लोकसहभाग प्रजासत्ताक दिन २०२०


                           
शैक्षणिक साहित्य वितरण

🏵️🌹💐💫7🔖📚💎🏅🎋71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढावळे व देवरुखवाडी या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण प्रेमी युवा नेते व संघटक श्री  राजेश बाळासाहेब कोंढाळकर व श्री रमेश रामचंद्र कोंढाळकर यांनी शिक्षणाचा वसा घेऊन गावच्या शाळेतील मुलांशी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून  शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली.सदर शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या सरपंच धोंडिबा कोंढाळकर आनंद महाराज कोंढाळकर,प्रकाश कोंढाळकर,अनिल नारायण कोंढाळकर, नारायण कोंढाळकर अंकुश धोंडिबा कोंढाळकर, संदीप कोंढाळकर,गोपी कोंढाळकर व मुंबईकर माजी विद्यार्थी मित्र परिवार यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.......
🔖🎤📓गे मायभूमी फेडीन पांग तुझे सारे...आणिन आरतीला चंद्र, सूर्य तारे...
या सुविचाराप्रमाणे आपल्या मातृभूमीला व ज्ञानमंदिराला ऋणातून उतराई होण्यासाठी केलेला संकल्पपुर्तिचा सोहळा आपण सर्वांनी घडवून आणला..... नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व आपल्या कार्यातून दाखविले त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार🙏🏻🤝🙏🏻
भारत माता की जय......

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड