माझी भटकंती कोट्रोशी तापोळा भाग क्रं. सव्वीस ते सत्तावीस

               माझी भटकंती
⛰️माझी भटकंती⛰️
              क्रमशः भाग सव्वीस
       🏝️ तापोळा कोट्रोशी🏝️
 ♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
    बऱ्याच दिवसात सन २०१९ आमची मुक्कामी  जाण्याची ट्रीप ठरत नव्हती.शनिवारी व रविवारी तारीख ठरवली की कुणाचीतरी महत्त्वाच्या कामामुळे रद्द व्हायची . डिसेंबर जावून २०२० साल आले तरी ठरेना.फिरायला आठही जण कंपलसरी पाहिजेतच्. एक दिवस एका मित्राकडे कामानिमित्त गेलो.तेंव्हा विषय निघाला.कधी जायचं व कुठं जायचं यावर चर्चा सुरू झाली... कोकणात बरेच वेळा गेलोय.कास, बामणोली व वासोटाही झालाय.मग जायचं कुठं..... शेवटी त्याला इतरांशी संपर्क करायला सांगून मार्च मधील शनिवार व रविवार फिक्स करुया..मी ठिकाण  शोधतो......
महाबळेश्वरातील मित्रांशी संपर्क करुन ठिकाणांविषयी माहिती घेऊन आमच्या ग्रुपमध्ये त्यावर चर्चा केली.... सर्वानुमते फायनल झाले... तापोळा
       शनिवारी दुपारी दोन वाजता बऱ्याच दिवसांनी आठ जणांच्या भटकंतीला मुहूर्त मिळाला.वाईतून गाडीत गप्पागोष्टी करत आम्ही महाबळेश्वरला पोहचलो.तिथं चहापान करून तापोळा रस्त्याला लागलो.. भाग परिचयाचा बरेच जण याभागात फिरलेले होते.... घाटमाथ्यावरील वळणावळणाच्या रस्त्याने आमचा प्रवास सुरु झाला.... चिखली पाईंटजवळ पोहचलो.... सायंकाळी चार वाजता डोंगररांगा व पायथ्याची गावांचे दृश्य मनमोहक दिसत होतं....
तेथून आम्ही थेट तापोळ्याकडे न जाता बुरडाणी वरून कोट्रोशी पुलाकडे निघालो.या भागात आलोय तर येवू बघून '' असं इतरांना इतरांना म्हणालो. जंगलातील गर्दझाडीतले वळणावळणाचे चढ उताराचे  रस्ते....कोट्रोशी गावच्या अलिकडेच एका खिंडीत तीव्र उतार आहे.. तिथं साइडल्या गाड्या थांबवल्या व उजव्या बाजूच्या टेकडीवरू गेलो......अरेवा.गडकिल्ल्यांच्याडोंगररांगांचे विलोभनीय दृश्य दिसत होते... कोयना नदीचे खोरे वरुन बघायला मस्त दिसत होतं.सर्वांनी आपापल्या मोबाईल मध्ये सृष्टीचा नजारा टिपला.ग्रुपफोटो काढले.
  कोट्रोशी गावाच्या उजवीकडून  रेणोशीकडे निघालो......









थोड्यावेळाने पुलावर पोहचलो.. पुलावरून चालत निघालो.जणूकाही खाडी पुलावरुन चाललोय असं वाटायला लागले....पहावे तिकडे पाणीच पाणी आणि डोंगर दिसत होते.या पुलामुळे दोन दुर्गम खोऱ्यात दळणवळणाचे साधन निर्माण झाले.अप्रतिम निसर्गरम्य परिसर दिसत होता...खाली उतरून जलाशयाजवळ गेल़ो.पुर्वेला व पश्चिमेला नजर जाईल तिथपर्यंत जलाशय दिसत होता.मस्तपैकी मनसोक्त विविध पोजमध्ये फोटोग्राफी केली... आसमंत न्याहाळताना विलक्षण अनुभव येत होता....... तिथून आम्ही माघारी कोट्रोशीला येवून अमशि हरचंदी वेळापूर मार्गे तापोळयाला आलो. एका रिसॉर्टमध्ये मुक्काम केला.भोजनावर यथेच्छ ताव मारला.गप्पामारत विश्रांती घेतली.



माझी भटकंती⛰️

              क्रमशः भाग सत्तावीस

       🏝️ तापोळा व बामणोली⛺

 ♾️♾️♾️♾️♾️♾️♾️

  सकाळी लवकर उठून थोडंसं फिरुन येऊन निवांत निसर्ग पहात होतं.   टेकडीवर हॉटेल असल्याने पहावे तिकडे उत्तमोत्तम दृश्ये दिसत होती.       अप्रतिम लोकेशन शांतता आणि निवांत वेळ.प्रसन्न वातावरण.

एका बाजूला सोळशी नदीचे खोरे, कोयना जलाशय ,पलीकडे घनदाट झाडी,डोंगररांगा,प्रवासाला लॉन्च व बोटी.झाडीत लपलेली छोटी छोटी गावं.वीक्एन्डसाठी सुंदर ठिकाण.विविध हॉटेलमध्ये उत्तमोत्तम सुविधा जिम, इनडोअर गेम्स, भटकंती भरपूर प्रक्षेणिय स्थळे.निसर्गाच्या सहवासात एक दिवस रहायला सुंदर लोकेशन, गाडीसह प्रवासाला बार्ज  विहंगम दृश्य दिसत होती... निवांतपणे आसमंत , जलाशय आणि डोंगररांगा न्याहाळत बसायचे.. विविध अॅगलने दृश्य पहात मोबाईल मध्ये फोटोग्राफी करत बघत बसायचे.... इथून पुढील  शिंदी वनवन , रघुवीर घाटातून जंगलवाटेने केलेल्या जंगलसफारीत तर किती रोमांचकारी आणि चित्तथरारक अनुभव तिथं गेलेल्या मित्रांकडून त्यांच्या लेखनातून समजते.बोटीतून, जंगलातून ,अवघडकड्यातून शिडीवरून.साहस आणि धाडसी भटकंती. अशा फिरण्याने जंगल आणि माणुसकीची ओळख होते.लोकजीवन जवळून पहाता येते... या दुर्गम भागातील जनताजनार्धनाला साष्टांग दंडवत आणि या भागात सेवा करणाऱ्या तमाम बंधुभगिनींना सलाम..

   सकाळी नाष्टा करताना आजचा प्रोग्रॅम कसा यावर  चर्चा सुरू झाली.आल्या मार्गाने माघारी फिरायच का? बोटिंग ,!भिलारला स्टॉबेरी खायला  जायचं ?जेवायचं कुठं!,बामणोलीला जाताका !तळदेववरुन

 अनेक  पर्याय  शेवटी बामणोलीला इथून रस्ता आहे.हे हॉटेल मालकांनी सांगितले.आवराआवर करुन तिकडे निघालो.

        मग वेंगळे खांबील मार्गे सोळशीनदीला वळसा घालून डोंगराच्या पायथ्याने विस्तीर्ण जलाशय पहात झाडीतल्या तळदेव सातारा  रस्त्यानेलाखवड, गोगवे,रामेघरफुरूस,तेटली ,

म्हावशी करत बामणोलीतून शेंबडीमठावर गेलो.गर्द झाडीत एका खांबावरील मठ.  निसर्गरम्य ठिकाण  ब्रविश्वर मंदिर,आचरणात महाराजाचा मठ आणि वनदुर्ग वासाटो किल्ल्यावर जाण्याचा मार्ग..सेल्फिपाईंट,तिन्ही बाजूला जलाशय आणि एका बाजूला जमीन भटकंतीची उत्तम ठिकाण.फॅमिली ट्रीपला उत्तम ठिकाण..बामणोली तून बोटींग सफारी.ठिकठिकाणी हाॅटेलिंगची सोय झाली आहे.

...मठात सभोवती विविध गर्द  झाडी... देवदर्शन करून परत बामणोलीत आलो.कोयना अॅग्रो रिसोर्टचा बोर्ड  पाहून तिथं तीन वर्षांपूर्वी वासोटा किल्ल्यावर ट्रेकिंग आलो होतो.तेव्हा आदल्या रात्री टेंन्ट मध्ये राहिलो .हे  लक्षात आले.बामणोलीतून अंधारी मार्गे कुसुंबीला आलो.धरणाच्या कडेने  तांबी ,केळोशी ,वेळे कामथी करत धरणाच्या भिंतीला वळसा घालून जलसागर हाॅटेलमध्ये आलो . तिथं माश्यांच्या  विविध प्रकारच्या डीशेश मिळतात.आंबळी फ्राय प्लेट फेमस.खव्वेयांची भरपूर गर्दी असते.आम्ही जेवण केले. ट्रीपचा हिशोब केला.व, मेढा कुडाळ पांचवड करत वाईला आलो...बऱ्याच दिवसांची मित्रांसमवेत भटकंती करण्याची इच्छा पुर्ण झाली.धन्यवाद दिल-दोस्ती-दुनियादारी..

🍀🌳🍀🌳🍀🌳🍀🌳🍀🌳

श्री रविंद्र लटिंगे ।ओझर्डे। वाई

https://raviprema.blogspot.com
 🖋️बुधवार २९एप्रिल २०२०

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड