माझी ज्ञानमंदिरे कोंढावळे

                       
माझी ज्ञानमंदिरे 



माझी ज्ञानमंदिरे 
                       क्रमशः भाग दोन व सहा
                                  📚 माझी ज्ञानमंदिरे📚
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढावळे ता.वाई
📊सेवाकाल- १५ जुलै १९८९ ते १५ जुलै १९९९ व १९ हे २०१८ ते आज अखेर  | एकूण ११ वर्षे १०  महिने.
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
 उपशिक्षक
मुख्याध्यापक/ विषय शिक्षक

📓📕📗📘📓📕📗📘
 🌱☘🌱☘🌹🌹🌴🌴🌱☘कार्यतत्पर,विद्यार्थी प्रिय व उपक्रमशील मित्राचा कृतीयुक्त शैक्षणिक प्रवास.......
आमचा दोस्त,सखा व शिक्षकमित्र श्री रविंद लटिंगे याची  रोटरी क्लब ,वाईच्या राष्ट्र-शिल्पकार-पुरस्कार( नेशन बिल्ड अँवाँर्ड) साठी निवड झालेबद्ल हार्दिक अभिनंदन... (मित्रांची प्रतिक्रिया)
        📽कोंढावळे ते कोंढावळे व्हाया जायगुडेवाडी, ओझर्डे व अभेपुरी असा  प्रवास करत पुन्हा कोंढावळे येथे कार्यरत झालो. शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्यात संवेदनशील मनाने सर्वांच्या पुढे राहून सेवाभावी वृत्तीने कार्य केलेण. कोंढावळे  शाळेतील शैक्षणिक कार्य म्हणजे माईलस्टोन आहे.
     प्रगत शाळा
    शाळासिध्दी अ श्रेणी
    तंबाखू मुक्त शाळा
     डिजिटल शाळा
        आज 31  रोजी जानेवारी माझ्या प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीस 3१ वर्षे पूर्ण झाली .मागे वळून पाहताना अनेक सुखदु:खाचे प्रसंग नजरेसमोरून जातात.नोकरीची सुरुवात   खानापूर शाळेत झाली. तेथून सहा महिन्यातच कोंढावळे प्राथमिक शाळेत बदली झाली. ख-या अर्थाने प्राथमिक शिक्षकाच्या सेवेस  येथे गेल्यावरच  शुभारंभ झाला.
           सन १९८९ ते१९९९ अशी सलग दहा वर्षे मुख्य अध्यापक म्हणून होतो.शाळेतील अनेक अडचणीवर मात करून एकशिक्षकी शाळा सातवीपर्यत करून बहुशिक्षकी केली.गावक-यांना पटवून प्रसंगी अनेकांचा रोष पत्करून शाळा नावारूपाला आणण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेतले.गावातील सर्वांना भजन -किर्तनाची आवड असल्याने लोकसहभागातून विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम, सहल,सहभोजन,संगीत परिपाठ,लेझीमपथक,विविध स्पर्धा ,शैक्षणिक उठाव व रात्र अभ्यासिका असे उपक्रम राबवून शाळेची गुणवत्ता व लौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न केले.नवनवीन प्रयोग करण्याची संधी मला प्राप्त झाली.शाळेच्या समोर आल्यानंतर दहा वर्षातील अनेक सुखद दु:खद प्रसंग आठवले.ख-या अर्थी हितेच माझी खरी जडण घडण झाली.खरा सुर इथेच  गवसल्याने अनेक उपक्रम राबविता आले.गरजेप्रमाणे स्वयंअध्ययन करणे. मुलांना कृतीयुक्त अध्ययन अनुभव देणे. मिळालेल्या ज्ञानाची रचन  करुन अधिकचे स्वताच्या गतीने शिकण्यास मदत करणे.विविध प्रसंगी मुलांना व्यक्त होण्याची संधी देणे.  उपक्रम,प्रकल्प व गटकार्यातून शिकणं समजावून घेतल्यास मदत करणे.शोधूया,मिळवूया व परिपूर्ण होवूया...

        एकच वर्ग  असणारी इमारत आज आठ भव्य वर्गखोल्या झालेल्या आहेत.याचे  सर्वश्रेय गावक-यांचे , ग्रामशिक्षण समिती व पालकांचे आहे.व पंचायत समितीचे आहे.
      ३१वर्षाच्या सेवेसाठी अनेक शिक्षकमित्र,सहकारी शिक्षक,केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याशी असणाऱ्या स्नेहा मुळे शैक्षणिक संस्काराची शिदोरी मला अनेक प्रसंगात वेळोवळी फार उपयोगी पडली.विद्यार्थी माझे दैवत मानुन सेवा करत आहे..त्यापैकी काहीजण विविध क्षेत्रातील  नामांकित नोकरीत व व्यवसायात आहेत.. बहुतांशी शेतकरी, ड्रायव्हर, व्यापारी, इंजिनिअर व माथाडी कामगार आहेत.
        मुले ओळख ठेवून आपल्याशी हितगुज करतात. हाच खरा पुरस्कार मिळाल्याची धन्यता वाटली.
 प्रशासकीय बदलीने १९ मे२०१८ ला हजर झालो.इमारतदुरूस्तीचा प्रस्ताव  दिला.मे मध्ये पत्राबदलणे,दारे व खिडक्या बदलणे व भिंतीचे प्लॅस्टर अशी दुरुस्ती पूर्णपणे झाली. अभेपुरी प्रमाणेच इथेही प्रासंगिक उपक्रम राबवायला सुरुवात केली.दसऱ्याला विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम,बालदिंडी, परसबाग, बालिका दिन शिक्षणोत्सव उपक्रम  मुलांना अभिव्यक्त करणे.लोकसहभागातून शाळेचा विकास माजी विद्यार्थ्यांचा कृतज्ञता निधीतून शालेय रंगरंगोटी केली.जननी चॅरिटेबल ट्रस्ट मलकापूर व अहिंसा जैन युवकयुया स्वयंसेवी  संस्थांमार्फत स्कुलकीट वाटप वशैक्षणिक मदत मिळवून दिली.ग्रामपंचायत व श्री  सालपाईगणेश मंडळ हाटेवाडी यांच्या सहकार्याने डिजिटल क्लासरूम केले.क्रिडा स्पर्धेत जिल्हास्तरीय सहभागी व यशवंतराव चव्हाण स्मृती स्पर्धेत तालुकास्तरीय सहभाग घेतला .मुलांच्या कृतीयुक्त अध्ययन व्यक्तिमत्त्व विकासासाठी सहकारी शिक्षकांनी मदत केली..एकसंघ भावनेने शाळेच्या जडणघडणीत , उपक्रम राबविण्यात व सामाजिक कामात  सर्व सहकारी शिक्षकाची लाखमोलाची मदत मिळाली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पालक माझे विद्यार्थीच आहेत.त्यांच्या मुलांना शिकविण्याची संधी मिळाली.
 
🌹🌹🌹🌹🌹🌹
सलाम माझ्या शाळेला,पालकांना आणि माझ्या विद्यार्थी मित्रांना आणि माझ्या सर्व शिक्षकमित्रांना🙏🏻🙏🏻
  हणमंत वाघ,श्री भाऊराव साबळे,श्री शिवाजी बांगर, श्री अनिल यादव,श्री रमेश लोखंडे,श्री लक्ष्मण निकम
     सौ वर्षा पोळ,सौ संगिता सोनावणे ,श्री  सुनील जाधव  सौ नलिनी मुसळे
         💐असं हे माझं ज्ञानमंदिर💐
            शब्दांकन
      श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे,वाई
   क्रमशः भाग - दोन व सहा



Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी