटेने चालत गायमुखावर आलो.त्याची माहिती गायकवाड साहेबांनी दिली.रायरेश्वर मंदिरात देवदर्शन केले रयतेचे राजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील स्वराज्याची शपथ या अविस्मरणीय प्रसंगावर मुलांशी चर्चा केली. गडाचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले.छत्रपती शिवाजी महाराज ....की जय ! हर हर महादेव ! अशा घोषणा करून ऐतिहासिक वातावरण निर्माण केले.तदनंतर तिथेच असणाऱ्या झाडाखाली बसून सर्वांनी भोजन घेतले. मंदिरापासून १ किमी वरील छोटेखानी गुहा पाहून परतीचा प्रवास सुरू केला...
या सहलीत माडगणी, तुपेवाडी,वासोळे,कोंढावळे, देवरुखवाडी,वाशिवली ,किरोंडे, जांभळी,पाराटवस्ती व वडवली शाळा सहभागी झाल्या होत्या.
विशेष म्हणजे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी श्रीमती प्रभावती चव्हाण मॅडम,श्री एम.के.वाशिवले विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख सहभागी झाले होते..
आमचे शिक्षक सहकारी श्री बाळकृष्ण पंडीत सर व इतर सहकारी शिक्षकांनी स्वहस्ते बनविलेल्या मसालेभाताचा आस्वाद सर्वांनी घेतला होता.......
त्या जेवणाची अवीट गोडी
अशा या पदभ्रमंतीच्या आठवणींना उजाळा त्यावेळच्या बातमी व फोटोने दिला.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
क्रमश:भाग चार
दिनांक १५ एप्रिल २०२०
ग्रामीण भागातील कुमारी वैष्णवी सुजाता विजय ढोकळेची यशाची बिरुदमाला — पहिल्याच प्रयत्नात ‘राजपत्रित अधिकारी’ पदावर निवड.... परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर कुमारी वैष्णवी विजय ढोकळे यांनी महाराष्ट्र राज्य सेवा स्पर्धा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशाची सुवर्णकीर्ती मिळवत सहाय्यक राज्यकर आयुक्त वर्ग -१ या पदी नियुक्ती झाली. त्यांच्या या अभिमानास्पद यशामुळे ओझर्डे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. वैष्णवीचे प्राथमिक शिक्षण ओझर्डे ता.वाई येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शाळेत झाले असून दहावीपर्यंतचे शिक्षण पतितपावन विद्यामंदिर,ओझर्डे येथे पूर्ण केले.प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतही ती जिल्हा गुणवत्ता यादीत झळकली होती. पुढील इयत्ता ११ वी व १२ वीचे शिक्षण कलासागर अकॅडमी वाई येथे घेतले तर उच्च शिक्षणातील पदवी तिने सांगली येथील नामांकित वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात बी.टेक (कंप्युटर सायन्स) मध्ये पदवी प्राप्त केली. घरची आर्थिक परिस्थिती सामान्य असतानाही वडील एस.टी. डेपो वाई येथे मेकॅनिक म्हणून काम करत अ...
गावच्या आठवणी ओझर्डे सोंगे उत्सव - April 17, 2020 ओझर्डे सोंगे उत्सव,सोंगाडी गाव ओझर्डे १६ मार्च। २०१७ शिमग्याची सोंगं 😿आस्ते कदमसे बिलांगकोट राज्यत राज्य स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य या उद्घोषणेचा गजर करीत सुरू होणारा व गावचे दैवत श्री पद्मावती मातेच्या आशिर्वादाने ओझर्डे गावची लोककला सोंगे उत्सव सोहळा दरवर्षी रंगपंचमीच्या पहाटे मुख्य मिरवणूक सोहळा सुरू होतो..होळी पौर्णिमे पासून या उत्सवाला सुरुवात होते. 🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸 महाराष्ट्रात प्नसिध्द श्री भैरवनाथाच्या बगाडयात्रेच्या पहाटे ओझर्डे येथे प्रबोधनात्मक व रंजनात्मक सोंगे उत्सव संपन्न होतो .सोंगे म्हणजे चित्ररथ, शोभायात्रा मिरवणूक होय. ओझर्डे गावचा कॉर्निव्हल सोहळाच जणू.हा उत्सव रंगपंचमीच्या पहाटे सूरू होतो. .होळीपासूनच सुरुवात होते.कोणकोण कोणत्या गाडल्या बांधणार यांचे नियोजन केले जाते....
ओझर्डे गावचे राजपत्रित अधिकारी मयूर गवते खडतर व अथक प्रयत्नातून यशाची हॅट्रिक.... एसटीआय, पीएसआय आणि बीडीओ या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले.याबद्दल हार्दिक अभिनंदन! महाराष्ट्र राज्यसेवा स्पर्धा परीक्षा 2024 मध्ये मयूर संगीता प्रमोद गवते यांची गटविकास अधिकारी पदावर निवड . महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा 2024 च्या निकालात ओझर्डे येथील मयूर संगीता प्रमोद गवते यांनी गटविकास अधिकारी (BDO) वर्ग – १ या पदावर झळाळते यश संपादन केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे गावात आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण इयत्ता 1 ली ४थी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षण पतितपावन विद्यामंदिर, ओझर्डे येथे झाले. पुढील उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी राजेंद्र विद्यालय खंडाळा येथे पूर्ण केले. कृषी महाविद्यालय, पुणे येथून बी.एस्सी. (Agriculture) पदवी प्राप्त केली. मयूर यांची घरची परिस्थिती सक्षम असून कुटुंबीयांनी अभ्यासासाठी आणि तयारीसाठी संपूर्ण पाठींबा दिला.त्यांचे पिताजी ...
Nice fort
ReplyDelete