माझी भटकंती,कोंढावळे ते क्षेत्रमहाबळेश्वर भाग क्र.१ते ३
🌱🌴माझी भटकंती . 🌱🌴
क्रमशः भाग एक ते तीन
कोंढावळे ते क्षेत्रमहाबळेश्वर
क्रमशः भाग एक ते तीन
कोंढावळे ते क्षेत्रमहाबळेश्वर
🗻डोंगर दऱ्याखोऱ्यातील पाऊलवाटा 🗻
भाग एक
कोंढावळे ते क्षेत्रमहाबळेश्वर व्हाया डोंगरदऱ्या खोऱ्यातील रानवाटेने.... १९९४ सालातील महाशिवरात्रीदिवशी 🚶♂️🚶♂️🚶♂️
कोंढावळे येथे शिक्षकी सेवेला १९८९ साली सुरुवात झाली.धोमधरणाच्या पाणलोट क्षेत्रातलं गाव.ओझर्डे पासून ३५ किलोमीटर अंतर दररोज प्रवासकरणे शक्य नसल्याने तिथेच मुक्कामी रहायचो एस.टी.ची सोयही वेळेवर नव्हती.कोंढावळे हे शुरवीर संभाजी कावजी कोंढाळकर यांच गांव . गावच्या सभोवताली डोंगरच डोंगर पुर्वेला धरणाचा जलाशय, पश्र्चिमेला किरोंडे मुरा, दक्षिणेला कोंढावळे मुरा तर उत्तरेला रायरेश्वर, केंजळगड व वाशिवलीचा डोंगर.. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात ,कुशीत असणारं गाव..गावची माणसं मायाळू ,प्रेमळ व समजूतदार होती.मुक्कामीच असल्याने जवळच्याच वासोळे,वाशिवली ,
जांभळी,वडवली व इतर गावांना कारणपरत्वे पायीच भटकंती व्हायची.त्याकाळात शाळेच्या सहली निमित्ताने अथवा गावातीलच समवयस्क मित्रांसमवेत कमळगड,माडगणी, रायरेश्वर, केंजळगड,पाराटवस्तीचे जंगल,किरोंडे येथील साखरदरा व कोंढावळे येथील मुरा,जंगमवस्ती व उसतळ्याचा पेढा इत्यादी ठिकाणी भटकंती केली भेटी दिल्या..निसर्गातील डोंगर ,कडे,ओढे, गडवाटा,जंगलातल्या पायवाटा, घनदाट जंगल ,कुसळाचे गवत, करवंदाच्या जाळ्या ,उंच झाडांचा आधार घेत वरवर चढलेल्या वेली कारवीची बनं व पावसाळ्यातील हिरवे हिरवे डोंगर आजही आठवतात.सह्याद्रीच्या डोंगररांगांचे सौंदर्य डोळेभरून साठवून ठेवलेले आज आठवण्याचा प्रयत्न करून त्याचा लेखनप्रपंच......... करण्याचा प्रयत्न
🗣️👥 एकदा समवयस्क मित्रांसमवेत शाळा सुटल्यावर गप्पा मारताना शांताराम म्हणाला, सर,' उद्या शाळेला सुट्टी असेल'!.मी म्हणालो,होय तर... उद्या महाशिवरात्रीची सुट्टी आहे. लगेच ,तो म्हणाला ,
"आमच्या घरातील सगळेजण क्षेत्रमहाबळेश्वरला जाणार आहेत."
गाडी केलीय का ? माझा प्रश्न त्यावर तो म्हणाला,"नाय सर... चलते चलते जायचं...----.त्याने मला लगेच विचारले ,"मग येतायका सर..डोंगर चढत उतरत....
जावूया रमतगमत..
ओ चला सर आपणही जावूया असा इतरजण आग्रह करु लागले .होय नाही करताकरता मी तयार झालो.अन मी , शांताराम,लक्ष्मण,नारायण,दत्ता,
मधूकर, अंकुश व राम इतर काही जण असे दहा ते पंधरा जणांनी उद्या सकाळी लवकर जायचे ठरवले.सोबत उपवास असल्याने फराळाचे साहित्य घेण्याची सूचना सर्वांना केली.
भाग दोन
🌳 🛕महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी आवराआवर करुन आमची सेना पाटीलवाडीच्या टोंगनं डोंगर चढायला सुरुवात केली.सकाळचा गार वारा अंगावर घेत घेत मुरा चढत होतो..नारायण आणि शांतारामच्या घरातील माणसं त्यावेळी मधाच्या घागरी घेवून जोर मार्गे महाबळेश्वर
ला चालत जात असत त्यामुळे त्यांना वाटा माहित होत्या.चढत चढत दाऱ्याजवळ आलो.. तिथल्या देवाला नमस्कार करुन V दाऱ्यातून वर आलो.सकाळची उन्ह अंगावर घेत पाऊण तासात माथ्यावरील पठारावर आलो........ शांताराम लगेच म्हणाला.,सर आता जंगलातून जाणार आहोत.हातात काठी देत म्हणाला,"सर,हातात काठी ठेवा.सरपटणारे प्राणी,गवे ,माकडे किंवा डुकरं दिसतील बैजवार चालायचं' एकापाठोपाठ रानवाटेने चालत चालत, घनदाट जंगलातून पुढेपूढे जात होतो.मध्येच पक्ष्यांचा किलबिलाट कानी येत होता.चालतचालत आम्ही पल्याडच्या डोंगर माथ्यावर पोहोचलो.निसर्गाचे विहंगम व नेत्रदीपक दृश्य पाहून फार आनंद झाला.देहभान सरकुन गेले.धरणाचा जलाशय, कृष्णा नदीचे खोरे, सगळीकडे डोंगर रांगाच ,नदीपलीकडील वयगांव ,गोळेगांव, गोळेवाडी,जोर ही गावे त्याच्या पलीकडे एलफिन्स्टन पाॅईंट व डोंगर कुशीतील महाबळेश्वर तालुक्यातील गावे..
विलोभनीय व मनमोहक दृश्ये दिसत होती पण कॅमेऱ्यात बध्द न करता मनाच्या गाभाऱ्यात साठवित होतो. आता बलकवडी व जोरच्या बाजूचा डोंगर उतरायला सुरुवात केली.घसरत घरसत काठीचा आधार घेत, गप्पागोष्टीमारत,गोळ्या व शेंगदाणे खात खात अर्ध्या तासात डोंगर उतरलो व पायथ्याने चालत चालत जोरगावाजवळपोहोचलो.त्यावेळी बलकवडी धरण बांधलेले नव्हतं..नदीओलांडून गोळेवाडीत पोहोचल्यावर थोडा वेळ थांबून क्षेत्राचा डोंगर चढायला सुरुवात केली......चढण कठीण होते.इतरही अनेक जण वाटेत येताना-जाताना दिसत होते.पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता.उन डोक्यावर येत होती पण झाडांच्या गर्द सावलीतून जाताना उन्हाच्या झळा बसत नव्हत्या.मजलदरमजल करत ओम नमो शिवाय,हर हर महादेव म्हणत चढण पार करता करता...
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
भाग क्रमशः तीन
क्षेत्रमहाबळेश्वराच्या डोंगरावर पोहोचलो... माथ्यावर असल्याने सगळीकडे मस्तपैकी वारा वहात होता.......पायवाटेने देवळाजवळ आलो.तेथील गर्दी पाहून शांताराम ला विचारले आरे इथं यात्रा हाय का आज ? त्याने मानेनेच होकार दिला.पंचगंगानदी मंदीरातील जलकुंडात सर्वांनी स्नान केले.कृष्णा, कोयना,वेण्णा ,गायत्री व सावित्री नदीच्या उगमस्थानाचे देवदर्शन करून सर्वांनी ऐपतीप्रमाणे देवाचा प्रसाद घेऊन एका झाडाखाली बसलो......चालून चालून कड आला होता.. पोटपूजा करण्यासाठी एकत्र बसून फराळ केला.गप्पा मारता मारता पेंग येवू लागला.डुलकी येवू लागली तसेच काही वेळ कलंडलो.... झोपेत असतानाच रामने हाका मारायला, हलवायला सुरुवात केली."ओ उठा चला,ओ उठा चला,माघारी घरी जायचं नसेल तर जोरात मावशीकडे मुक्काम करायला लागेल."काही वेळाने जागे झालो ..आता परतीच्या वाटेचे वेध लागले होते .काठ्या टेकत टेकत खाली उतरायला सुरुवात केली.
⛰️क्षेत्राचा डोंगर उतरून गोळेवाडीत.......
तेथून चालत चालत जोरगावाजवळ येवून डोंगर चढायला सुरुवात केली.सायंकाळी माथ्यावर पोहोचलो.सायंकाळची दृश्ये पाहून मनाला आनंद मिळत होता.वेगळीच झालर आकाशात दिसत होती.पक्षी घरट्याकडे परतत होते..... माथ्यावरील जंगलवाट तुडवत...तुडवत कोंढावळ्याच्या मुऱ्यावर आलो......वरुन छोटी छोटी घरं,ओढे व गावे दिसत होती.पळतपळतच उतरत होतो.कारण घराची ओढ लागली होती.वाडीतील घरं दिसायला लागली.. तशी सगळ्यांनी ओम नमो शिवाय ❗हर हर महादेव ❗छत्रपती शिवाजी महाराज की जय ❗छत्रपती शंभूराजे की जय ❗ अशा घोषणा करत करत गणेशवाडीत आलो...चालून चालून पाय ठणकत होते.तर यात्रा पुर्ण केल्याचं समाधानही वाटत होतं....... डोंगरदऱ्यातून चालत जावून देवदर्शन झालं.नयनरम्य व रांगड्या सह्याद्रीच्या डोंगर रांगातील पाऊलखुणा भटकंती साठी नवी उमेद देत आहेत पुन्हा येण्यासाठी खुणावतायत 🐾🐾असे वाटले.
गावातील समवयस्क मित्रांमुळे सुरू झालेली भटकंती आजही सुरू आहे.कोंढावळे ते क्षेत्रमहाबळेश्वर व्हाया गोळेवाडी 🗻 डोंगरवाटेने चालत-चढत-उतरत येता-जाता २ डोंगर उतरणे चढणे. माथ्यावरील जंगलातून चालणे असे अंतर येवून -जावून अंदाजे २० ते २५ किलोमीटर भरेल.
🛕⛰️🏝️🏜️⛰️🌴🌳🌴
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई,
भाग १ ते ३
🌳⛰️🌳🌴⛰️🐾⛰️🌴भाग एक

Comments